Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Wednesday, July 11, 2012
नेव्हर टू रिटर्न
भटक्या जमातीतील मुलाच्या होरपळलेल्या बालपणाची सत्यकथा
एका हिरावलेल्या बालपणाची अंतःकरण पिळवटून टाकणारी सत्यकथा!
समाजकल्याण खात्यानं सॅंडी रिडला आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्या वेळी त्याच्या आईला कल्पनाही नव्हती की, तो तिच्या नजरेला जन्मात परत कधी पडणार नव्हता.
नेव्हर टू रिटर्न ही स्कॉटलंडमधील टिंकर ह्या भटक्या जमातीत जन्मलेल्या सॅंडी रिड व त्याची मोठी बहीण मॅगी ह्यांची एक विलक्षण गोष्ट आहे. कोवळ्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून व विशिष्ट जीवनपध्दतीपासून दूर केल्यानंतर त्यांच्या आयुशष्याची काय आणि कशी परवड झाली ह्याची ही गोष्ट आहे.
एका हिवाळ्यातील रात्री समाजकल्याण खात्याच्या अधिका-यांनी भटक्या जमातीच्या ह्या लोकांच्या जंगलातील तंबूवर छापा घातला. त्यांच्या छाप्याचा उद्देश होता, त्यांच्या सगळ्यात लहान मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना चांगले जीवन देणे, पण त्यांनी विचार केला होता तसे जास्त चांगले आयुष्य ह्या मुलांना मिळालेच नाही. शेवटी तर तो आपल्या ताब्यात असणा-या मुलांचे पध्दतशीर शोषण करणा-या कुप्रसिध्द `अंकल डेव्ह`च्या मगरमिठीत अडकला.
या एका पिढीतील मुलांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त केली गेली,एक संपूर्ण पिढीच आपले बालपण कसे हरवून बसली, याची ही एक धक्कादायक कहाणी आहे..या परिस्थितीवर आणि शोषणावर मात करुन एका मुलाने कशी तग धरली, ह्याचेही यात चित्रण आहे.
मूळ लेखक- सॅंडी रीड
अनुवाद- सुनिता कट्टी
पृष्ठे- २३०
किंमत- २४० रुपये
मुखपृष्ठ- फाल्गुन ग्राफिक्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment