
एक विचार प्रवृत्त करणार तसच मनाला गुंगवून टाकणारं पुस्तक
कोबा! वर्णद्वेषाच्या वणयात होरपळणाऱ्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या
भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी!
गो-या लोकांच्या एका शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या
स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वत:च्या जगापासून दूर, त्या गो-याच्या जगात नेलं जातं.
त्यांच्या त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला.
त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते
ती म्हणजे जर तिला स्वत:च्या जमातीकडून बहिष्कृत हायचे असेल,
त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे,
त्यांचा त्याग करावाच लागेल.
अखेर तिलाच दोषी ठरवणार्या गो-याच्या त्या अत्याग्य कायद्यांच्या मायमातून सर्वस्व पणाला लावणे
हाच कदाचित त्यावर उपाय असू शकतो. एका नष्ट होऊ घातलेल्या संस्कृतीच्या जीवनशौलीच्या अंतरंगाची
दुर्मिळ झलक दाखवणारी ही कादंबरी हे महाकायच आहे सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची
ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे.
कँडी मिलरचं श्रेय हेच आहे की एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय यक्त केला आहे.
ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तिला मातीचा स्पर्श आहे.
मूळ लेखक : Candi Miller
अनुवादक : वैजयंती पेंडसे
पृष्ठे : 222 किंमत : 200
No comments:
Post a Comment