Saturday, February 18, 2012

जाईची सुगंधी फुले





ग्रामीण व गरीब कुटुंबात जन्मलेल्या व स्वकष्टावर आणि स्वकर्तुत्वावर पुढे आलेल्या किसन शिंदे यांचे हे आत्मचरित्र


एक अस्पृष्य मानल्या गेलेल्या आणि सर्वार्थाने बहिष्कृत केल्या गेलेल्या समाजात जन्मलेल्या व्यक्तीने प्रतिकूल सामाजिक परिस्थितीवर स्वतःच्या प्रयत्नाने मात करून जगण्याच्या संघर्षात यश कसे प्राप्त केले, आपल्या जगण्याला अर्थ देण्याचा आणि ते सुंदर करण्याचा सर्वशक्तिनिशी कसा प्रयत्न केला, त्या सर्व प्रयत्नांचा ओघवत्या भाषेत अभिव्यक्त केलेला तपशील म्हणजे श्री. शिंद यांचे आत्मकथन आहे. या तपशीलात कुठेही कृत्रिम भडकपणा नाही. म्हणून हे आत्मकथन वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे.
पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस सुरवात करून कार्यकारी संचालकासारख्या सचिव श्रेणीतील पदावरुन निवृत्त झालेल्या आणि आयुष्यभर दगड-मातीशी संबंध आलेल्या शिंदे यांनी आपली साहित्यिक अभिरुची जतन करीत मानवी संबंधाचे बारकावे एखाद्या कुशल लेखकाप्रमाणे कधी प्रवाही तर कधी काव्यात्म भाषेत उलगडून दाखविले आहेत. हे त्यांच्या लेखनाचे मोठ यश आहे...


लेखक- किसन दगडू शिंदे
पृष्ठे- ४६२
किंमत- ५०० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

नीलकंठ



स्त्री-पुरुष आणि नियती यांचे रंग दाखविणा-या कथा


जीवनातल्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात.
निव्वळ चेह-यावरुन तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच!
व्यक्ति-व्यक्तींमधले परस्परसंबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण त-हा,
भावनांचे कंगोरे आणि कळत-नकळत उफाळणारे तरंग
या सा-याचा मनोज्ञ वेध `निलकंठ` कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो.

कायमचं अगम्य असं स्त्री-पुरष नातं!
प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा!
नियतीच्या भोव-यात गटांगळ्या खाणारं आयुष्य आणि
त्यात अडकलेलं अवघं मनुष्यजीवन!

अशा सगळी घट्ट वीण अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची
देखणी धडपढ चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर
यांसारख्या कथांमधून जाणवत रहाते.
उत्कंठा जागविणा-या, आतला तळ ढवळून टाकणा-या,
आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणा-या या कथा म्हणजे
एक तरल अनुभूती!


लेखिका- स्नेहल जोशी
पृष्ठे- २२२
किंमत- २४०
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

मातीखालची माती



उन्हाळा पडला की, बापू मांगाचे नावसुध्दा आमच्या तसरीला कोणी घेत नाही. त्याच्या कोणी पाळतीवर रहात नाही. त्याने चोरलेलेला कडबा पकडण्यासाटी जोंधळ्यात कोणी लपून बसत नाही. गवत कापताना धरण्यासाठी कोणी झाडावर चढून बसण्याची तसदी घेत नाही. जो तो शेतकरी आपल्या कामात दंग होऊन जातो.

पावसाळ्यात मात्र वेगळं असतं. बापू ह्या तसरीला कालवा उसळून देतो. इथं आहे तर तिथं आहे. इथं गेला तर तिथं गेला; असं करून सोडीत असतो. त्यावेळी शेतक-याचं मन थारी नसतं. कोणी कोणी तर पहाट चांदणी मोहरायला शेतात येतो. कामाला लागतो. मग दहिवर असू दे; नाहीतर कडक थंडी असू दे. कोणी रातचं चिखल तुडवीत वसतीला येतो. चिखलातले कुचके काटे पायांची चाळण करुन टाकतात. प्रत्येक काट्याला बापूला शिवी हासडली जाते. कोणी हारमाळ टळवून, वकून चुकवून कुठं तरी दडून बसतात. बापूवर ज्याची त्याची पाळत असते. कोणी बेंडील माणूस बापूला पकडून चावडीत अडकवून टाकण्याचे इमले रचीत असतो, तर कोणी मवाळ शेतकरी बापूला समजुतीने वागवून घेतात. एखाद्या वेळेला भारं-दोन भारं वैरण देऊन गप बसतात. कधी आपल्याच ढोरांना वैरण नाही; म्हणून बापूला तोंडानंच घालवतात...बापू मग गप निघून जातो.


( पुस्तकातल्या `बापू` या कथेमधून)

लेखक- आनंद यादव
पृष्ठे- १३८
किंमत-१४० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी


ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्स्लल शैलीतला हा आविष्कार.
मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला
मातीतल्या गहि-या थरांची ओढ लागली आहे...
ही विविध व्यकितचित्रे संवेदनाशील मनाने टिपली आहे.
त्यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो....
आणि त्यासोबत बाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो.
सभोवारच्या माणसांचेही माणूसपण त्यांच्या मनाला जाणवू लागते.
ती जाणीव मनातल्य़ा मातीत रुजते., बहरते...
असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते!

जॅपनीज रोझ



जगाला अज्ञात असणारी, एका कामिकाझी स्त्री पायलटची झपाटून चाकणारी कथा


पर्ल हार्बरच्या हल्ल्यात यशस्वी झालेल्या जपानी राष्ट्राची आगेकूच..
दुस-या महायुध्दात दोस्त राष्ट्राकडून मार खाणारे जपानी पार खिळखिळे
झाले होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन सतराःअठरा वर्षांची पोरंही युध्दात
सैनिक म्हणून भरती होतात. मुली नर्स आणि इतर कामे करतात,,..

सायुरी मियामोटो अशीच एक तरुणी. टोकियोला नर्स म्हणून काम करत
असताना ती आपली मैत्रीण रैकोच्या वाग्दत वराचा मृत्यू पाहते.
युध्दात तिचा भाऊ बोटीवर आणि मैत्रीण रैको बॉम्बहल्ल्यात मरण पावते.
ह्या सर्वांचा सूड घ्यायचा म्हणून ती `कामिकाझी` पायलट बनते,
तेही पुरूष वेषांतर करुन. पुरुषांच्या बरोबर रहाणे, जगणे,
प्रशिक्षण घेणे ह्यात हे वेषांतर उघड होते,
तेही तिचा प्रशिक्षकच आणि प्रियकर असणा-या ताकुशीकडे.
ह्यात पुरुषांचे वेषांतर करून लष्करात घुसलेली ही स्त्री.
ह्या गुन्ह्यांची तिला काय शिक्षा मिळते?..
ही कहाणी तशी अदभूत, विलक्षणच...



मूळ लेखिका- रेई किमुरा
अनुवाद- स्नेहल जोशी
पृष्ठे- १९०
किंमत- २०० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Friday, February 17, 2012

१०-१०-१०



१० मिनिटे- १० महिने- १० वर्षे
जीवन बदलून टाकणारी कल्पना !



तुमच्या कोण्त्याही निवडीला-
कोणत्याही निर्णयाला-
१०-१०-१० मुळे फायदाच होईल-

आपल्या सर्वांनाच स्वतःचे आयुष्य स्वतः घडवण्याची इच्छा असते,
पण आजच्या गतिमान जगात, त्यातील प्राधान्यांच्या घडामोडीत,
माहितीच्या महापुरात आणि जखडणा-या पर्यायांमध्ये आपण सहजच उर्मी,
तणाव आणि उपयुक्ततेबरोबर वाहवत जातो, असं आपल्या लक्षात येतं.
आपले निर्णय बरोबर असतात का?
की आपण पुन्हा-पुन्हा,
आपल्या कितीही जोरदार इच्छेविरुध्द त्या क्षणाच्या मागणीला शरण जातो?

१०-१०-१० म्हणजे-
- प्रभावी निर्णय प्रक्रियेचा एक परिवर्तनीय नवा मार्ग.
- आयुष्यातील अनेक अडथळ्यांवर योग्य मार्ग दाखविणारी एक नवी संकल्पना.
- निवडलेल्या क्षेत्रात क्षणा-क्षणाला सकारात्मक परिणामांकडे वाटचाल.
- जीवनातील उद्दिष्टे आणि मूल्यांची एक नवी ओळख.
- आनंद, स्पष्टता व शक्तीसामर्थ्य़ांबद्दल सर्व काही सांगणारे मार्गदर्शन.
- कल्पनारम्य मनात गुदगुल्या होतील असा विचार प्रवाह.

१०-१०-१० च्या वापराची विस्तृत शक्यता फार वैषिष्ट्यपूर्ण आहे.
ते एखाद्या कॉलेजकुमाराने किंवा एखाद्या व्यस्त मातेने किंवा ज्येष्ठ व्यावसायिकाने,
कलाकाराने, सहकारी अधिका-याने किंवा उद्योजकाने वापरेल असते तरी
१०-१०-१० ने आपली परिणामकारकता लहानमोठ्या, नेहमीच्या आणि
अपवादात्मक अतिमहत्वाच्या निर्णयांमध्ये दाखवली आहे.
आणि त्यामुळे जीवन अधिक चांगले केले आहे.

मूळ लेखिका- सुझी वेल्श
(`विनिंग` या बेस्टसेलरची सहलेखिका)
अनुवाद- विदुला टोकेकर
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे- १६८

किंमत- १६० रुपये.

Thursday, February 16, 2012

एका पायरीवर





स्वप्न विखुरतात. सत्य भेडसावू लागतं. एक अनामिक भय ग्रासून टाकतं. या भयावर मात करण्यासाठी वेगळेच मार्ग अवलंबले जातात आणि खोल गर्तेत जाणा-या पाय-या एक-एक करुन उतरल्या जातात...आणि शेवटी पाय-या उरतच नाहीत.
जितक्या पाय-या उतरल्या गेल्या , त्या पुन्हा चढायच्या आणि पुन्हा समपातळीवर यायचं,की तिथेच खाली थांबायचं, हा प्रश्न ज्याच्या त्याचा. एक-एक पायरी चढण्यासाठी मात्र मनाची खंबीरता आणि सत्याची जाणीव सातत्याने असायला हवी. आणि ती ज्याची त्यानेच मिळवायला हवी.

वैष्णवीसारख्या अनेक स्त्रीया असतील...स्त्रीच का? पुरुषही असतील. स्वप्नांना सत्य मानणारे...आणि ती असत्य आहेत हे जाणवलं, की खोल गर्तत जाणारे... पण कदाचित त्या गोल गर्तेतून पुन्हा स्वतःला खेचून उर्ध्व दिशेने प्रवास करणारी..एखादीच असेल..वैष्णवी!

घुसमटणा-या जिवाला मोकळी हवा हवी आहे,
भरभरुन श्वास घेण्याकरता शुध्द हवा हवी आहे.
प्रश्न एकच आहे...

मोकळी हवा, भरभरून श्वास, पावसाची सर, हलकं तरंगणं,
हळुवार गुणगुणणं, मनाला सांभाळणं, आधार देणारं
असा तू होणार आहेस का?

(पुस्तकाच्या प्रस्तवनेतून)


लेखिका- स्वाती चांदोरकर
पृष्ठे- १६६
किंमत- १६०
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

नारायण मूर्ती



मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य

`इन्फोसिस` ह्या जगप्रसिध्द सॉफ्टवेअर कंपनीच्या संस्थापकांपैकी आणि देशातल्या प्रमुख उद्योगपतींपैकी एक, अशा नारायण मूर्तींच्या आयुष्याची कथा ही खरोखरच दंतकथा वाटेल अशी आहे.

ती वाचताना कित्येकदा वाचक थक्क होतो आणि कधी कधी तर सहानुभूतीनं काही वाचकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. एखादी व्यक्ती इतक्या उच्च स्थानावर कशी पोचू शकते, हे नारायण मूर्ती ह्या व्य़क्तिच्या आयुष्यावर नजर टाकली तर समजू शकतें..

त्यांच्या आयुष्यात काय आणि कसं कसं घडत गेले, हे इथ. सांगणं उचित ठरेल, कारण ते वाचल्यावरच, अनंत अडचणी येऊनही ते यशाच्या शिखरावर कसे पोचले हे समजू शकेल..


हे कोणाला खरं वाटेल?- की...
आरय.आय टी. मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथ शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना शिक्षण देण्याइतके पेसे नव्हते..


मुळ लेखक- एन. चोक्कन
अनुवाद- अंजनी नरवणे
पृष्ठे- ११०
किंमत- १२० रुपये.