Saturday, May 5, 2012

सत्तांतर




काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच.
असतील; तर भरती असते, पूर असतो.
जेव्हा –जेव्हा खाणारी तोंडं भरमसाठ वाढतात, गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष बळावून उठतो.
जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो.
जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरुन परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पहातं, तेव्हा संघर्ष उतू जातो.

ज्यांना बोलता येतं; ते हा राग, उद्दामपणा, `संघर्ष` शब्दांतून दाखवतात.
ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ, प्रेंम हावभावातून, स्पर्शातूनच सांगितले जातात.

संघ्रर्ष पेटला की, शस्त्रास्त्र माहितच नसतात, ते सुळे नखं वापरतात.
`संघर्ष` सर्वत्र भरून राहिलेला असतो.

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ६२
किंमत-९० रुपये
मुखपृष्ठ रचना- चंद्रमोहन कुलकर्णी
आठवी आवृती मे २०१२

-------------------------------------------------

सबंध कादंबरी ही वानरांच्या जीवनवर्तनातून मानवी सत्तासंघर्षावर, चालू राजकीय स्थितीवर मूकपणे टीका-टिपणी करते, अशा स्वरुपाचे अर्थ समीक्षकांकडून काढले जातात, तसे शास्त्रीय ग्रंथातून निघत नाहीत. वाचकांच्या मनात अर्थाचे इंद्रधनुष्य उमटवणे हे शास्त्रीय पुस्तकाचे साध्य नसते. Wild Fox हे Roger Burrows चे पुस्तक म्हणचे English Fox चा शास्त्रीय अभ्यास असतो, त्यापलिकडे आणखी काहीही नसते.
सत्तासंघर्षाच्या फिरत्या चक्राचा मेळ निसर्गातील ऋतुचक्राशी, जन्म-मरणचक्राशी घालण्याची आवशकता त्याना भासत नाही.
`सत्तांतर` हे वानरांच्या वर्तनाचा अभ्यास म्हणूनच लिहलेले शास्त्रीय पुस्तक नव्हे, पानगळी जंगलात प्रत्यक्ष घडणा-या घटितांवर आधारलेली ती एक कल्पित कथा आहे.

(दुस-या आवृत्तीच्या निमित्ताने व्यंकटेश माडगूळकरांनी लिहलेल्या प्रस्तावनेतून)

-----------------------------

प्रकाशन समारंभ पुण्यात १८ मे रोजी

श्रेष्ठ साहित्यिक कै. व्यंकटेश माडगूळकरांच्या ४१ पुस्तकांचा प्रकाशन समारंभ पुण्यात १८ मे रोजी मयूर कॉलनीतल्या बालशिक्षणमंदिराच्या सभागृहात संध्याकाळी ६ वाजता होत आहे.
ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक श्री. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते आणि
अध्यक्षपदी असणार आहेत श्री. राजन गवस..

संपूर्ण पूस्तकांचा संच सवलतीच्या दरात १४ मे पर्यत.३४९५ .
केवळ प्रकाशन समारंभात तो ३७९५ रुपयांना उपलब्ध असेल.
त्या ४१ पुस्तकांच्या संचाची मूळ किंमत आहे..५१९५ रुपये.

No comments:

Post a Comment