Thursday, May 17, 2012

पांढ-यावर काळे




पक्षांचे जसे वर्गीकरण केले जाते, तसे `पांढ-यावर काळे` करणा-या लेखकांचेही होऊ शकते
ते असे-

पौराणिक लेखक- क्रौंच पक्ष्याएवढा
ऐतिहासिक लेखक- पौराणिकाएवढा
विनोदी लेखक- राघूएवढा
मध्यमवर्गीय लेखक- कबुतराएवढा
झोपडपट्टी लेखक- राजगिधाडाएवढा
ग्रामीण लेखक- गावठीकोंबडी एवढा
बाल-लेखक- मुठीएवढा
भरड (खरड) लेखक- टिटवीएवढा


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १६५
किंमत- १७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे, २०१२


`द बुक ऑफ ईंडियन बर्ड्`स हे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने प्रसिध्द केलेले पुस्तक वाचकांनी पाहिले असेल.
आपल्या भारत देशात आढळणा-या सर्व पक्ष्यांची माहिती आणि रंगीत चित्रे त्या पुस्तकात पाहावयास मिळतात.
पक्ष्यांचा आकार (size), तो दिसतो कसा, खातो काय, उडतो कसा, शब्द कसा करतो (field character), त्याच्या सवयी काय असातात (habits) आणि तो केव्हा , कुठे, कसली व किती अंडी घालतो (nesting)
यांची मनोरंजक पण शास्त्रीय माहिती लेखकाने या पुस्तकात दिलेली आहे. पक्षिनिरीक्षणाचा ( bird-watching)) छंद असणा-यांना हा ग्रेथ फारच उपयुक्त आहे.
त्याच धर्थीवर प्रस्तुत लेखकाचा हा एक नम्र प्रयत्न आहे.

एक उदाहरण


मध्यमवर्गीय लेखक
आकारः कबुतराएवढा
दर्शनः `क्लार्क ग्रेड टू` सारखे. डोळ्यावर जाड चष्मा. शरीरसंपदा खर्ची पडलेली (किवा मोडून खाल्लेली) दिसते.
आढळः सर्वत्र
सवयीः हा कुठल्या तरी पेठेत दिसतो. तेच त्याचे विश्व असते. घुमता येत नाही. चिर्रSचिर्रS असा शब्द काढतो.
साधेसुधे जीवन आणि इतर मध्यमवर्गीयांची दुःखे हे खाद्य. लहानपणीच याचे पंख छाटतात. त्यामुळे त्याला उंच भरारी मारता येत नाही. पिंज-यातसुध्दा जनन होते.
उप्तादनः जुले ते ऑक्टोबर; परंतु सप्टेंबर मध्ये बहर असतो. संख्या बेसुमार.

( `पांढ-यावर काळे` या पुस्तकाच्या `लेखकदर्शन` यातला हा मजकूर)

No comments:

Post a Comment