Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Sunday, July 15, 2012
स्थूलतेला करा टाटा
डीव्हीडी असलेला मराठीतला पहिला `कॉम्बीपॅक...`
डॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे स्थूलते वरील संशोधन पुस्तकरुपाने येत आहे.
आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियामित व्यायाम ही त्रिसूत्री अंगीकारल्यास स्थूलतेवर विजय मिळविणे सोपे जाते.
स्थूलतेमुळे होणारे विविध आजार व उपचार यांची माहिती, प्रौढांबरोबरच सध्या लहान मुलांमध्ये आढळणारे स्थूलतेचे चिंता करायाला लावणारे प्रमाण याचा सखोल ऊहापोह या पुस्ताकामध्ये केला आहे.
स्थूल लोकांसाठी दैनंदिन आहार, धार्मिक उपवासाच्या दिवशीचा आहार, लग्न-समारंभातील आहार, हॉटेलमध्ये गेल्यास काय आहार घ्यावा यांसारख्या बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य !
ब-याच लोकांना वेळेअभावी घराबाहेर जाऊन `जीम`मध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही.
गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, लहान व तरुण मुले-मुली यांच्यासाठी खास Fat Burn करणारे सोपे व्य़ायामप्रकार या पुस्तकाबरोबरच्या डी.व्ही.डी. मध्ये देण्यात आले आहे.
लेखक- डॉ. आशिष बोरकर आणि डॉ. गौरी बोरकर
पृष्ठे- ८२
किंमत- ९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment