Monday, May 14, 2012

रानमेवा



मोठ्यात मोठी खरेदी केवढी असावी- हत्ती एवढी!
तानाजीला दंड झाला, शिक्षा झाली गुन्हा नसताना;
खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र- सुटका झाली!
श्रीमंत होण्यासाठी वेडसर गणाने आधार घेतला चक्क- इंद्रजालचा!
मिरा आणि सुबाची जातविरहित घट्ट मैत्री तुटली-बावामुळे!

..अशाच अवीट गोष्टींचा रानमेवा!


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८०
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२


---------------------------------
भूतकाळाकडे पाहणा-या दुर्बीणीचे आटे फिरवून तो काळ हात-अंतरावर आणला, तर मला असे दिसून येते की, मी कोणीही नसताना मी कोणीतरी वेगळा आहे, असे मला फार तीव्रतेने वाटते होते... असे आपल्या लेखनाबद्दल प्रेरणा तपासताना तात्यांना म्हणेज व्यंकटेश माडगूळकर यांना वाटे. त्याचें हे वेगळेपण शोधायचा प्रय्तन करावा, असे त्यांची मुलगी म्हणून, त्यांच्या लेखनाची निस्सीम चाहती म्हणून मला नेहमी वाटत आले. त्यांचे चौफेर, बहुविध, शतरंगी साहित्य आणि जीवन याकडे कुतूहलाने पाहणे हा माझा प्रेमाचा, ध्यासाचा, छंदाचा विषय आहे. पण त्यावर भाष्य करावं, असे सामर्थ्य माझ्या ठायी नाही की अधिकारही नाही.
त्यांच्या विपुल साहित्यातून काही अप्रकाशित कथा हाती लागल्या. `माझ्या लिखामागची कळसूत्रे` हा लेखही मिळाला.. तेव्हा त्यांच्या पहिल्या - वहिल्या कथेची `काळ्या तोंडाची` या कथेची आठवण झाली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी लिहलेल्या कथेला पुन्हा वाचकांसमोर आणावं अशी कल्पना आली.
प्रस्तुत संकलानात त्यांच्या अप्रकाशित कथा समाविष्ट आहेत. काही फार जुन्या पुस्तकातल्या आहेत, तर काही मला आवडलेल्या आहेत. रसिक, अभ्यासक, समीक्षक, साहित्यिक यांच्या प्रेमाला, समीक्षेला सामारं जाऊन त्यांचं साहित्य काळाच्या कसोटीवर उभं आहे. त्यात प्रस्तुत संकलनाची भेट आवडावी, अशी आहे.


(पुस्तकाच्या `ज्ञानदा नाईक` यांनी लिहलेल्या मनोगतातून साभार)

No comments:

Post a Comment