Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Monday, May 14, 2012
चित्रे आणि चरित्रे
आपल्या छंदातूनच आपली उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटी- दांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात की, ज्यांचा छंद आणि उपजीविकेचे साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी त्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळविण्यासाठी ह्या छंदाचा आणि स्वतःची उपजीविका करणा-या खेळाचा बोल-बोल म्हणता धंदा होतो. आणि कसलाही धंदा करायचा म्हटला, की माणूस म्हणून आपण उणे-उणेच होत जातो.
मी माझा आयुष्यातली पहिलीवहिली कमाई चित्रकलेवरच केली आहे आणि पहिलीवहिली नोकरी केली, तीही चित्रकार म्हणूनच. माझ्या अत्यंत आवडीचा हा विषय., पण तो मला पुरा अभ्यासता आला नाही. याचं कारण म्हणजे रंग, कागद, कुंचले ह्य चित्रकलेच्या साधनांना पैसे पडत होते. अभ्यासासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर असल्या मोठ्या शहरात राहावं लागत होतं. त्या मानानं लेखनासाठी लागणारी साधनं स्वस्त होती. ते कुठही बसून करता येण्यासारखं होतं. वयाची अत्यंत सुंदर अशी पंधरा वर्षे प्रयोगासाठी खर्च करुनही लिहिण्याचा छंद हे उपजीविकेचे साधन मला करता आईलं नाही, आणि मनूनं ज्याला श्र्ववृत्ती म्हणून त्याज्य असं सांगितल आहे, ती सेवावृत्ती पत्करावी लागली.
अजूनही मधून-मधून रेखाटनं करतो. स्वतःला हरवून जावं, अशी चित्रकलेशिवाय दुसरी काही वस्तू मला अजूनतरी मिळालेली नाही.
(``रंग रेषांचे मृगजळ` यातून घेतलेला हा मजकूर)
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- २०४
किंमत- २०० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment