Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, July 10, 2012
अण्णा हजारे
भ्रष्टाचाराच्या विरोधातील भारतीय लढ्याचा चेहरा
भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा आणि तो दूर करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एकहाती लढ्याचा सर्वांगीण उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराविरुध्द कडक पावले उचलण्यासाठी , भ्रष्ट नोकरशहांना लगाम घालण्यासाठी आत्तापर्यंत कोणती विधेयके आणण्यात आली, नेमके काय प्रयत्न करण्यात आले, याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराविरुध्द कडक कायदा आणण्यात ज्यांनी अडथळे आणले त्यांच्याविरुध्द नागरी समाजाचा असलेला रागसुध्दा येथे नोंदविण्यात आला आहे.
नागरी समाजाच्या संतापाचे अण्णा हजारे यांनी व्यापक जनआंदोलनात रुपांतर केले. यामुळे यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडणे किती ताताडीचे आणि आवश्यक आहे, हे खासदारांना उमगले. भारतातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार आणि यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा आणि लोकांच्या कल्याणाचा कसा लचका तोडला जात आहे, याचा समग्र आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा गंभीर गुन्हा करण्या-या लोकांविरुध्द कारवाई करण्यास सध्याच्या कायद्यात कशा त्रुटी आहेत, यावरही हे पुस्तक झगझगीत प्रकाश टाकते.
आधी केले ; मग सांगितले, या न्यायाने अण्णांनी आयुष्यभर कार्य केले. ज्या माणसाला स्वतःचे कुटुंब नाही, संपत्ती नाही, बॅंकेत ठेव नाही, त्याने स्वतःला `फकीर` म्हणवून घेण्यात काहीही आश्चर्य नाही.
संपादक- प्रदीप ठाकूर आणि पूजा राणा
अनुवाद- धनंजय बिजले
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे- १३६
किंमत- १२५ रुपये
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment