Thursday, May 17, 2012

सरवा




आपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि गुसरा ग्रामीण वाचक.
ग्रामीण भागातल्या लोकांना काही शहरी शब्द परिचयाचे नसतात आणि शहरी लोकांना ग्रामीण शब्द परिचयाचे नसतात.
`स र वा` हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही.
कोरडवाहू जमिनित भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात; काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे `स र वा ` वेचणं.
ज्यांना धान्याचे मोल फाऱ कळालेलं असतं ते `स र वा` वेचतात.


नाटक , कादंबरी, लघुकथा, ललित लेख यांचं पीक निघाल्यावर लेखकापीशी `स र वा` पडलेला राहतो.
तो वेचण्याची चिकाटी दाखवावी, असं मी म्हणत होतो.
जे गोळा झालं, ते म्हणजे पसा-कुडता.
त्यात दाणे निघतील, खडे-मातीही निघेल.
सरव्यात हेही येतंच.

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३४
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्मी
तिसरी आवृत्तृ मे, २०१२

अशी माणसः अशी साहसं



जीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात.
स्वतःच्याच पावलांनी नव्या वाटा पाडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे अगदी थोडे!
या थोड्यांमधलेच काही...

सिंदबादप्रमाणे समुद्र ओलांडून सातद सफारी करणरा `टिम सेव्हरिन..`

अफ्रिकेतल्या गोम्बे नॅशनल पार्कमध्ये राहून चिपांझी वानरांवर संशोधन करणारी `जेन गुडाल..`

उत्तर ध्रुवाकडील आर्क्टिकच्या ओसाड प्रदेशात प्रवास करणारा `फर्लं मोवॅट`.

अफ्रिकेतील टांझानियाच्या लेक मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जंगली हत्तींच्या कळपात चक्क चारपाच वर्षे राहणारी `ओरिया`.
नाईल नदी तरुन जाण्याच्या जिद्दीनं एकाकी प्रवास करणारा `कूनो स्टुबेन.`

पक्षिजीवनाचा पन्नास वर्ष अभ्यास करणारे पक्षिनिरिक्षक `सलीम अली.`

फॉरेस्ट खात्यात अधिकारी असूनही झाडांच्या सावलीत वाढलेले आणि उघड्या रानात जन्मलेले निसर्गनादी `मारुतराव चितमपल्ली.`.


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १६८
किंमत- १६० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२

पांढ-यावर काळे




पक्षांचे जसे वर्गीकरण केले जाते, तसे `पांढ-यावर काळे` करणा-या लेखकांचेही होऊ शकते
ते असे-

पौराणिक लेखक- क्रौंच पक्ष्याएवढा
ऐतिहासिक लेखक- पौराणिकाएवढा
विनोदी लेखक- राघूएवढा
मध्यमवर्गीय लेखक- कबुतराएवढा
झोपडपट्टी लेखक- राजगिधाडाएवढा
ग्रामीण लेखक- गावठीकोंबडी एवढा
बाल-लेखक- मुठीएवढा
भरड (खरड) लेखक- टिटवीएवढा


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १६५
किंमत- १७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे, २०१२


`द बुक ऑफ ईंडियन बर्ड्`स हे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने प्रसिध्द केलेले पुस्तक वाचकांनी पाहिले असेल.
आपल्या भारत देशात आढळणा-या सर्व पक्ष्यांची माहिती आणि रंगीत चित्रे त्या पुस्तकात पाहावयास मिळतात.
पक्ष्यांचा आकार (size), तो दिसतो कसा, खातो काय, उडतो कसा, शब्द कसा करतो (field character), त्याच्या सवयी काय असातात (habits) आणि तो केव्हा , कुठे, कसली व किती अंडी घालतो (nesting)
यांची मनोरंजक पण शास्त्रीय माहिती लेखकाने या पुस्तकात दिलेली आहे. पक्षिनिरीक्षणाचा ( bird-watching)) छंद असणा-यांना हा ग्रेथ फारच उपयुक्त आहे.
त्याच धर्थीवर प्रस्तुत लेखकाचा हा एक नम्र प्रयत्न आहे.

एक उदाहरण


मध्यमवर्गीय लेखक
आकारः कबुतराएवढा
दर्शनः `क्लार्क ग्रेड टू` सारखे. डोळ्यावर जाड चष्मा. शरीरसंपदा खर्ची पडलेली (किवा मोडून खाल्लेली) दिसते.
आढळः सर्वत्र
सवयीः हा कुठल्या तरी पेठेत दिसतो. तेच त्याचे विश्व असते. घुमता येत नाही. चिर्रSचिर्रS असा शब्द काढतो.
साधेसुधे जीवन आणि इतर मध्यमवर्गीयांची दुःखे हे खाद्य. लहानपणीच याचे पंख छाटतात. त्यामुळे त्याला उंच भरारी मारता येत नाही. पिंज-यातसुध्दा जनन होते.
उप्तादनः जुले ते ऑक्टोबर; परंतु सप्टेंबर मध्ये बहर असतो. संख्या बेसुमार.

( `पांढ-यावर काळे` या पुस्तकाच्या `लेखकदर्शन` यातला हा मजकूर)

Monday, May 14, 2012

चित्रे आणि चरित्रे





आपल्या छंदातूनच आपली उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटी- दांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात की, ज्यांचा छंद आणि उपजीविकेचे साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी त्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळविण्यासाठी ह्या छंदाचा आणि स्वतःची उपजीविका करणा-या खेळाचा बोल-बोल म्हणता धंदा होतो. आणि कसलाही धंदा करायचा म्हटला, की माणूस म्हणून आपण उणे-उणेच होत जातो.

मी माझा आयुष्यातली पहिलीवहिली कमाई चित्रकलेवरच केली आहे आणि पहिलीवहिली नोकरी केली, तीही चित्रकार म्हणूनच. माझ्या अत्यंत आवडीचा हा विषय., पण तो मला पुरा अभ्यासता आला नाही. याचं कारण म्हणजे रंग, कागद, कुंचले ह्य चित्रकलेच्या साधनांना पैसे पडत होते. अभ्यासासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर असल्या मोठ्या शहरात राहावं लागत होतं. त्या मानानं लेखनासाठी लागणारी साधनं स्वस्त होती. ते कुठही बसून करता येण्यासारखं होतं. वयाची अत्यंत सुंदर अशी पंधरा वर्षे प्रयोगासाठी खर्च करुनही लिहिण्याचा छंद हे उपजीविकेचे साधन मला करता आईलं नाही, आणि मनूनं ज्याला श्र्ववृत्ती म्हणून त्याज्य असं सांगितल आहे, ती सेवावृत्ती पत्करावी लागली.


अजूनही मधून-मधून रेखाटनं करतो. स्वतःला हरवून जावं, अशी चित्रकलेशिवाय दुसरी काही वस्तू मला अजूनतरी मिळालेली नाही.



(``रंग रेषांचे मृगजळ` यातून घेतलेला हा मजकूर)


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- २०४
किंमत- २०० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२

रानमेवा



मोठ्यात मोठी खरेदी केवढी असावी- हत्ती एवढी!
तानाजीला दंड झाला, शिक्षा झाली गुन्हा नसताना;
खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र- सुटका झाली!
श्रीमंत होण्यासाठी वेडसर गणाने आधार घेतला चक्क- इंद्रजालचा!
मिरा आणि सुबाची जातविरहित घट्ट मैत्री तुटली-बावामुळे!

..अशाच अवीट गोष्टींचा रानमेवा!


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८०
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२


---------------------------------
भूतकाळाकडे पाहणा-या दुर्बीणीचे आटे फिरवून तो काळ हात-अंतरावर आणला, तर मला असे दिसून येते की, मी कोणीही नसताना मी कोणीतरी वेगळा आहे, असे मला फार तीव्रतेने वाटते होते... असे आपल्या लेखनाबद्दल प्रेरणा तपासताना तात्यांना म्हणेज व्यंकटेश माडगूळकर यांना वाटे. त्याचें हे वेगळेपण शोधायचा प्रय्तन करावा, असे त्यांची मुलगी म्हणून, त्यांच्या लेखनाची निस्सीम चाहती म्हणून मला नेहमी वाटत आले. त्यांचे चौफेर, बहुविध, शतरंगी साहित्य आणि जीवन याकडे कुतूहलाने पाहणे हा माझा प्रेमाचा, ध्यासाचा, छंदाचा विषय आहे. पण त्यावर भाष्य करावं, असे सामर्थ्य माझ्या ठायी नाही की अधिकारही नाही.
त्यांच्या विपुल साहित्यातून काही अप्रकाशित कथा हाती लागल्या. `माझ्या लिखामागची कळसूत्रे` हा लेखही मिळाला.. तेव्हा त्यांच्या पहिल्या - वहिल्या कथेची `काळ्या तोंडाची` या कथेची आठवण झाली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी लिहलेल्या कथेला पुन्हा वाचकांसमोर आणावं अशी कल्पना आली.
प्रस्तुत संकलानात त्यांच्या अप्रकाशित कथा समाविष्ट आहेत. काही फार जुन्या पुस्तकातल्या आहेत, तर काही मला आवडलेल्या आहेत. रसिक, अभ्यासक, समीक्षक, साहित्यिक यांच्या प्रेमाला, समीक्षेला सामारं जाऊन त्यांचं साहित्य काळाच्या कसोटीवर उभं आहे. त्यात प्रस्तुत संकलनाची भेट आवडावी, अशी आहे.


(पुस्तकाच्या `ज्ञानदा नाईक` यांनी लिहलेल्या मनोगतातून साभार)

माणदेशी माणसं



स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले त्यात `माणदेशी माणसं`चा समावेश होतो.
या व्य़क्तिचित्रात जुन्या कथेततील गोष्ठ तर आहेच, पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे.
अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने ही रेखाटलेली हि चित्रे अस्सल मराठी आहेत.
दरिद्री माणदेशातील, सामान्य जीवनातील न संपणारं दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगूळकर सांगतात.
हे दुःख पाहिलं की मन भांबावतं. माणसं सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात असा उदार विचार मनात येतो.
जीवनातील हे कारुण्य माडगूळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहे....
त्यानुळं त्यांची ही माणसं आपल्याला विसरता येत नाहीत.
त्यांची आठवण झाली की ती मनाला अस्वस्थ करुन टाकतात...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२४
किंमत- १२५ रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तेरावी आवृत्ती- मे, २०१२

Sunday, May 13, 2012

बाजार





पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले.
निळू म्हणासा, चला, पळा! ह्याला निवा-याला ठेवले पहिजे.
आम्हाला कुणाच्याही घरात उंटाला ठेवायचे होते,
पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती.
माझ्या घरात उंट मावत न्व्हता. निळूच्या घरात मावत नव्हाता.
देवळात मावत नव्हता उंटाला कुठेच निवारा नव्हता.
मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता.

माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता.
कारण तो सर्वात जास्त मोठा, उंच होता.
अचानक बाहेरुन परका आलेला होता.
पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली.
मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले.
त्याचा भलामोठा देह खाली आला.
मान लांब करुन त्याने भुईवर टाकली.
उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले....

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १०४
किंमत-११० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे, २०१२

कोवळे दिवस


चार भिंतीबाहेरची प्रत्येक प्रभात ही असाच नवा जोम,
नवे चैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे.
याच कल्याणप्रद घटकेला पाखरांना गणे स्फुरते,
कळीचे उमलून फूल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात..

अजवर मानवजातीच्या कल्य़ाण्य़ाचे जे जे म्हणून विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले किंवा लिहले गेले, तेही अशाच वेळी स्फुरले असावेत.....


अशाच एका मनस्वी कलाकाराचे आपल्या तरुण्यातील `कोवळे दिवस`...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३६
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सहावी आवृत्ती- मे, २०१२

पांढरी मेंढरे हिरवी कुरणे


ऑस्ट्रेलिया ! कसा असेल हा देश?
ऐकून माहित होवं की, जगातली सगळी पिकं ऑस्ट्रेलियात होतात.
हवा तो उद्योग करु शकता..
समुद्रात बुड्या मारुन मोती काढा,
हजारो गुरं काढून त्यांचं मांस परदेशी पाठवा,
हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उप्तादन करा,
जगातलं लहान, मोठं, `सबकुछ मिलेगा` दुकान चालवा,
शेतकरी होऊन शोकडो एकर अननस, गहू, ऊस पिकवा
किंवा भांडवल घालून `ओपेल` खड्यांची खाण चालवा...

काहीही करायला या देशात संधी आहे.


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११४
किंमत-१२० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तीसरी आवृत्ती- मे, २०१२