Thursday, May 31, 2012

चरित्ररंग




`आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फूर्ती देणारे नाहीतच.
देवदेवता तूर्त रजेवर आहेत.
आज नायक व्हायला उरले आहेत- गरीब लोक आणि शास्त्रज्ञ.
गरीब लोक जेव्हा लढा देतात,
तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो.
त्यात हरलं की दंड भरावा लागतो;
तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा.
सहाजिकच लेखक लढाऊ-वृती जिथं आढळते,
तिथे ओढला जाणारच.
आता ही लढाई-वृत्ती त्याला फक्त गोरगरींबांच्यातच अढळतेय....`

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८८
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२


...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार...
आणि कलावंतांना अवगत करून देणार...`चरित्ररंग...`

जांभळाचे दिवस




जेव्हा..

मनाला भुरळ घालणारे `जांभळाचे दिवस` लवकर संपतात,
टेकडीचा उतार उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो,
पोस्टमनच्या अनवाणी पायांना वहाणा मिळतात,
मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करु न देणा-या बाई बदलतात,
मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते,
विस्मृतीत गेलेल प्रेम `सकाळची पाहुणी` बनून अनंतरावांकडे येते,
ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली सायकल हरवल्यानतरही काळे मास्तर सुटकेचा निःश्र्वास सोडतात,

तेव्हा..
काय घडते ? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच `जांभळाचे दिवस.`

लेखक- व्य़ंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११२
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२

एक एकर





माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही ब-यावाईट कृत्यापेक्षा, त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात.
संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडाव, अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं.
बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत.

पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा,
मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच
यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ६६
किंमत- ७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२


अशीच आहे ही लेखकाची `एक एकरा`तील सर्जनशीलता...

सिंहाच्या देशात



बर्नाड आणि मायकेल ग्रझीमिक यांनी विहवेल्या
`Serengeti Shall Not Die!
या ग्रंथाचा संक्षिप्त अनुवाद



हिटलरने लक्षावधी लोकांना धाकात ठेवले. त्याच्यासाठी लक्षावधी लोकांनी प्राण दिले आणि लक्षावधी लोक त्याच्याशी लढून मेले. आज जर्मनीमधल्या शाळकरी मुलांना हिटलरविषयी प्रश्न विचारले, तर त्यांना फार थोडे माहित आहे, असे दिसून येते. हिटलरच्या अनुयायांची तर नावेसुध्दा मुलांना माहित नाहीत.
मानवी ध्येयाने लोक लवकर ही ध्येये विसरतात. आपण नाश केला नाही, तर निसर्ग चिरंतन आहे!
आज ज्या परिषदेच्या बातम्यांनी वृत्तपत्रे भरून गेली आहेत, त्या परिषदेसंबंधी आणखी पन्नास वर्षांनी मावळत्या सूर्याने लालेलाल केलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर उभा राहून सिहं गर्जना करेल, तेव्हा ऐकणारा थरारून जाईल. मग तो डेमोक्रॅट असो, बोल्शेव्हिक असो, इंग्लिश, जर्मन, रशियन, स्वाहिली कोणतीही भाषा बोलणारा असो.
आणखी पन्नास वर्षांनी, शंभर-दोनशे वर्षांनीसुध्दा कुरणावर दिसणा-य् ह्या सिंहासाठी, झेंब्र्यांसाठी आज काही करणे, हा खरोखरीच वेडेपणा ठरेल का?

अनुवाद- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ७६
किंमत- ८० रुपये
मुखपृष्ठ व मांड़णी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२

Thursday, May 24, 2012

पारितोषिक


साहित्यसंमेलनं कशासाठी भरतात?
यावर अनेक विवाद निर्माण होतात;
मात्र या आनंदमेळ्याचं नक्की प्रयोजन काय?
याचं लेखकानं केलेलं समर्पक विवेचन...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३६
किंमत- १६० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२



`माणसाचं सारं अस्तित्व म्हणजे भोवतालच्या
जगाशी तो प्रस्थापित करीत असलेल्या
अनेकविध संबंधांची एक मालिका असते.
साहित्य म्हणजे मुलतः अशा प्रकारचा एक संबंध.
साहित्यसंमेलनासारख्या आनंदमेळ्यात
मायभाषेसंबंधाचं प्रेम उजळून निघतं,
रसिक वृत्तीचा परिपोष होतो आणि
वाड्.मयीन व्यवहाराशी असलेला संबंधही
अधिक जिव्हाळ्याचा व जवळचा होतो.
आपल्या सांस्कृतिक जीवनातील
ती एक महत्वपूर्ण घटना असते.`

उंबरठा


लेखन हे कधी आपण आयुष्याचे वेड बनविले आहे का?
एखाद्या मुसलमानी गवयाप्रमाणे
आपले आयुष्या कधी उधळून दिले आहे का?
चोवीस तास आपण आपल्या नशेत राहिलो आहोत काय?
मुळीच नाही! आपण जीवन जगलो नाही ,जीवन पाहिले नाही. कारण आपली हिंमत झाली नाही!

जोपर्य़त आपण प्रतिष्टा, धन, शाश्वती यांना सांभाळायचा प्रयत्न करीत आहोत,
तोपर्य़त दिव्य-भव्य असे आपल्या हातून
काहीच निर्माण होण शक्य नाही.
एखादा जबरा माणूस व्याकरणाला लाथ मारील आणि भाषेला पुढे नईल.
एखादा कलावंत लौकिक नीतीला लाथ मारील, पण लोकांना अलौकिक नीतीचं दर्शन घडवील.
दरोडेखोरही नीतीला ठोकारतो आणि कलावंतही ठोकरतो..
पण दरोडेखोर समाजाला खाली नेतो आणि
कलावंत समाजाला वर घेऊन जातो!


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११२
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ म मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
आवृत्ती पाचवी- मे, २०१२

वावटळ




आपल्या घरांना लागून असलेली घरे,
अडीनडीला आपली मदत घेणारी,
आपल्याला मदत करणारी,
आपल्याच गावातील ही माणसे आपली `शत्रू` होतील..
असे त्यांना कधी वाटले नव्हते.
त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे,
ही जाणीव त्यांना प्रथमच होत होती.
हा धक्का अगदी अनपेक्षित होता.
त्याने ही मंडळी मूळापासून कलली होती.
कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत...
आपले असे म्हणायला कोणी नाही.
आता कशाची शाश्वती नाही.
केव्हा काय होईल याचा नेम नाही!

एका `वावटळी`मुळे हे सर्व घडले होते...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८८
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे, २०१२