Thursday, March 17, 2011

द.मां.ची पुस्तके साहित्य दरबारात पुन्हा




मराठी साहित्याच्या क्षेत्राला स्वत:ची लेखनशौली देणारे सिद्धहस्त लेखक श्री. द. मा. मिरासदार यांची अठरा पुस्तके नया मिर्मितीमूल्यासह साहित्याच्या दालनात पुन्हा प्रवेश करीत आहेत.

मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सुनील मेहता यांनी या पुस्तकांना नवनिर्मितीने पुन्हा एकदा मिरासदारांचे साहित्य वाचकांना हाती दिले आहे. यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची लेखनाची व लेखकाची वौशिष्ट्य टिपणारी खास मुखपृ ्ये या सर्वच पुस्तकांना लाभली आहेत. या सर्व पुस्तकांचे प्रकाशन सोमवार दि. 21 मार्च 2011 रोजी एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी सहा वाजता ज्ये साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते होत आहे.
यानिमित्ताने द. मा. मिरासदारांशी संवाद सा­ाून त्यातून त्यांचे यक्तिमत्त्व उलगडून दाखविणारा आगळा कार्यक्रम राहूल सोलापूरकर सादर करतील.

या कार्यक्रमात यंगचित्रकार शि. द. फडणीस, अभिनेते रविंद्र मंकणी, द.मांची कन्या सौ. सुनेत्रा मंकणी आणि स्वत: द. मा. मिरासदार यांचा सहभाग असणार आहे.

अठरा पुस्तकांचा हा संच या दिवशी खास सवलतीच्या दरात देणार असून मूळ किंमत 2060 असून ती केवळ 1400 रुपयांत वाचकांना उपलब्­ा करून देणार असल्याचे संचालक सुनील मेहता यांनी सांगितले. आजही द.मांचे चाहते, त्यांचा वाचकवर्ग महाराष्ट्राच्या सर्वच भागात आहे. स­या बाजारात उपलब्­ा नसलेली त्यांची पुस्तके पुन्हा एकदा या निमित्ताने उपलब्­ा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------------------
द. मा. मिरासदार

-इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शौलीतून मागोवा घेणार्या द.मांच्या गम्मत गोष्टी
- गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. मिरासदारांनी पाडलेली वाट अजून पाऊलवाटच आहे. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथातून गावरान विनोद अगदी तसाच्यातसा आढळतो. - गुदगुल्या आणि चकाट्या म­येही
- द.मांच्या चुटक्याच्या गोष्टा म­ाून मानवी स्वभावाचे विवि­ा पौलू समोर येतात काही हसवतात तर काही अंतर्मुख करतात.
- आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द.मां.ची आणखी एक मिरासदारी - माझ्या बापाची पेंड.
- वाचकांशी सा­ालेला संवाद हेच गप्पांगणचे विशेष
- गावगप्पांम­ाून तयार झालेला - गावरान मेवा
- अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसटपणासह माणसांचे `सद्गुण' म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कधमाल. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो. तो हा कध माल बरोब्बर हेरुन त्यातील विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो- बेंडबाजा त्याचेच उदाहरण
- प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शो­ाणारी सामान्यातील असामान्य माणसं भेटतात- विरंगुळा म­ये
- राजकारणातील माणसाकडे ते कुतूहलाने पाहतात. त्यातली विसंगती, हास्यकारक घटना वक्तये यातून ओरखडलेले खडे दिसतात. यात विडंबन, उपहास, अतिशयोक्ती, उपरो­ा या विनोदी भाषातल्या अस्त्रांचा वापर केला आहे.
- नावेतील तीन प्रवासी - इथे केवळ भौगोलिक स्थित्यंतरेच जाणवतील असे नाही तर निसर्गातील विवि­ा रंग छटा, मानवी स्वभावातील वौवि­य आणि वौगुण्यामुळे होणारी फजिती या सवा|ची अनुभूती मिळते.
- गावातल्या पारावर, देवळातल्या गप्पांत, खास आढळणारा शेतावरचा पाणी दिलेला, कणसांवर उगवणार्या लोंब्यासारखा - विनोदाचे पीक - खेड्यात खळाळत वाहात असते. मिरासदारांनी हा विनोद ­ारला आणि टिपला तो देखील माकडमेयात त्या चवीसकट.
- `भोकरवाडीत' घडलेल्या बेरकी आणि पोट ­ार­ारुन हसायला लावणार्या द.मांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायला हयाच.
- उडााणटप्पू जावईबापूंचे एकदाचे लग्न झाले आणि दिवस पालटू लागले. सासर्याकडून दिवाळसणाचे आमंत्रण आले आणि जावईबापूंच्या डोक्यात अकलेचे दिवे पाजळू लागले. कोणते ते वाचा - जावईबापूंच्या गोष्टा म­ये
- उत्तम म्हणून गाजलेल्या `हसणावळ' म­ये हाच गावरान विनोद जसाच्यातसा उरलेला आहे.
- भंपक माणसांनी मारलेल्या बढायातून, बेरकी लोकांच्या गप्पांम­ाून, जुन्या माणासांच्या आठवणींतून रोज हसावे असे घडत जाणारी `सरमिसळ' नक्कीच आवडेल.
- शिवाय गाणारा मुलुख, सुट्टी आणि एकांकिका
- वगनाट्यातून गाजणारा फासी म्हणून ओळखला जाणारी `मी लाडाची मौना तुमची' हे नाट्य.

1 comment: