Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, September 13, 2011
मी, संपत पाल
गुलाबी साडीवाली रणरागिणी
आमच्या गॅंगचं अस्तित्व ज्या गावात आहे तिथं गेल्या दोन वर्षापासून वृत्ती बदलू लागली आहे. आम्ही दररोज नवी केस लढतो. त्यातून आपण किती दूरचा पल्ला गाठलाय, हे मला समजतं. आमच्या संघटनेबाबतीत पुरूषांची वृत्तीही बदलली आहे. आमच्या गुलाबी साडीवाल्या बायकांचा ताफा मोहिमवर निघतो तेव्हा लोकांच्या मनावर त्याची छाप पडलीय हे लक्षात येतं. एखाद्या विशिष्ठ उद्देशाच्या समर्थनार्थ आमचं इकत्र येणं त्यांना विचार करायला लावतंय.
मला मनापासून वाटतं की, बायकांची एकी झाली , तर त्या जग बदलू शकतील. त्यांच्यामध्ये द्ढ ऐक्यभावना उपजतच असते आणि मोठी चळवळ उभारण्यासाठी हा अत्यावश्यक गुण आहे. याचा पुरावा म्हणजे गुलाबी साडीवाल्यांचे नवे गट स्थापन करण्यासाठी बायका मला दूरवरुन कुठून कुठून येऊन भेटतात. माझी थोरली मुलगी हिल्लीला- आतारीपासून ८० कि,मि, वर रहाते. तिनं मला सांगितलं की, तिचे बरेचसे शेजारी मी त्यांना संघटीत करावं म्हणून विशेष सहाय्य करायला सांगतात. माझ्या मुली एक दिवस माझ्याच पाऊलखुणा गिरवतील, याची मला खात्री आहे. आमच्या धमन्यात एकच रक्त वाहतयं. त्याही सामाजिक प्रश्नांविरुध्द लढा देतीच. त्या सगळ्या जणी शिवणकामाचे धडे आधीपासून घेत आहेत. ही कुठं सुरवात आहे.
नुकतेच मला काही प्रधान आणि NGO मॅनेजर भेटायला आले होते. माझ्या गॅंगच्या मॉडेलवर आधारित स्त्री-संघटनांबद्दलच्या त्यांच्या कल्पनांबद्दल त्यांना माझ्याशी सल्लामसलत करायची होती. पण आता या टप्प्यावर माझं प्रभावक्षेत्र विस्तारण्याला माझं प्राधान्य नाही. सध्याचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी अजून बरचं काही करायचं आहे.
मी, संपत पाल
मूळ शब्दांकन. अनी बरथॉड
अनुवाद- सुप्रिया वकील
द गार्डियन ने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये संपत पाल यांची निवड केली आहे.
गुलाबी गॅंग..गुलाबी गॅंग....
या साडीनचं आम्हाला लोकप्रिय बनवलं आहे....
पृष्ठे १९२ किंमत १७०
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment