Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Monday, October 17, 2011
ग्रॅड पेरेंटस्
चिकन सूप फॉर द सोल
ह्दयाची कवाडं उघडणा-या आणि आजी-आजोबांच्या मनाचं चैतन्य जागृत करणा-या गोष्टी
लेखन व संकलन- जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मेलडी मॅकार्टी, हॅनॉक मॅकार्टी
आजी-आजोबा नातवंडं यांच्यातल्या ह्द्य नात्यातले अनेक लोभस पदर उलगडून दाखवणा-या या सुंदर सत्यकथा!
या कथा अमेरिकेतील असल्या तरी अगदी आपल्या वाटतात. कारण या नात्याला स्थळ-काळचं बंधन नाही. आजकालच्या जीवनपध्दतीमुळे आजी-आजोबा आणि नातवंडं एकमेकांपासून कितीही दूर रहात असली तरी टेलिफोन, कॉम्प्युटर, व्हिडीओ, कॅमेरा या अधुनिक साधनांमुळे ती कायम एकमेकांच्या जवळ असतात. संस्कार करणारे, दुःखात मनाला उभारी व धीर देणारे, नातवंडांबरोबर हसणारे-खेळणारे,
खाऊ-पिऊ घालणारे आजी-आजोबा ज्यांना लाभतात, ती भाग्यवान मुलं आयुष्यात पुढे जाऊन उत्तम माणूस व नागरिक बनतात.
सकारात्मक दृष्टी ठेवून आयुष्यातल्या विविध घटनांना तोंड दिलेल्या साध्यासुध्या सामान्य माणसांच्या या सत्यघटना.
या कथा तुमच्या ह्दयाला नक्कीच स्पर्श करतील आणि नातवंडांच्या रुपानं केवढी मोठी देणगी परमेश्वर आपल्याला देत असतो, याची परत एकदा नव्यानं जाणीव करुन देतील.
पृष्ठे- ३२०
किंमत- २८० रुपये
अनुलाद- शीला कारखानीस
हे पुस्तक तयार करताना प्रत्येक कथेकडे आम्ही आजी-आजोबांच्या नजरेनं आणि हदयानं बघितलं. आमच्या नजरेसमोर उलगडणा-या या निष्ठा, सन्मान, प्रतिष्ठा, श्रध्दा आणि आयुष्यातल्या जबाबदा-या पूर्ण करण्याची वचनबद्धता सांगणा-या या गोष्टींनी आम्ही भारावून गेलो. आयुष्यभर केलेले अविश्रांत कष्ट आणि धडपड आणि त्यातुन मिळविलंलं निश्चल धैर्य आणि शहाणपणा यांच्या कथांनी आम्हाला प्रेरणा मिळाली. ज्या क्षणी योग्य तेच करुन आजी-आजोबा प्रेम दर्शवतात त्यानं आम्ही हेलावून गेलो. जगात अनेक प्रकारचे आजी-आजोबा आहेत. `नॉर्मन रॉकवेल इलस्ट्रेशन्स` मधल्या गोष्टीतल्या आजी-आजोबांपासुन ते विश्वास ठेवता येऊ नये इतक्या कार्यक्षम आजी-आजोबांबर्यंत, हे उद्यमशील लोक सतत विमानप्रवास करीत असतात, ते जी कामं करीत असतात त्यातून निवृत्त होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. इंटरनेट,ई-मेलचं नवं तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करुन घेतलयं. ते त्यांच्या समाजासाठी कुणीही करु शकणार नाही असं आवश्यक कार्य करत असतात. या आजी-आजोबांची आयुर्मयादाही वाढलेली आहे. कुठलीही परिसीमा न बाळगता त्यांना सतत अधिकाधिक कार्य करायचं असतं, परंतु तरीही त्यातला प्रत्येक जण त्यांच्या नातवंडांसाठी अतिशय महत्वाचा असतो. आजकालच्या या अस्थिर युगात ते आपल्या नातवंडांपासून खूप दुर रहात असतील, पण तरीही ते आपल्या नाववंडांच्या आयुष्याला अर्थ, स्थिरता आणि सुरक्षितता प्राप्त करुन देणा-या बोटीच्या नांगराचं काम करीत असतात. काही आजी-आजोबा अत्यंत धैर्याने आपल्या नातवंडांना स्वतः वाढवत आहेत. आम्ही त्यांची प्रशंसा करतो.
( पुस्तकाच्या प्रस्तावनेतून)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment