Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, May 10, 2011
सर्चिंग फॉर डॅडी
ख-या वडिलांचा शोध घेण्याच्या धुंदीत मोठ्या हिकमतीन तीन फाइल मिळवली.
त्याच्या आधारान एक फोटो आणि तिला दोघांच्यात साम्य दिसू लागल.
पण खरच ते तिचे वडील होते? की....?
ती चार वर्षांची असताना तिला मरून जावंसं वाटलं. आपल्यावर प्रेम करणारे आईवडील आपल्याला मिळतील अशी लहानग्या ख्रिस्तीनची अपेक्षा होती, पण आधी आनाथालयांमध्ये आणि नंतर बाहेरच्या जगात ठोकरा खाताना तिच्या वाट्याला काय आलं, तर फक्त अवहेलना, तिरस्कार, अपमान आणि विलक्षण एकाकीपणा. एकाकी ख्रिस्तीननं इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात भयंकर खुन्याशी आपलं नातं आहे असं मानलं. त्या परिस्थितीपेक्षा आयुष्यात आणखी भीषण ते काय असणार असं तिला वाटलं खरं, पण सत्य काय ते तिला लवकरच कळणार होतं.
मूळ लेखक : ख्रिस्तीन जोआना हार्ट
अनुवादक : डॉ. प्रमोद जोगळेकर
पृष्ठे : 260 किंमत : 250
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment