Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Friday, February 18, 2011
26/11 मुंबईवरील हल्ला
मूळ लेखक : हरिंदर बावेजा
अनुवादक : प्रा. मुकुंद नातू
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थौमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंटओबेरॉय पय|तच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वौफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धौर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ङये है बम्बई मेरी जान...छ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ङज्युलिओ रिबेरोछ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.
पृष्ठे : 222 किंमत : 250 -----------------------------
दाते जखमी झाल्याची आणि हॉस्पिटलमध्येच एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची बातमी करकरे यांना वायरलेसवरून मिळाली होती. चार कॉन्स्टेबलसह करकरे ताबडतोब कामा आणि आल्बलेस हॉस्पिटलकडे रवाना झाले आणि त्यांच्या झेड सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षकांना त्यांनी टाईम्स बिल्डिंगजवळ मोर्चेबांधणी करण्यास सांगितले. परिस्थितीचा अंदाज घेत ते कामा आणि आल्बलेस हॉस्पिटलकडे सावधगिरीने जात होते. नक्की काय होतंय याची कुणालाच माहिती नव्हती.
पोलीस निरीक्षक साळसकर आणि अतिरिक्त आयुक्त कामटे यांची सीएसटीवर भेट झाली. तेही लगेच कामा आणि आल्बलेस हॉस्पिटलकडे निगाले. साळसकरांच्या बरोबर एटीएसमधील पाच दुय्यम सहकारीही होते.
हॉस्पिटलच्या मागच्या दारापाशी ते पोहोचले तोच त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. एक जखमी कॉन्स्टेबल धावतच त्यांच्याकडे आला. सहा पोलिसांसह दाते दहशतवाद्यांशी हॉस्पिटलमध्येच सामना करत असून ते गंभीर जखमी झाल्याचे त्याने सांगितले. त्याच क्षणाला इमारतीतून एक बॉम्ब आला आणि तो हॉस्पिटलच्या आवारातच पडला. कामटे यांनी तात्काळ एके-47च्या फैरी झाडून त्यास प्रत्युत्तर दिले. नंतरच्या तपासणीत असे निष्पन्न झाले की, आता आधुनिक शस्त्रास्त्रांसहित येणाऱ्या
मदतीच्या भीतीने दहशतवाद्यांनी लगेच इमारत सोडली.
पुढच्या हालचाली विषयी करकरे, कामटे आणि साळसकर यांनी आपसांत चर्चा केली. कामटे यांनी हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करावा असे सुचवले. जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या एसहीयू मध्ये ते चढले आणि नंतर जेव्हा ते स्पेशल ब्रँचपाशी आले तेव्हा साळसकरांनी स्वत: गाडी चालवण्याचे ठरवले. (स्पेशल ब्रँच म्हणजे सीआयडी चे पडताळणी कार्यालय. सर्व परदेशी नागरिकांना आपली पारपत्रे तेथे तपासून घ्यावी लागतात.)
या मधल्या वेळेत ते दोन दहशतवादी हॉस्पिटलच्या बाहेर पडले होते. त्यांना या गोष्टींची काहीच कल्पना नसावी. हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या कॉन्स्टेबलने त्यांना हाक मारून ओळख पटवण्यास सांगितले. इस्माईलने झटकन पिशवीतून रिहॉल्वर काढून त्याला ठार मारले. झेव्हियरच्या जवळची गल्ली ते जेथून आले तिकडेच जाते हे त्यांना माहीत नव्हते. ते उजवीकडे वळले. एक होंडा सिटी मोटर त्यांच्या दिशेने येत होती. त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. ती मोटर एका आयएएस अधिकाऱ्याची होती. ड्रायव्हरने मेल्याचे नाटक केले. दहशतवादी चटकन मोटारीत शिरण्यासाठी धावले. सवीस वर्षांचा प्रशांत कोष्टी आता त्यांच्या गोळीच्या टप्प्यात होता. एक गोळी त्याच्या दंडाला लागली. पण सगळे बळ एकवटून तो लगतची जीटी हॉस्पिटलची इमारत चढून सुरक्षित ठिकाणी पोहोचला.
दहशतवाद्यांना मागून वाहनाचा आवाज आला. ती पोलीस अधिकारी असलेली एसव्हीयूच होती. जवळच्या एटीएम केंद्राच्या झाडांमागे ते लपले. नजिकच्या इमारतीतील कुणीतरी एकाने नियंत्रण कक्षाला दोन दहशतवादी त्या भागात असल्याचे कळवले होते. पण नंतर उघड झाले की ही माहिती तिकडे जाणाऱ्या अधिकाऱ्याना कळवली गेली नव्हती.
त्या भागातील अनेक लोकांना असे वाटले की, नियंत्रण कक्षानेच ती मोटार तिकडे पाठविली आहे. झाडामागे कोणीतरी लपले आहे असा संशय आल्याने कामट््यांनी एके-47 मधून गोळीबार केला, त्यात एक दहशतवादी जखमी झाला. मोटारीतून बाहेर येण्यासाठी त्यांनी दार उगडले आणि अचानक दुसऱ्या दहशतवाद्याने एके-47 च्या फैरी झाडल्या. अधिकाऱ्याना तो दिसला नव्हता.
मागील सीटवर बसलेला कॉन्स्टेबल अरूण जाधव यांच्याखेरीज सर्वजण ठार झाले. साळसकर गंभीर जखमी झाले होते, नंतर त्यांचा मृत्यू झाला. एक गोळी जाधव यांच्या उजया कोपराला लागली आणि दोन गोळ्या त्याच्या डाव्या खांद्याला चाटून गेल्या. मोटारीतील अधिकार्यांचे मृतदेह दहशतवाद्यांनी बाहेर काढून रस्त्यावर फेकले आणि पोलीस जीपमधून त्यांनी पलायन केले.
एक पोलीसगाडी पळवून नेल्याचे कोणालाच माहीत नव्हते. दहशतवादी मेट्रो जंक्शनकडे चालले होते. एक आगीचा बंब, दोन पोलीस हॅन आणि एक रुग्णवाहिका एवढ्यांनी मेट्रो जंक्शनकडे जाणार्या रस्त्याची एक बाजू अडवली होती. तिथे असलेल्या पोलिसांनी आणि माध्यमांच्या पत्रकारांनी एक एसयूव्ही हळूहळू अडथळ्यांकडे येताना पाहिली. पण मोटारीतून होणार्या गोळीबाराच्या आवाजामुळे शांतता भंग होईपय|त मोटारीत कोण आहे याची सुतराम कल्पना बघ्यांना नव्हती. एक पोलीस कॉन्स्टेबल जागेवरच मरण पावला आणि हे दृश्य पाहणार्या सायकलवरील एका व्यक्तीच्या हातात गोळ्या घुसल्यामुळे तो खाली पडला.
प्रसारमाध्यमांनी लगेचच एक पोलीस जीप पळवून नेल्याचे वृत्त प्रसारित करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली होती. सीएसटीमध्ये लोकांवर हल्ला करणारे अतिरेकी हेच होते याची कुणालाच कल्पना नव्हती. आता रस्त्यावरच्या प्रत्येक गाडी आणि व्यक्तीची थांबवून झडती घेतली जाऊ लागली. बंदुका उगारलेले पोलीस पादचार्यांना हात वर करून हळू चालण्यास सांगत होते. आता ती युद्धभूमी झाली होती.
(पुस्तकातला काही भाग)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment