Wednesday, February 16, 2011

द प्रायव्हेट पेपर्स ऑफ ईस्टर्न ज्युवेल


एका स्त्री गुप्तहेराची उत्कंठावर्धक जीवनकहाणी

पेकिंगच्या नंबर वन कारागृहामधल्या माझ्या पहिल्या वर्षाच्या दरम्यान सोव्हिएत लाल लष्कराने मांचुरियामध्ये प्रवेश केला
आणि पू यी ला मांचुकुओचा सम्राट म्हणून पदच्युत करण्यात आलं. त्यामुळे तो कोरियाच्या सीमारेषेजवळ कुठेतरी पळून गेला. तिथून जपानमध्ये पळून जाण्याची त्याला आशा होती; पण त्याऐवजी त्याला रशियनांनी घेरलं आणि त्याला सौबेरियात पळून जावं लागलं.

वॅन जुंग पुन्हा एकदा एकटी पडली आणि तिच्या भविष्याचा विचार करून ती तर कमालीची भयभीत झाली होती; पण त्या पदच्युत सम्राटाने चालवलेल्या सगळ्या नाटकामध्ये आता आपल्याला कुठलीही भूमिका करावी लागणार नाही या विचाराने तिला हायसंदेखील वाटलं असेल, असं मला वाटतं.

त्याचवर्षी, जनरल ओकामुरा यासुत्सुगु याने संपूर्ण जपानी सौन्यासह चीनमध्ये जनरल हो यिंग-चिन पुढे शरणागती पत्करून जपानच्या आणि माझ्याही उरल्या-सुरल्या सन्मानाला चूड लावण्याचं सत्कार्य केलं.
तेव्हापासून तीन वर्षांचा काळ निघून गेला आहे आणि अजूनही मी पेकिंगच्या नंबर वन कारागृहामध्येच आहे. तिथे उद्या माझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे याची मला सुतराम कल्पना नाही. कधीकधी मी ज्या परिस्थितीत आहे, तिच्या कटू सत्याची जाणीव होऊनही सगळं काही व्यवस्थित होईल असंच मला खात्रीपूर्वक वाटतं; पण तरीही आता मी पूर्वीइतकी आशावादी राहिलेले नाही.

माझ्या भोवतालच्या या भयंकर परिस्थितीशी मी आता जुळवून घेतलं आहे. त्यामुळे आता या ओलसर भिंतीवरून सुटलेले चुन्याचे पोपडे किंवा रात्री वापरण्यात येणार्या नौसर्गिक विधीच्या माझ्या भांड्यामध्ये मूत्रात बुडून मेलेला तरंगणारा उंदीर पाहूनही मला त्याचं काहीही वाटत नाही. अर्थात, अशाही काही वेळा येतात जेव्हा माझा संताप अनावर होतो. पण मियुराच्या त्या पक्ष्यांप्रमाणे पिंजर्यात सापडल्यासारखी माझी अवस्था झालेली आहे, त्यामुळे भूतकाळाबद्दल विचार करायला आणि हळहळायला मला खूप वेळ मिळतो, की भूतकाळात एक सुंदर जीवन मिळवण्याच्या नादात मी किती चुकीच्या मार्गाने गेले.

ही अतिशय वादळी, बहुरंगी, दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पाश्र्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
मूळ लेखक : मौरीन लिंडले
अनुवादक : ऋजुता कुलकर्णी

पृष्ठे : 306 किंमत : 280

No comments:

Post a Comment