Saturday, October 29, 2011

रामायणातील पात्रवंदना



रामायणातील पात्रांचा विश्लेषणात्मक अभ्यास
आपण सर्वच जण लहानपणापासून रामायणातील गोष्टी ऐकत मोठे झालो. आजही कॉमिक्स, पुस्तकं, टीव्ही, चित्रपट या सगळ्या माध्यमांमधून आपण लहान-थोर सगळेच रामकथा बघत, वाचत असतो.
फार थोड्यांनी माहित असेल की, भारतातील भाषांमध्ये व वेगवेगळ्या देशांमध्ये मिळून तीनशेच्यावर लहान मोठी रामायणं लिहली गेली आहेत. बौध्द, जैन, मुस्लिम रामायणंही आहेत ! आर्थात मूळ अधिकृत ग्रंथ महर्षी वाल्मिकी लिखितच.
ब-याचजणांना हे वाचूनही आश्चर्य़ वाटेल की वाल्मिकी रामायणाप्रमाणेच श्रवणबाळाची कथा वेगळी आहे. जनक राजानं सीतेचं स्वयंवर मांडलच नव्हतं, रावण अत्यंत विद्वान व धार्मिक शिवभक्त होता आणि कूबेराचा सावत्र भाऊ होता, लक्षुमणानं `लक्ष्ममणरेषा` काढलीच नव्हती ! आणि मुख्य म्हणजे रामायणाच्या महत्वाच्या व्यक्तींचे स्वभाव, गुणदोष, कोणत्या घटनेत कोण कसं आणि का वागलं, विरोधाभास कोणते, या सर्वांचा आपण विचार करतो ?
पुस्तकात तटस्थ भूमिकेतून, सर्वांबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही सर्व व्यक्ती व घटनांचं सुंदर विष्लेषण केलं आहे. ते वाचून त्यावर विचार करुन आपण केवळ अंधश्रध्दाळू न राहता डोळस आणि सश्रध्द बनू शकतो.
आपल्या संस्कृतीची भागीरथी असं रामचरित्र नव्यानं समजावून घेऊ या !

लेखक- दिनकर जोषी
अनुवाद- अंजनी नरवणे
पृष्ठे-१६४
किंमत- १८० रुपये.


राम
रामाने त्याच्यामधील देवत्वाचा असा स्वीकार कधीही केलेला नाही. उलट, एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे जे खरं हितकारक आहे आणि जे ऐहिक सुख देणारं आहे, त्यांमधल्या संघर्षाच्या त्रासाला तोंड दिलं आहे. संकटं आली तेव्हा कधी धीरोदात्त वीरपुरुषासारखं त्यांना तोंड दिलं आहे. विजय मिळविला आहे.
तर कधी व्याकूळ होऊन रडलाही आहे. कधी माता-पिता, बंधू, पत्नी यांच्यासाठी आभाळाएवढं प्रेम व्यक्त केलं आहे, त्याग केला आहे; तर कधी त्यांच्याशी न समजण्यासारखंही वागला आहे.
हे सगळं आपण तेव्हा बघू आणि समजू शकतो, जेव्हा आपण रामाला परमेश्वर म्हणून नाही तर एक मनुष्य म्हणून, दशरथ आणि कौसल्येचा पुत्र म्हणून, अयोध्येचा राजकुमार म्हणून, भरत किंवा लक्ष्मणाचा भाऊ म्हणून, सीतेचा पती म्हणून, सुग्रीव किंवा बिभीषणाचा मित्र म्हणून, हनुमानाचा स्वमी म्हणून आणि रावणाचा शत्रु म्हणून – असा वेगवेगळ्या मानवी नात्यांमध्ये बघू शकू. परमेश्वराच्या पूर्णत्वातून नाही, पण मनुष्याच्या अपूर्णत्वातून रामाचा विचार केला; तर त्यातून जो राम दिसतो, तो आपल्या मनाला जास्त भिडणारा आणि वंदनीय वाटेल.
( पुस्तकाचल्या `राम` या प्रकराणला काही भाग)

Monday, October 24, 2011

लव्हिंग नॅटली




एका आईच्या आशावादाची आणि विश्वासाची कसोटी अरूबा अपहरणनाट्याची आणि त्यानंतरच्या भ्रष्ट राजकारणाची सत्यकथा
२००५च्या मे महिन्यामध्ये बेथ हॉलोवेला तिची मुलगी नॅटली तिच्या हायस्कूल सीनीयर क्लासच्या ट्रिपला गेलेली असताना अरूबा बेटावरुन बेपत्ता झाल्याचा भयानक फोन आला.

ह्या घटनेनंतर चार वर्षे झाल्यानंतर बेथने तिच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची ही कथा आणि ह्दय पिळवटून टाकणारा तिचा ते कसोटीचा काळ, तसेच ज्या अतूट विश्वासाच्या जोरावर तिने ह्या परिस्थितीशी झुंज दिली, त्याबद्दल जगाला सांगायचे ठरविले.
मुलाच्या शोधासाठी बेथने पूर्णपणे समर्पित स्वयंसेवकांच्या ताफ्यासह अथक परिश्रम घेतले. तरीही यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत होते आणि अजूनही आहेत.

घटनेच्या या कथनातून भ्रष्ट राजकारणाचे जे दर्शन घडते, त्यामुळे `सत्तेपुढे शहाणपण चालत नाही` ह्याच वचनाचा प्रत्यय येतो.

एका आईच्या हिमतीची, ताकदीची, समर्थपणाची आणि अढळ प्रेमाची ही प्रेरणादायी सत्यकथा आहे!

मूळ लेखक- बेथ हॉलोवे
अनुवाद- पूर्णिमा कुंडेटकर
पृष्ठे- १९८
किंमत- २४० रुपये.


आजही आपल्याला माहित नाही की नॅटली हृलोवेच्या बाबतीत काय घडले. वॅन डर स्टूल कुटूंबाने तिच्या मृत्यूबद्दल पश्चाताप व्यक्त केल्याचा आभास निर्माण करणारे चित्रिकरण जरी करण्य़ात आले असले ती अजूनही अशी अफवा आहे की ती अजून जिवंत आहे आणि तिला लैंगिक गुलामीसाठी विकले गेले. तिचे शरीर सापडल्याशिवाय, हॉलोवे कुटुबाचा शोधही थांबणार नाही आणि ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाहीत.
लव्हिंग नॅटली हा अरुबा सरकारवर लागलेला एक कलंक तर मानला जाईलच, पुरंतु त्याचबरोबर ही एक विश्वासाची कसोटीही आहे. बेथ हॉलोवेने तिच्या वैयक्तिक दुःखातून प्रेरणा घेऊन बदलाची नांदी घडविली आहे. तिने सेफ ट्रॅव्हल्सची स्थॉपना केली आणि देशभरातील शाळा, चर्च, कायद्याची अंमलबजावणी करणारे गट आणि इतर संस्थामध्ये सुरक्षित प्रवासासाठी चळवळ पसरविली.
(ज्यांना ह्यमध्ये रस असेल त्यांनी अधिक माहितासाठी संपर्क साधावा- info@traveledworkshop.com)
-हार्टकोर्ड पुस्तक परिक्षक
-२४ जून, २००९