
स्वप्न विखुरतात. सत्य भेडसावू लागतं. एक अनामिक भय ग्रासून टाकतं. या भयावर मात करण्यासाठी वेगळेच मार्ग अवलंबले जातात आणि खोल गर्तेत जाणा-या पाय-या एक-एक करुन उतरल्या जातात...आणि शेवटी पाय-या उरतच नाहीत.
जितक्या पाय-या उतरल्या गेल्या , त्या पुन्हा चढायच्या आणि पुन्हा समपातळीवर यायचं,की तिथेच खाली थांबायचं, हा प्रश्न ज्याच्या त्याचा. एक-एक पायरी चढण्यासाठी मात्र मनाची खंबीरता आणि सत्याची जाणीव सातत्याने असायला हवी. आणि ती ज्याची त्यानेच मिळवायला हवी.
वैष्णवीसारख्या अनेक स्त्रीया असतील...स्त्रीच का? पुरुषही असतील. स्वप्नांना सत्य मानणारे...आणि ती असत्य आहेत हे जाणवलं, की खोल गर्तत जाणारे... पण कदाचित त्या गोल गर्तेतून पुन्हा स्वतःला खेचून उर्ध्व दिशेने प्रवास करणारी..एखादीच असेल..वैष्णवी!
घुसमटणा-या जिवाला मोकळी हवा हवी आहे,
भरभरुन श्वास घेण्याकरता शुध्द हवा हवी आहे.
प्रश्न एकच आहे...
मोकळी हवा, भरभरून श्वास, पावसाची सर, हलकं तरंगणं,
हळुवार गुणगुणणं, मनाला सांभाळणं, आधार देणारं
असा तू होणार आहेस का?
(पुस्तकाच्या प्रस्तवनेतून)
लेखिका- स्वाती चांदोरकर
पृष्ठे- १६६
किंमत- १६०
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
No comments:
Post a Comment