Monday, January 2, 2012

द स्पिरिच्युअलीस्ट


उदास, पछाडणारे वातावरण, शृगांरिक गूढरम्यता व त्याबद्दलचे विचित्र आकर्षण
द स्पिरिच्युअलीस्ट



कधी कधी सत्य हा फार मोठा भ्रम असतो !
१८५६च्या बोच-या थंडीच्या रात्री एव्हेलिन अथरटनचा पती एका खास बैठकीमधून परत येताना त्याचा खून होतो.
त्याची पत्नी एव्हेलिनच खुनी असावी असा संशय घेतला जातो,
पण खुन्याचा शोध घेतल्याशिवाय तिला मात्र या किटाळातून बाहेर पडता येणार नसते. या वेळी तिच्या पतीचा जिवलग मित्र तिच्या मदतीला येतो. त्याने तिचे वकीलपत्र घेतलेले असते. पण याच वेळी परलोकविद्यच्या गूढ विश्वात तिचा प्रवेश होतो. ह्या ठिकाणी विलक्षण भारुन टाकणा-या मायकेल जॉर्डन या व्यक्तिशी तिची गाठ पडते. तिला खात्री असते की हा इसम लबाड आहे, पण त्याची मदतच तिला निर्दोष ठरविण्यासाठी उपयोगी पडणार असते.
जॉर्डनच्या सान्निध्यात तिचा प्रवेश एका विलक्षण चमत्कारिक विश्वात होतो. तिला मृतात्म्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात. या भीतादायक विश्वामध्ये ती एकाच वेळी खेळीयापण असते व खेळातील एक प्यादेपण!
त्यामुळे कुणावर, अगदी स्वतःवरही कसा विश्वास ठेवावा हे तिला समजेनासे होते.
तिची सासरची माणसे तर तिला खुनी ठरवून फासावर चढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. वेळ भर्रकन् निघून चाललेला असतो. भूतकाळातील पिशाचांना सामोरे जाण्याशिवाय तिला गत्यंतर नसते...


लेखिका - मेगन चान्स
अनुवाद- मुकुंद कुर्लेकर
पृष्ट- ३१२
किंमत- ३२० रुपये

No comments:

Post a Comment