Tuesday, February 15, 2011

लेखकाची नाममुद्रा महत्त्वाची की प्रकाशकाची?




ब्रँड नेम

आपण एखादे पुस्तक खरेदी करायला जातो तेहा काय म्हणतो?
मला स्वामी हे पुस्तक हवेय. तुमच्याकडे आहे का?
मला विश्वास पाटील यांचे पानिपत हवे आहे.
नुकतीच प्रसिद्ध झालेली हिंदू कादंबरी तुमच्याकडे आहे का?
बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार मिळेल का?
नवीन कादंबर्या कुठल्या आल्या आहेत?
जीएंच्या कथासंग्रहांच्या नवीन आवृत्त्या आल्या आहेत का?
पाडगावकरांच्या छोरी या कायसंग्रहाची एक प्रत मिळेल का?

ग्राहक म्हणून एखादे पुस्तक खरेदी करायला जाताना आपण विशिष्ट लेखक किंवा विशिष्ट पुस्तक यांचे नाव घेतो. लेखकाचे नाव किंवा पुस्तकाचे नाव गेतले की ग्रंथविक्रेता आपली मागणी पूर्ण करतो. त्याला तो लेखक किंवा पुस्तक यांचे नाव ठाऊक असते. कारण गाजलेला लेखक हा एक ब्रँड असतो. गाजलेल्या पुस्तकाचे नाव हा ब्रँड असतो. त्यामुळे तो ग्राहकाला तसेच विक्रेत्याला ठाऊक असतो. जाहिरातीमुळे, वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमुळे, वादग्रत ठरल्यामुळे, पुरस्कार मिळाल्यामुळे वा अशाच काही कारणामुळे काही लेखक आणि काही पुस्तके ब्रँडनेम बनतात. त्यांना चांगली मागणी येते. सर्वच लेखकांना किंवा पुस्तकांना ब्रँडनेमचे भाग्य लाभते असे नाही.

हॅरी पॉटर हे ब्रँडनेम बनते तेहा जगभर त्याच्या लक्षावधी प्रती झपाट््याने विकल्या जातात. त्याची लेखिका जे. के. रोलिंग ही इंग्लंडच्या सम्राज्ञीपेक्षाही अधिक श्रीमंत होते. हॅरी पॉटरच्या प्रतिकृती वा प्रतिमा असणार्या भेटवस्तू बाजारात येतात. त्याच्या जीवनातील विविध गटना चित्रित करणार्या थीमपार्कची उभारणी होते. त्यातील क्विडिच या खेळावर आधारित हिडिओ गेम्स तयार होतात. हॅरी पॉटर हे ब्रँडनेम बनल्याने निरनिराळे यावसायिक त्याचा लाभ उठवतात. ब्रँडनेम प्रस्थापित करणार्या कंपन्या व उत्पादक जागतिक बाजारपेठेवर आपले प्रभुत्व गाजवतात. उत्पादकांना गडगंज संपत्ती मिळवून देतात.

पुस्तकांच्या संदर्भात बोलायचे झाले तर गाजलेली पुस्तके लेखक-प्रकाशकाला पौसा मिळवून देतात. बेस्टसेलर लेखकाला नाव मिळवून देतात. त्याच्या पुढच्या पुस्तकाची वाचक ग्राहक उत्सुकतेने वाट पाहत राहतात. जेम्स बाँड हे ब्रँडनेम झाले. जेम्स बाँडवर चित्रपट निगाले. त्याची पुस्तके लाखोंनी विकली गेली. त्याची नक्कल करणारे गुप्तहेर नायक अनेक लेखकांनी निर्माण केले. लेखक इआन फ्लेमिंग याचा मृत्यू झाल्यावरही त्याच्या ट्रस्टला कोट््यवधी पौंडांचे उत्पन्न होत आहे. युरोप-अमेरिकेत अशा बेस्टसेलर लेखकांना आणि पुस्तकांना अमाप कमाई होते. तो लेखक व त्याने निर्माण केलेल्या यक्तिरेखा यांना ब्रँडनेमची स्टेटस मिळावी म्हणून प्रकाशक त्यांच्या जाहिरातीसाठी थौल्या मोकळ्या सोडतात. ब्रँडनेम म्हणून ज्याचे नाव लोकांना चिरपरिचित होते त्याची प्राप्ती सतत वाढत जाते. असा एखादा बेस्टसेलर आपल्या प्रकाशनाकडे असला तर त्या प्रकाशनसंस्थेचे भाग्य फळफळते. एकापेक्षा जास्त बेस्टसेलर आपल्या यादीमध्ये असले तर त्या प्रकाशन संस्थेचा दरारा आणि दबदबा प्रचंड वाढतो. भाषांतर, चित्रपट, सीरियल्स, अॅनिमेशन, कॉमिक्स, भेटवस्तू यांच्या हक्कापोटी लक्षावधी डॉलर्स मिळतात. ती प्रकाशनसंस्था स्वत:च ब्रँड बनते.

परंतु बहुसंख्य प्रकाशनसंस्था या लेखकाच्या ब्रँडवर अवलंबून असतात. तो लेखक दुसर्या संस्थेकडे गेला की त्या प्रकाशकांची कमाई गटते. ते अडचणीत येतात.

जागतिकीकरणाच्या सद्य:कालीन स्पर्धेत अनेक अग्रगण्य प्रकाशन संस्था लेखकाच्या ब्रँडवर आपले अस्तित्व आणि प्रभाव अवलंबून आहे या जाणिवेने अस्वस्थ आहेत. त्यांना स्वत:च ब्रँडनेम होण्याची गरज भासू लागली आहे.
वाचक-ग्राहक लेखकाच्या किंवा पुस्तकाच्या नावाने दुकानात मागणी करतात, प्रकाशकाच्या नावाने नाही हे बर्याच प्रकाशकांना आता खटकू लागले आहे.

मला मौज प्रकाशनाची नवीन पुस्तके बगायची आहेत, पॉप्युलरची समीक्षेवरची पुस्तके मिळतील का? सानेगुरुजींच्या समग्र पुस्तकाचा सेट आहे का?, पद्मगंधाने काढलेला अॅगाथा िख्रस्तीच्या रहस्यकथांचा संच मिळेल का? अशी प्रकाशनाचे नाव गेऊन ग्राहकांनी मागणी केली तर त्या प्रकाशनाला ब्रँड म्हणून ओळख लाभलेली आहे असे म्हणता येते.

स्वामी, हिंदू, विश्वास पाटील, जीए, पाडगावकर अशी पुस्तकांची किंवा लेखकांची नावे गेऊन जेहा मागणी होते तेहा ती ब्रँड म्हणून मान्यता मिळाल्याची निदर्शक असते. अर्थात कुठल्याही लेखकाचा ब्रँड म्हणून प्रतिमा झाली तरी त्याचे प्रत्येक पुस्तक ब्रँड या पदवीला पात्र असतेच असे नाही. परंतु प्रकाशकाला ब्रँडची स्टेटस मिळणे हे एकूण अवगडच असते.

एखाद्या प्रकाशनाने काढलेल्या कुठल्याही पुस्तकाला भरपूर मागणी असेल असे क्वचितच गडते. पेंग्विन क्लासिक्सचे उदाहरण या बाबत उद्बोधक ठरते.
नामवंत लेखकांची उत्तमोत्तम दर्जेदार पुस्तके पेंग्विन क्लासिक्स या मालिकेत अंतर्भूत असतात. पेंग्विनच्या ब्रँडनेमच्या विश्वासामुळे जगभरचे चोखंदळ वाचक या मालिकेतील पुस्तके आवर्जून गेतात. लेखक अपरिचित असला तरी आदराने आणि औत्सुक्याने त्यांचे वाचन-अध्ययन करतात. पेंग्विनच्या संपादकीय संस्कारांची आणि निर्मितीमूल्यांची ग्वाही या पुस्तकांना साहित्यविश्वात अग्रगण्य पंक्तीत विराजमान करते. पेंग्विनसारखी ब्रँडनेमची पुण्याई फार मोजक्या प्रकाशनसंस्थेच्या वाट््याला येते. हर्लेक्विन मिल्स अँड बून या प्रकाशनालाही असेच ब्रँडनेम प्राप्त झालेले आहे. टीनएजर्ससाठी प्रेमकथा प््रासिद्ध करणे ही मिल्स अँड बून्सची खासियत. लेखकाच्या नावाला त्यात महत्त्व नसते. वेगवेगळ्या लेखक या प्रेमकथा लिहितात... ह्या प्रेमकथा मिल्स अँड बूनच्या म्हणजे प्रकाशकाच्या नावावरच जगभर खपतात. महिन्याला पाचदहा पुस्तके निगतात. त्यावर कुमार वाचकांच्या उड्या पडतात. मिल्स अँड बूनच्या प्रेमकथा भारतात वर्षाला 100 कोटी रुपयांचा धंदा करतात. सोप्या इंग्रजीत लिहिलेल्या या प्रेमकथा इंग्लिश मिडियममध्ये शिकणार्या मुलामुलींना सुलभ वाचनाचा आणि रोमँटिक स्वप्नांचा खुराक देत राहतात. लेखकाचा ब्रँड येथे नगण्य असतो.

यापुढच्या डिजिटल पुस्तकांच्या काळात लेखकाच्या ब्रँडवर अवलंबून राहून चालणार नाही, प्रकाशकांनी स्वत:चा ब्रँड निर्माण केला तरच निभाव लागेल अशी जाणीव आता अमेरिका-युरोपमधील प्रकाशकांना तीव्रतेने होत आहे. संपादकीय गुणवत्ता, विषयांचे नावीन्य, अपेक्षित वाचकांची अभिरूची आणि वयोगट वगैरे बाबी लक्षात गेऊन विशिष्ट प्रकारची दर्जेदार पुस्तके सातत्याने प्रकाशित करणे आणि आपला स्वत:चा ब्रँड निर्माण करणे हे या पुढच्या काळात प्रकाशकांपुढे एक आहान असणार आहे.

पुस्तक हे बुकसेलरसाठी, विक्रेत्यासाठी नसून पुस्तक हे थेट ग्राहकासाठी आहे आणि ते ग्राहकापर्यंत पोचवण्याचे इंटरनेट हे प्रभावी माध्यम आहे हे अॅमेझॉनने दाखवून दिले आहे. अॅमेझॉनने दिलेला हा धडा प्रकाशकांना ब्रँड स्टेटस मिळवण्याची प्रेरणा देणारा आहे.

मराठीतील प्रकाशनसंस्थांनीही या विषयाकडे लक्ष देणे आत्मकल्याणाचे ठरेल.


सुनील मेहता

No comments:

Post a Comment