

मराठी साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने सुरूझालेला जनस्थान पुरस्कार यंदा नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे. वाडा चिरेबंदी, युगान्त, आत्मकथा वगैरे नाट््यकृतींनी गाजलेल्या एलकुंचवारांच्या नाट््यक्षेत्रातील योगदानावर खरे तर सरस्वती सन्मान, नागभूषण पुरस्कार वगैरे पुरस्कारांनी यापूर्वीच शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र त्यामुळे जनस्थान पुरस्काराचे स्वरूप आणखी एक पुरस्कार एवढेच राहते असे नाही. कारण कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाची तुलना होऊ शकत नाही.
1991 मध्ये जनस्थान पुरस्कारांचा आरंभ झाला. पहिलाच पुरस्कार नाटककार विजय तेंडुलकर यांना मिळाला. त्यावेळी मी जनस्थान पुरस्कार समितीचा सदस्य होतो. तीनशेवर मान्यवर यक्तींकडून आलेल्या शिफारशींतून दहा नावांची शॉर्टलिस्ट तयार करण्याची पद्धत त्यासाठी अवलंबिण्यात आली होती. अंतिम निवड त्या नावांतून हावी अशी अपेक्षा होती. परंतु त्या पहिल्याच बौठकीत या प्रक्रियेवर काही सदस्यांनी आक्षेप गेऊन वेगळ्या पद्धतीने निवड हावी असा आग्रह धरला. चर्चेला वेगवेगळे फाटे फुटू लागले. निवडीचे काम नयाने हाती ग्यायला हवे असे वातावरण निर्माण झाले. पुरस्कारामागची भावना लक्षात न गेता चर्चा चालल्याचे बघून मी ठरलेल्या पद्धतीनेच निवड हावी, अशी भूमिका गेऊन त्या शॉर्ट लिस्टमधील तेंडुलकरांच्या बाजूने कोणाची मते आहेत ते चिठ्ठ्या लिहून जाणून गेण्याचा मार्ग सुचवला. या सूचनेला डावलणे इतरांना शक्य झाले नाही. तेंडुलकरांच्या पारड्यात बहुमत पडल्याने त्यांची निवड झाली आणि हीच निवडीची प्रक्रिया पुढेही चालू राहिली.
जीवनगौरवाच्या स्वरूपाचा हा पुरस्कार असल्याने निवडीत ज्येष्ठ साहित्यकारांनाच प्राधान्य मिळणार हे स्पष्टच होते. त्यामुळे विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, गंगाधर गाडगीळ, श्री. ना. पेंडसे, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल, ना. धों. महानोर यांना जनस्थान पुरस्काराद्वारे आपल्या वाङ्मयीन क्षेत्रातील कार्याबद्दलचा ताम्रपटच मिळाल्याचा आनंद झाला असला तर नवल नाही. सत्तरीच्या जवळपास गेल्यावरच जनस्थानसाठी विचार होणार हा जणू अलिखित संकेतच आहे. खरे तर या वयात पुरस्कार मिळून फारसे काही साध्य होते असे नाही. पन्नाशीत असे पुरस्कार मिळाले तर लेखकाला नवे प्रयोग करायला, नवे अनुभवविश्व उभे करायला प्रेरणा आणि अवधी मिळू शकतो. तसे मी कुसुमाग्रजांना सुचवतही असे. परंतु `जीवनगौरव म्हणूनच हा पुरस्कार त्यांना अभिप्रेत होता.
या मान्यवर ज्येष्ठ साहित्यकारांमध्ये एलकुंचवारांचा समावेश होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. तेंडुलकरांनंतर नाटककार म्हणून निवड होणारे एलकुंचवार हे दुसरेच नाटककार आहेत. नुकताच त्यांनी सत्तरीचा टप्पा पार केला आहे; तेहा जनस्थानची परंपरा सादर सांभाळली गेली आहे, हेही उगडच आहे.
महेश एलकुंचवार हे तेंडुलकरांनंतरचे एकमेव मराठी नाटककार असे आहेत की ज्यांची बहुतांश नाटके इतर भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिशमध्ये अनुवादित झाली आहेत, रंगभूमीवर आली आहेत आणि परभाषकांच्याही पसंतीला उतरली आहेत. ज्ञानपीठ किंवा सरस्वती सन्मान यासाठी एखाद्या लेखकाचा विचार केला जातो तेहा त्याच्या पुस्तकांचे अनुवाद परभाषांत झाले आहेत का आणि त्या भाषांमध्ये त्याच्यावर काही समीक्षात्मक लेखन झाले आहे का हा एक निकष असतो. परभाषांतील साहित्यिकांवर आणि साहित्यावर त्या अनुवादांचा काही प्रभाव पडला असेल, तर त्या लेखकाला अधिक वेटेज लाभते. अनुवादाद्वारे परभाषकांना ज्ञात असणारे लेखक हे राष्ट्र पातळीवरच्या पुरस्कारामध्ये अग्रक्रम मिळवतात.
महेश एलकुंचवार हे यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथील सरंजामदार जमीनदार गराण्यात जन्माला आले. (जन्म - 9 आॅक्टोबर 1939). शिक्षणासाठी त्यांना बालवयातच शहरात राहावे लागले. वसतिगृहात राहिल्याने वाचनाचे वेड लागले. चित्रपटांचेही आकर्षण वाटले. इंग्लिश साहित्य हा विषय गेऊन त्यांनी एम.ए. केले. नंतर इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून धरमपेठ महाविद्यालयात काम करू लागले. नागपूरला रंगायनने सादर केलेल्या तेंडुलकरांच्या मी जिंकलो, मी हरलो, या नाटकाचा प्रयोग बगून त्यांना नाटकलेखनाची प्रेरणा मिळाली.
सुरुवातीला एकांकिका लिहिल्या. महाविद्यालयात त्यांचे प्रयोग झाले. ते रसिक प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे एकापाठोपाठ एक एकांकिकांचे लेखन झाले. सुलतान ही एकांकिका 1967 साली सत्यकथेत प्रसिद्ध झाली. सत्यकथेच्या चोखंदळ वाचकांनी एलकुंचवारांच्या नाट््यप्रतिभेचे वेगळेपण जाणून त्यांना दाद दिली. सुलतान आणि इतर एकांकिका (1970) आणि यातनागर (1977) अशी त्यांची एकांकिकांची पुस्तके मौजने काढली. 1986 साली रुद्रवर्षा हे नाटक प्रसिद्ध झाले. गार्बो (1973), वासनाकांड (1974) आणि पार्टी (1976) या त्यांच्या नाटकांनी विषयाच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांचे आणि नाट््यक्षेत्रातील उपक्रमशील कलावंतांचे लक्ष वेधून गेतले.
गार्बो या नाटकाच्या नावानेच एलकुंचवारांनी प्रेक्षकांना खुळे केले.
गार्बो ही एक चित्रपट अभिनेत्री. तिच्यावर प्रेम करणारे तिचे तीन प्रियकर. हे तीन प्रियकर तीन वेगवेगळ्या मानवी स्वभावप्रवृत्तीचे प्रतिनिधी म्हणून आपल्यापुढे येतात.
श्रीमंत हा गडगंज संपत्तीचा धनी. संपत्तीचा रुबाब आणि चंगळवादी.
पँझी हा कविमनाचा. संवेदनशील, स्त्रीपूजक, सौंदर्यसक्त, हळुवार.
इंटुक हा भ्रमनिरास झालेला, आयुष्य हे निरर्थक, निरुपयोगी, निरुद्देशी मानणारा. शून्यवादी.
गार्बोच्या नखरेल, लहरी पण भुरळ गालणार्या यक्तिमत्त्वाने हे तिगेही पागल झालेले... गार्बो त्यांना खेळवते. आपल्या नखर्यांनी झुलवते. श्रीमंत गडगंज संपत्तीचा दिमाख मिरवतो खरा, पण त्याचे पुरुषत्व निष्प्रभ. गार्बोचा केवळ सहवास त्याला पुरेसा असतो. पँझी भाबडा. तिची खुळेपणाने पूजा करणारा. तिला बहीण मानणारा. इंटुक आत्ममग्न. गार्बोचे आकर्षण असले तरी तिच्या आशाआकांक्षांमध्ये त्याला स्वारस्य नाही. गार्बो त्या तिगांचीही वौशिष्ट्ये जाणते. त्यांना खेळवते. तिला हवे ते समाधान, तृप्ती मिळतच काही नाही. ते तिगे तिला जणू नष्ट निष्प्रभ करूपाहताहेत. ते तिगे तिला एकमेकांकडे ढकलत राहतात. त्यातच ती खाली पडते. तिच्या पाठीत सुरा खुपसलेला दिसतो. ते तिगे वेड लागल्याप्रमाणे हसत सुटतात. गार्बो ही सृजनाचे प्रतीक. हे तिगे वांझोटेपणाचे नमुने. गार्बोचा धक्कादायक पण प्रतीकात्मक शेवट. या नाटकात हाताळलेला विषय एकूण एलकुंचवारांचे नाटककार म्हणून असणारे सामथ्र्य प्रकट करणारा.
वासनाकांडमध्ये बहीण-भाऊ यांच्यातील शरीरसंबंधाचे आणि मानवी वासनेचे एक आदिम रूप दाखवले आहे. मूर्तिकार हेमकांत एका वाड्यात राहून नग्न स्त्रीदेहाच्या शिल्पाकृती तयार करूपाहतो. बहिणीचा सुडौल देह त्याला त्यासाठी आदर्श वाटतो. त्यात तो गुंतत जातो. ती गरोदर राहते तेहा तो हादरतो. तो लाकडी वाडा जाळून हे वासनाकांड संपवण्याचा निर्णय तो गेतो.
टपार्टी हे नाटक मध्यमवर्गीयांच्या तकलादू नीतिबंधनांचे पोकळपण दाखवते. मुखवटे दूर करते. नौतिकतेच्या गप्पा मारणारे सारेच जण प्रत्यक्ष पेचप्रसंगाच्यावेळी बोटचेपेपणा करतात. शेपूट गालतात. कचखाऊ, नीतिकल्पनांचा भुसभुशीतपणा स्पष्ट करणारी.
ङआत्मकथाछ हे एका लेखकाच्या कलानिर्मिती प्रक्रियेवरील आणि यामिश्र यक्तिमत्त्वावरील नाटकही डॉ. लागूंच्या भूमिकेमुळे एक वेगळा अनुभव देऊन गेले.
वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त या तीन नाटकांची त्रिवेणी, त्रिनाट््यधारा, मराठीत अभूतपूर्व मानली जाते. या तिन्ही नाटकांचा सलग प्रयोग सहासात तास चालतो. तसा तो मागे सादर करण्यात आला. परंतु त्याचे प्रयोग गावोगावी करणे सोपे नाही. या तीन नाटकात मिळून पाच पिढ्यांतील एका मध्यमवर्गीय जमीनदार गराण्यात झालेल्या परिवर्तनाचे टप्पे स्पष्ट केले आहेत.
धरणगावकर देशपांडे या विदर्भातील ब्राह्मण कुटुंबाच्या माध्यमातून नातेसंबंधांचा आणि बदलत्या कुटुंबयवस्थेचा वेध गेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत् युगान्त त्रिनाट््यधारेत केला गेला आहे.
कृषिप्रधान खेड्यातील चाकोरीबद्ध ग्रामीण जीवनाचे उद्ध्वस्तीकरण, परंपरेला जाणारे तडे हा पहिला टप्पा ङवाडा चिरेबंदीछमध्ये दिसतो.
अर्थप्रधान, सुखासीन शहरी जीवनात अर्थार्जनाला आलेले महत्त्व. त्यासाठी वापरण्यात येणारे अवौध मार्ग, त्यामुळे नौतिक कल्पनांबाबत यवहारात आलेला ढिलेपणा, नात्यांमधील तुटकपणा आणि दुरावा हा दुसरा टप्पा.
परदेशात गेल्यावर तेथील ज्ञानलालसा, समृद्धी, वौपुल्य यांचा पडणारा प्रभाव. त्या जीवनाचे वाटणारे आकर्षण, परंतु तेथे वौभवात लोळत राहूनही वाटणारे परकेपण, तुटलेपण आणि त्यातून भेडसावणारे वंशनाशाचे भय. मागे काय राहणार या विचाराने जाणवणारे आयुष्याचे यर्थपण...
या तीन टप्प्यांचे या तीन नाट््यकृतींद्वारे प्रभावी चित्रण झालेले आहे.
गेल्या साठ वर्षात भारतीय कुटुंबयवस्थेत आणि नीतिमूल्यांच्या, संस्कारांच्या चौकटीत गडून आलेले परिवर्तन या नाट््यत्रयीत दिसते. चिरेबंदी वाडा, ट्रॅक्टर, मेणा, दागिने, तळे, बुलडोझर, वाळवंट ही या नाट््यत्रयीतील प्रतीके नाटकाचा आशय अधिक गडद करतात. चंदू, पराग, सुधीर, अंजली, अभय ही पात्रे या बदलत्या टप्प्यांप्रमाणे बदलत जातात. पुंडाई करणारा पराग शहरात कुटुंबप्रमुख म्हणून आपले स्थान निर्माण करूपाहतो. गैरयवहारात अडकतो. कारावासातून सुटल्यावर तो तत्त्वचिंतक बनतो. टसुख नाही, तळं नाही, हे शरीर, ही तडफड कशासाठीठ असा प्रश्न त्याला पडतो.
गेल्या दोन दशकातील सर्वोत्तम नाट््यकृती म्हणून युगान्तचे नाव त्यामुळेच समोर येते.
एलकुंचवारांचे लेखन तसे मोजकेच. गार्बो, वासनाकांड, पार्टी हा पूर्वार्ध, आत्मकथा आणि युगान्त त्रयी हा उत्तरार्ध. आता नवे काही उपसंहारात्मक लेखन करायचे चिंतनमग्न एलकुंचवारांच्या मनात आहे का, हे त्यांनी अजून उगड केलेले नाही. पण तसे काही केले तर शिखरावर सोन्याचा कळस ठरेल.
शंकर सारडा
पुणे
No comments:
Post a Comment