Tuesday, August 23, 2011

ऐतिहासिक कादंबरी म्हणजे तारेवरची कसरत

- लीना सोहोनी


कादंबरीचे प्रकाशन करताना माधवराव चितळे.


ऐतिहासिक घटना , घडामोडी आणि व्यकितरेखांबाबत समाज जागरूक असतो. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी लिहिताना संबंधीत व्यक्तिरेखेबाबत आजपर्यंतचे संदर्भग्रंथ, त्याबाबतची मते, याचा सारासार विचार करून ती लिहावी लागते. अशा प्रकारची कादंबरी लिहिणे म्हणजे तारेवरची कसरत असते,असे मत ख्यातनाम लेखिका लिना सोहोनी यांनी व्यक्त केले.
सुवर्णा ढोबळे लिखित मी रूक्मिणी या कादंबरीचे पकाशन औरंगाबाद इथे मराठवाडा महसूल प्रबोधिनीत रविवारी झाले.
ऐतिहासिक कादंबरी लिहिताना लेखकास इतिहास आणि साहित्याचे भान ठेवून करावे लागते. असेही लिना सोहोनी यांनी म्हटले.
कार्यक्रमाचा समारोप ककताना माधवराव चितळे म्हणाले, रामायण, महाभारत या ऐतिहासिक ग्रंथांची अनेक भाषांतरे झाली आहेत. यातून जीवनमूल्ये प्रत्यक्षात आचरणात आणताना कशा प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावर मात कशी करावी याबाबतची शिकवण मिळते.
लेखिका ढोबळे यांनी आपल्या मनोगतात कादंबरी लिहिण्याची प्रेरणा स्वाध्याय परिवाराच्या संपर्कामुळे लाभल्याचे सांगितले.

(लोकमत दि. २२ .८.२०११ च्या औरंगाबाद अंकातून साभार)

No comments:

Post a Comment