Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Monday, July 4, 2011
गूढ..प्रणयरम्य कादंबरी... स्क्रीम फॉर मी
काळजाचा थरकाप उडविणा-या आपल्या प्रत्येक लोकप्रिय कादंबरीतून वाचकांच्या अंगावर काटा उभा करत,
आपण सस्पेन्स कादंबरीची सम्राज्ञी आहोत हे करेन रोझ ह्या प्रतिभासंपन्न लेखिकेने आता निर्विवादपणे सिध्द केले आहे. डाय फॉर मी या गाजलेल्या कादंबरीची ही लेखिका आता आणखी एक काळजाचा ठोका चुकाविणारे कथानक घेऊन
वाचकांच्या समोर येत आहे.
एका छोट्याशा गावात अचानक एक भयप्रद खूनसत्र सुरू होतं. गाव पार हादरून जातं.
आपल्या कामात निष्णात असणारा एक धाडसी गुप्तचर अधिकारी आणि एक पिसाट विकृत खुनी ह्यांची आमने-सामने टक्कर होते..
मरणाच्या दारात उभ्या केलेल्या आपल्या सावजाला, तो विकृत खुनी वेडावत म्हणतो...
तुला वेदना असह्य होत असतील ना, तेव्हा माझ्या नावाने एक किंकाळी फोड....
स्पेशल एजंट डॅनियल व्हार्टानियन हा, तेरा वर्षापूर्वी घडलेल्या एका खुनाची सहीसही नक्कल करणा-या त्या खुन्याला
शोधून काढण्याचा विडा उचलतो..
नुकताच मारला गेलेल्या आपल्या कुविख्यात खुनी भावाजवळ सापडलेली काही छायाचित्रं, हाच डॅनियलपाशी एकमेव धागा असतो. खुनी इसमाचा शोध घेण्याच्या प्रवासात, त्याला आपल्याच कुंटुबातल्या काळ्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर मानवी अभद्र मनाच्या गूढडोहाचा तळही सापडतो.
ह्याच प्रवासात अलेक्स फॅलन ह्या सुंदर परिचारिकेची त्याची भेट होते.
तिची कहाणी ऐकून त्याला आपलाच भूतकाळ आठवतो. विशेष म्हणजे अलेक्सचा चेहरा आणि तेरा वर्षापूर्वी खून झालेल्या त्या मुलीच्या
चेह-यात कमालीचे साधर्म्य असते. गावातील प्रतिष्टित व्यक्ति या प्रकरणात गुंतलेल्या आहेत, त्या विकृत खुनी इसमांच्या यादीत अलेक्सचेही नाव आहे , हे डॅनियला समजते. दिवसागणित बळी
जाणा-या स्त्रीयांची संख्य़ा वाढू लागते. आता डॅनियलपाशी फारच थोडा अवधी राहिलेला असतो. त्या क्रुरकर्म्याला लवकरात लवकर शोधणं जितकं महत्वाचं असतं तितकं महत्वाचं असतं , अलेक्सचा जिव वाचविणे. कारण ते आता अलेक्सच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो....
लेखक- करेन रोझ
अनुवाद- दीपक कुलकर्णी
पुष्ठे- ५०९
किंमत ४८०
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment