Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Wednesday, May 23, 2012
ओझं
दलित जीवनावरील कथा
काठीच्या टोकावर टेकलेल्या दोन्ही हातांच्या पंजावर हनुवटी टेकून; देवा टक लावून साहेबाकडे पाहात होता. बघता-बघता त्याचे डोळे वटारले, तांबडे-लाल झाले, नाकपुड्या फुरफुरु लागल्या, दातांवर दात घट्ट बसले आणि दंडांना कापरे भरले.
डागदर ओरडला,
“ऐकतोस. काय, भ्यॅंचोत..”
देवा सटक्याने खाली वाकला आणि पायातले धुळीने भरलेले तुटके पायताण उपसून घेऊन ओरडला,
“अरं ए बांबलीच्या, चावडीचं जोतं उतरुन खाली ये. शिव्या देणारं तुजं थोबाड फोडतो ह्या तुटक्या जोड्यानं !”
दलित वाड्.मय ही संज्ञा आज ज्या अर्थाने रुढ झालेली आहे, त्यांच्या कितीतरी अगोदर एका दलिताच्या मनातील विद्रोहाची भावना टिपणारी `देवा सटवा महार` ही या संग्रहातील एक कथा.
या व अशा इतर अनेक कथांमधून व्यंकटेश माडगूळकर गावरहाटीतील दलित जीवन त्यातील दारिद्र्य, दुःख, संताप आणि अगतिकता यांसहित समर्थपणे रेखाटतात.
ग्रामीण आणि दलित असा एक बराचसा कृत्रिम भेद अलीकडील काळात मराठी साहित्यात रुढ होऊ पाहात आहे. माडगूळकरांच्या दलित जीवनावरील कथांचा हा संग्रह त्याल छेद देऊन मराठी ग्रामजीवनाच्या संदर्भात त्यांची एकसंघ अशी जाणीव निर्माण करणारा आहे.
संपादक
गो.म.पवार
पृष्ठे- १२६
किंमत-१५५ रुपये.
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment