Friday, October 21, 2011

बऊठाकुरानीर हाट


या लिखाणात अधूनमधून चैतन्याची लहर दिसून येते, याचा एक पुरावा की, ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्याकडून न मागता एक प्रशंसापत्र मिळालं होतं. ते इंग्रजी भाषेत लिहलेलं होतं. कोणा मित्राच्या निष्काळजीपणामुळे ते पत्र हरवून गेलंय. बंकिमांनी त्यात असं मत व्यक्त केलं होतं की, ही कादंबरी जरी लहान वयात लिहलेली पहिलीवहिलीच कादंबरी असली, तरी तिच्यात प्रतिभेचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी ह्या कादंबरीची निंदा केली नाही. अल्लडपणातून आनंद मिळविण्याजोगं असं काहीतरी त्यांना आढळलं होतं की, त्यानं त्यांना अचानक एका अपरिचित मुलाला पत्र लिहायला प्रवृत्त केलं. भविष्यात या लिखाणाची परिणीती काय होईल, हे अज्ञात असूनही त्यात त्यांना काहीतरी आश्वासक, आशादायी आढळलं. त्यांच्याकडून मिळालेले हे कौतुकाचे शब्द माझ्यालेखी बहुमोल होते.
-रवींद्रनाथ टागोर

प्रत्येक दीर्घ निःश्वासावर विस्तृत टिका आणि स्पष्टीकरणे दिली जात होती.
विभेला अगदी हे सहन होईना, म्हणून ती निसटून बागेत आली होती.
सूर्य आज ढगांआडूनच उगवला होता, ढगांआडचं अस्तास गेला होता.
दिवस कधी मावळला आणि संध्याकाळ झाली हे समजले नाही.
संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सोनेरी रेषा उमटली होती, पण दिवस मावळताना ती विरुन गेली. अंधार घनटात होऊ लागला होता. दशदिशा झाकोळून गेल्या होत्या.
ओळीने असलेल्या सुरूच्या दाट बनातून फांद्याच्या वर इतका अंधार दाटला की, फांद्या एकमेकीत मिसळून गेल्या अन् सहस्त्र लांबलचक पायांवर भार देऊन प्रचंड विस्तृत निःस्तब्ध अंधार त्यावर रेलला आहे असं वाटत होतं.
हळूहळू रात्र होऊ लागली. राजवाड्यातले दिवे एकेक करुन मालवले गेले.

लेखक- रवींद्रनाथ टागोर
अनुवाद- मेधा बाळकृष्ण तासकर
पृष्ठे- १६०
किंमत- १६० रुपये

No comments:

Post a Comment