Saturday, January 21, 2012

असे शास्त्रज्ञ, असे संशोधन




विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींवद्दल सामान्य माणसांच्या मनात नेहमीच कुतूहल असतं.
शास्त्रज्ञांचा विक्षिप्तपणा, त्यांची एककल्ली वृत्ती, संशोधकांची धडपड, पेटंट मिळाल्यानंतर एकाच पेटंटवर अमाप श्रीमंत बनलेल्या संशोधकांची कहाणी.,
ह्या गोष्टी सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं, हे पटवून देतात.
त्यामुळे अशा व्यक्ती घडल्या कशा? हे जाणून घ्यायचीही आपल्या मनात इच्छा असते.

ह्या पुस्तकाध्ये अशा मान्यवर शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या बाबतीतलं
कुतूहल शमविण्याची क्षमता आहे.
त्याच बरोबर ह्यामुळं तरुण वाचकांना अपणही; असं काहीतरी करायला काय हरकत आहे, असं वाटावं.
ही अपेक्षाही लेखकाला वाटते.
त्याच दृष्टीनं हे पुस्तक वाचावं, असं मात्र नाही.
ह्या शास्त्रज्ञांची धडपड वाचून वाचकांची करमणूकही होईल.
त्यामुळंही वाचकांनं हे पुस्तक वाचायला हरकत नाही.




लेखक- निरंजन घाटे
पृष्ठे- १९२
किंमत- १९०
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

(सुधारित दुसरी आवृत्ती)

लव्ह, मेडिसिन आणि मिरॅकल्स

अपवादात्मक रुग्णांच्या अनुभवातून एका शल्यचिकित्सकाने स्वयंप्रेरणेने बरे होण्यासाठी घेतलेल धडे


आपल्यामध्ये व सर्व सजीवांमध्ये बरे होण्याची प्रक्रिया अंतर्भूत असते.
जीवाणूंचा प्रतिजैविकांना प्रतिसाद मिळाला नाही, तर आपण नाराज होतो;
पण आपल्यामध्ये आजाराला प्रतिसाद देण्याची क्षमता नाही, याची आपल्याला खंत वाटत नाही.
एकाद्या गोष्टीची माहिती झाल्याने कुणामध्ये बदल होत नसतो. प्रेरणा मिळाल्याने बदल होतो.

तुमच्या जगण्यासाठी निमित्त शोधा.
त्यातून प्रेरणा घ्या व परिवर्तन घडू द्या.

तुमच्यामध्ये बदल घडवू शकणारी एक फारच छोटीशी गोष्ट मला सापडली आहे.
ती छोटीशी गोष्ट म्हणजे आपण नाशवंत आहोत आणि एक ना एक दिवस मरणार आहोत.
त्यामुळे मरण टाळण्यासाठी काही करु नका, तर जीवनाचा स्तर उंचविण्याची निश्चित प्रयत्न करा.
त्यामुळे तुमच्या आयुष्याचा वाढलेला काळ बघून तुम्हीच चकित व्हाल!




मूळ लेखक- वर्नी सिगेल,(एम डी)
अनुवाद- डॉ. शुभदा राठी लोहिया
पृष्ठे- २५२
किंमत- २५० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Tuesday, January 3, 2012

विक्रम वेताळ मालिका

विक्रमादित्य हा एक धीडसी आणि बुध्दीमान राजा, तर स्मशानातला वेताळ भीती दाखविणारा पण मिश्किल स्वभावाचा !
सतत नव्यानव्या सुरस कथा सांगून राजा विक्रमाला कोड्यात टाकण्याता हा सिलसिला आपल्यालाही घेऊन जातो गोष्टींच्या एका अदभूत नगरीत !

या मालिकेतील कथा


समुद्रातली अप्सरा


खंरं बक्षिस


दैवी सिंहासन



पुतळे जिवंत झाले




जादूचा रत्नहार



राजपुत्राचा निर्णय



टेकडीवरचं देऊळ

गुप्त खजिना


ज्योतिषाचं नशीब




जादूची साखळी

लेखिका- वेशाली कार्लेकर
प्रत्येक पुस्तक- रु. ५०.
संच घेतल्यास रु.४००.


Monday, January 2, 2012

द स्पिरिच्युअलीस्ट


उदास, पछाडणारे वातावरण, शृगांरिक गूढरम्यता व त्याबद्दलचे विचित्र आकर्षण
द स्पिरिच्युअलीस्ट



कधी कधी सत्य हा फार मोठा भ्रम असतो !
१८५६च्या बोच-या थंडीच्या रात्री एव्हेलिन अथरटनचा पती एका खास बैठकीमधून परत येताना त्याचा खून होतो.
त्याची पत्नी एव्हेलिनच खुनी असावी असा संशय घेतला जातो,
पण खुन्याचा शोध घेतल्याशिवाय तिला मात्र या किटाळातून बाहेर पडता येणार नसते. या वेळी तिच्या पतीचा जिवलग मित्र तिच्या मदतीला येतो. त्याने तिचे वकीलपत्र घेतलेले असते. पण याच वेळी परलोकविद्यच्या गूढ विश्वात तिचा प्रवेश होतो. ह्या ठिकाणी विलक्षण भारुन टाकणा-या मायकेल जॉर्डन या व्यक्तिशी तिची गाठ पडते. तिला खात्री असते की हा इसम लबाड आहे, पण त्याची मदतच तिला निर्दोष ठरविण्यासाठी उपयोगी पडणार असते.
जॉर्डनच्या सान्निध्यात तिचा प्रवेश एका विलक्षण चमत्कारिक विश्वात होतो. तिला मृतात्म्यांचे आवाज ऐकू येऊ लागतात. या भीतादायक विश्वामध्ये ती एकाच वेळी खेळीयापण असते व खेळातील एक प्यादेपण!
त्यामुळे कुणावर, अगदी स्वतःवरही कसा विश्वास ठेवावा हे तिला समजेनासे होते.
तिची सासरची माणसे तर तिला खुनी ठरवून फासावर चढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. वेळ भर्रकन् निघून चाललेला असतो. भूतकाळातील पिशाचांना सामोरे जाण्याशिवाय तिला गत्यंतर नसते...


लेखिका - मेगन चान्स
अनुवाद- मुकुंद कुर्लेकर
पृष्ट- ३१२
किंमत- ३२० रुपये

Saturday, December 31, 2011

अ प्रिझनर ऑफ बर्थ



मित्राचा खून केल्याच्या आरोपावरुन तुरुंगात जाणा-या व आश्चर्यकारकरित्या बाहेर येऊन ख-या गुन्हेगारांना धडा शिकविणा-या डॅनची उत्कंठावर्धक कथा


डॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याच्या आरोप ठेवण्यात आला नसता आणि त्याला अटकसुध्दा झाली नसती.
जेव्हा फिर्यादी पक्षाकडून चार नामांकित साक्षीदार आणण्यात येतात; एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक उच्चकुलीन प्रतिष्ठित व्यक्ती आमि एक नावाजलेल्या फर्ममधला तरुण, धडाडीचा पार्टनर....
तेव्हा तुमची बाजू कोर्टात कोण ऐकून घेणार ?
डॅनीला बावीस वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा होते.त्याला वेलमार्श तुरुंगात पाठवणायत येतं. देशातल्या सर्वात जास्त कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रसिध्द असलेला हा तुरुंग!
आजवर कोणताही कैदी तिथून पळून जावू शकला नाही.
पण डॅनीच्या अंतर्यामी एक आग भडकलेली आहे.
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घण्याची आग.
ती आग त्याला जाळते आहे; पण याची किंचितही कल्पना स्पेन्सर क्रेन, लॉरेन्स देवनपोर्ट, जेरॉल्ड पेन आणि टीवी मोर्टिमर यांनी नाही.
डॅनीला साथ आहे त्याच्या प्रेयसीची, बेथची.
डॅनीच्या नावाला लागलेला कलंक धुवून काढण्साठी तिनेही न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत. सच्चा दिलाच्या या प्रेमिकांच्या अथक् प्रयत्नांनी अखेर त्या चौघांना पळता भूई थोडी होते.
जिवावर उदार होऊन अखेर रणांगणातून पळ काढावा लागतो.

वाचकांची मती गुंग करणारी; शेवटच्या पानापर्य़ंत वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना खिळवून टाकणारी ही कादंबरी!


मूळ लेखक- जेफ्री आर्चर
अनुवाद- लीना सोहोनी
पृष्ठे- ५८२

किंमत- ५०० रुपये

Monday, November 21, 2011

वन फुट रॊँग


सच्चा आवाज.
बालपणीच्या धास्तीभरल्या आठवणी जाग्या करता करता उदात्ततेला आवाहन करणारी
आणि वास्तवापुढे मान तुकवणा-या निरागसतेची वेदना टिपणारा सच्चा आवाज़!
सोफी लगूनानं रेखाटलेलं जग, व्यक्तिरेखा आणि व्यक्तिरेखेला साजेशी भाषा यात
वाचक गुंगून जातो.
हे सारं एका दारुण वास्तवाच्या कथानकाला हाताळताना,
एवढ्या तीव्र आणि प्रभावशाली शैलीत ती करु शकली आहे,
हीच तिच्या ठायीच्या चातुर्य, कलाकौशल्य आणि परिपक्वता
या गुणांना मिळालेली पावती म्हटली पाहिजे.
भडक पत्रकारितेच्या हे सर्वस्वी विरुध्द आहे.
हे माणुसकी, मनोविकार आणि सत्य यांनी ओतप्रोत भरलेलं आहे.

मूळ लेखक- सोफी लगूना
अनुवाद- सुनीति काणे
पुष्ठे- १५८
किंमत- १६० रुपये.


मी चित्र रेखाटत असताना पेन्सिल माझ्याशी कुजबुजत असे. ती म्हणते असे, “मी कल्पांतापर्यंत तुझी मैत्रीण राहीन.” मी तिला प्रश्न करत असे, “ कल्पान्त म्हणजे काय?” पेन्सिल उत्तर देत असे,”कल्पान्त म्हणजे जमीन भिंती नसलेली अमर्याद पोकळी.”
एकलकोंड्या आणि धर्मवेड्या आई-बापांनी त्यांच्या लेकराला घरात बंदिवासात ठेवलं आहे. हेस्टर कधीही दुस-या कुणा लहान मुलीशी बोलू शकलेली नाही किंवा तिनं घराबाहेरचं जगही पाहिलेलं नाही. मुलांसाठीचं सचित्र बायबल ही तिची एकमेव दौलत आहे. त्यातली कल्पनासृष्टी हा तिला बाहेरच्या जगाशी जोडणारा एकमेव दुवा आहे. तिचे सवंगडी आहेत घरातलं मांजर आणि चमचा, दरवाजा, दरवाज्याची मूठ, झाडू, बागेतलं झाड अशा गोष्टी! आणि याच गोष्टी कधी कधी तिला काय करावं याबद्दल सल्ला देत असतात.

एकदा दरवाज्याची मूठ तिला सांगते,” हेस्टर... मला धरून फिरव... मला धरून फिरव.”तसं केल्यावर तो दरवाजा उघडतो आणि बाहेरचं निषिध्द जग तिच्यापुढे खुलं करतो. बाहेरचा प्रकाश, मोकळं आकाश आणि खुला निसर्ग पाहून ती अवाक होते. या गोष्टी पाहून मनी दाटून आश्र्चर्याला वाचा फोडायला तिला लेखणीनं चित्र रेखाटावी लागतात.

या क्षणापासून हेस्टरला जाणीव होते, की काही गाष्टी ती आई-वडिलांना सांगू शकणार नाही. तिला उमगतं, की` गुपित नेहमी मुकं असतं. ते तुमच्या मनाच्या काळोख्या कोप-यात दडून वाट पाहत असंत.` हेस्टरच्या मनात दडलेली गुपितं वाढतच जातात आणि मुक्त होण्याचा पर्याय सापडेपर्यंत प्रतीक्षा करणं तिला भाग पडतं.

`वन फूट रॉंग`मध्ये सांगितलेली कहाणी बरेचदा उदास करणारी आणि भीषण वाटते; परंतु सोफी लगूनच्या भाषेचं झळाळतं तेज, तिची कल्पकता आणि तिनं उभी केलेल्या कल्पनासृष्टी पुस्तकाचं प्रत्येक पान उजळून टाकते आणि या कादंबरीला मनोवेधक, प्रबोधक आणि वास्तव बनवते. `मिट्ट काळोखातच तारे झळाळून चमकतात.`