Saturday, July 2, 2011

`स`सुखाचा



जे आपण मिळवले आहे ते आपल्याला आवडत रहाणे हे जिवनातील खरे आव्हान आहे . य़ा पुस्तकात आपल्याला हवे ते कसे मिळवायचे याचा कानमंत्र दिला आहे ....`स`सुखाचा

जर तुमच्या घरातल्या भिंतींना तडे जायला लागले , तर तुम्ही काय कराल ?
प्रथम पयाबाबतची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न कराल .
जर तुमची झाडे सुकून पिवळी पडायला लागली ,
तर तुम्ही झाडांना हिरवा रंग देऊन ते ठीक करण्याचा
प्रयत्न कधी कराल काय ?
त्यापेक्षा तुम्ही झाडांना पाणी घालाल ,
तसेच जेव्हा आपण आपली प्रेमाची तळी भरतो ,
तेंव्हा आपली अनेक संकटे आपली आपणच नाहीशी होतात .
जसजसे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळत जातात .
तसतशी आपल्या आपली ओळख पटत जाते .

लेखक - जॉन ग्रे
अनुवाद - शुभदा विद्वांस

पृष्ठे- २९७
किंमत- २९०

Monday, June 27, 2011

हॅरी पॉटर आणि हाफ - ब्लड प्रिन्स


हॅरी पॉटर उन्हाल्याच्या सुट्टीत त्याच्या मावशी - काकांच्या घरी आलेला आहे.
हॅरी धस्तावाल्या नजरेने आपल्या खिड़की बाहेर पाहत प्रोफेसर डम्बलड़ोरांची वाट बघतोय.
काही कालापूर्वी त्याने आपल्या हेड मास्तराना सैतानी जादुगार लोर्ड वाल्डे मोट्रेशी जबरदस्त लढाई करताना पहिल होता. आणि प्रोफेसर डम्बलड़ोर खरोखरच त्याला घ्यायला त्याच्या मावशी-काकांच्या घरी येतील यावर हॅरीचा विश्वासच बसत नव्हता. त्याला इतक्या गडबडीने तिथून घेउन जाण्या सारख आणि हॅरी होग्वार्ट्सला परत जाण्या इतकीही वाट न पाहण्या सारख
झाल तरी काय होत?

मगलूच जग आणि जादूची दुनिया एकमेका मध्ये मिळून मिसलून जात असताना,
हॅरी होग्वार्ट्स मधल्या सहाव्या वर्षाची सुरुवातच मुली विलक्षण घटनांची झाली.

मूळ लेखक : जे. के. रोलिंग
अनुवादक : मंजूषा आमडेकर

पृष्ठे : 620 किंमत : 375

हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना


हॅरी पॉटरच होग्वार्ट्स जादू आणि तंत्र विद्यालयातल पाचव वर्ष सुरु होणार आहे.
बहुतेक विद्यार्थ्याना येते, तशी हॅरीला उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीच मजा येत नहीं.
ही गोष्ट खरी असली, तरी ही सुट्टी नेहमीपेक्षा जास्त वाईट गेली.

डसर्ली कुटुम्बिय त्याच्या आयुष्याचा नरक करून टाकत होते. फार काय, त्याचे खास खास मित्र
रोन आणि हरमाईनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते.
हॅरीला आता सगल सहन करण्याच्या पलीकडचा वाटत होत. या सगल्या वतावरणात बदल करण्यासाठी
तो वाट्टेल ते करायला तयार होता, पण तेवढ्यात त्याची उन्हाल्याची सुट्टी नाट्यमय रितिन आकास्मत संपली देखिल
होग्वार्ट्स च्या पाचव्या वर्षी हॅरीला जे काही कलाल, त्यान त्याच संपूर्ण जगच बदलल...

मूळ लेखक : जे. के. रोलिंग
अनुवादक : मंजूषा आमडेकर
पृष्ठे : 906 किंमत : 495

Saturday, June 25, 2011

अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी


वैयक्तीक बदलातील शक्तिशाली धड़े

अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी या पुस्तकात लेखक स्टीफन आर कवी हे
वैयक्तीक व व्यवसायीक प्रश्नांची उकल करण्याचा एक संपूर्ण
एकात्म, तत्त्व-केन्द्रित मार्ग आपल्यासमोर मांडतात.


मूळ लेखक : स्टीफन आर. कवी
अनुवादक : विदुला टोकेकर

पृष्ठे : 400 किंमत : 295

चिकन सूप फॉर द सोल(भाग-५)


....... जगभरात कोट्यवधी प्रतींची विक्री झालेली मालिका

मनाला अतिशय भावणाऱ्या हृदयस्पर्शी, स्फूर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी
सादर आहे तुमच्या आवडत्या 'चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाचा पाचवा भाग!

मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणाऱ्या या कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध
प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन साऱ्या पृथ्वीतलावर
सुगंधित वातावरण निर्माण होईल, शांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे.

हे 'चिकन सूप' चव घेत घेत चमचा-चमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता
आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता!

या भागातील सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखाद्या वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची
आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल.
एक लक्षात ठेवा तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी, स्फूर्तीसाठी भरपूर जागा आहे.

तेव्हा ह्या पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनात जरूर जपून ठेवा.

मूळ लेखक : मार्क व्हिक्टर हॅन्सन
अनुवादक : उषा महाजन

पृष्ठे : 360 किंमत : 300

चिकन सूप फॉर द सोल(भाग-4)


जगभरात कोट्यवधी प्रतींची विक्री झालेली मालिका.....

'चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागांप्रमाणे या चौथ्या भागात
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन ह्यांनी देशविदेशातनं, आत्मबळ वाढवणाऱ्या नव्या कथा मागवून
त्यांची मेजवानीच वाचकांना दिली आहे.

प्रेम, शिकवणूक, पालकत्त्व, बुद्धिमत्ता, अडचणींवर मात, स्वप्नपूर्ती, मृत्यू, वाइटातनं चांगलं शोधण्याची कला
अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेल्या हृदयस्पर्शी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून
वाचकांसमोर उलगडला आहे.

या कथांवर मनन-चिंतन करून तुम्हा-आम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल
आणि बिकट सद्य:परिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे,याबद्दल वादच नाही.

मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड
मार्क व्हिक्टर हॅन्सन
अनुवादक : उषा महाजन
पृष्ठे : 286 किंमत : 250

Friday, June 24, 2011

गर्नसी वाचक मंडळ


गर्नसी - इंग्लिश चॅनल आयलंड वरील एक निसर्ग रमणीय, चिमुकले बेट.
1946, जानेवारी, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय आणि गर्नसीलाही या युद्धाच्या झळा बसल्यात.
लंडनही या युद्धाच्या छायेतून वर येतंय. पुन्हा "जीवनाला' सामोरं जातंय.
"इझ्झी गोज टू वॉर' या पुस्तकाने प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलेली ज्युलिएट आता तिच्या पहिल्या पुस्तकासाठी
विषय शो­धतीये आणि तसा तिला तो मिळालाही गर्नसीकडून.
चार्लस् लँबचा नि:स्सीम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्यूलिएटचं नाव पाहून तिला पत्र ­धाडतो.
त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरूहोतो हा पत्रांचा सिलसिला.
"गर्नसी लिटररी अॅण्ड पोटॅटो पील- पाय सोसायटी' असे लांबलचक आणि मजेदार नामकरण झालेल्या
या वाचक मंडळातले अन्य सभासदही डॉसीच्या पाठोपाठ ज्यूलिएटचे "पत्रमित्र' बनतात.
युद्धाच्या गडद काळोख्या रात्रींमध्ये त्यांना जवळ आणलं या वाचक मंडळानं, त्यांना जिवंत ठेवलं या भेटीगाठींनी.
लोभस, गहिरी माणुसकी असलेली ही पात्रं एखाद्या सत्यकथेइतकी जिवंत उतरली आहेत.
त्यांच्या साध्यासुध्या आयुष्यातील करुण युद्धाच्या कहाण्या, मजेदार प्रसंग सारं काही ते आपल्या या नव्या
मौत्रिणींशी शेअर करतात.
त्यांच्या पत्रांतून ज्यूलिएटसमोर त्या अनोख्या बेटाविषयी, त्यांच्या आवडीनिवडी,
त्यांची आवडती पुस्तकं आणि "नाझी अंमला'तून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, मोकळा श्वास घेतलेल्या समाजजीवनाविषयी माहितीपट उलगडत जातो आणि विलक्षण भावबं­धानी हे रहिवासी तिच्याशी बांधले जातात. मग आपसूकच ज्यूलिएट गर्नसीच्या जलप्रवासाला निघते आणि याच बेटावर तिच्या आयुष्याला एक निर्णायक कलाटणी मिळते. काही करुणरसात भिजलेली, तर काही सौम्य विनोदाची पखरण असलेली ही स्नेहाद्र्र पत्रं म्हणजे शब्दांचा आनंदोत्सव आहे.
हा जल्लोष रसिक वाचकांनाही तितकाच भावेल यात कसलीही शंका नाही.

मूळ लेखक : मेरी अन शाफर
अनी बरोज
अनुवादक : मैत्रेयी जोशी
पृष्ठे : 248 किंमत : 250