Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, June 16, 2012
क्रिटिकल
वैद्यकीय व्यवसायाच्या अवमुल्यनाची कहाणी
मार्च-एप्रिल २००७ मधल्या एका आठवड्यात एकमेकांना आजिबात न ओळखणा-या तीन माणसांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वस्वी अनपेक्षित अशा घटना घडल्या. ह्या घटनांमध्ये दोघांचा जीव गेला आणि शिवाय हजारो लोकांच्या जीवनांवर गंभीर परिणाम झाले.
या घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांना असं काही होणार, याची पुसटशीही कल्पना नव्हाती. या तिघांमधला एक गोरा डॉक्टर होता. दुसरा आफ्रिकन-अमेरिकन असून तो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होता. तिसरा माणूस आशियाई वंशाचा होता. व्यवसायानं अकाउंटंट असणा-या या तिस-याची निर्घृण हत्त्या झाली होती.
मूळ लेखक- रॉबिन कुक
अनुवाद- प्रमोद जोगळेकर
पृष्ठे- ३५४
किंमत- ३६० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
रॉबिन कुक यांच्या `क्रायसिस` या कादंबरीत कॉन्सिएर्ज वैद्यकीय पध्दतीच्या सामाजिक परिणामांवर भाष्य होते. स्वतः डॉक्टरांच्या मालकीची स्पेशॅलिटी हॉस्पिटल असणे, हा या कादंबरीचा विषय़ आहे.
अन्जेला डॉसन या हुशार डॉक्टरने आपली प्रॅक्टिस खालावल्यानंतर `एंजल्स हेल्थकेअर` ही कंपनी सुरु केलेली असते. भांडवल बाजारात उतरण्याच्या काही आठवडे अगोदर अन्जेला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना कंपनीच्या हॉस्पिटलांमध्ये संसर्ग फैलावून मृत्यूची मालिका सुरु होते.
याच हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय तपासनिस लॉरी मॉन्टगोमेरीचा नवरा डॅक स्टेपलटन याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने तिला या प्रकरणात वैयक्तिक रस असतो. चौकशी करण्यासाठी लॉरी मॉन्टगोमेरी एंजल्सच्या हॉस्पिटलमध्ये गेल्याने घाबरलेली अन्जेला आपल्या माजी नव-याची मदत घेते. तो कंपनीचा मुख्य भागधारक असलेल्या माफिया डॉनकडे जातो. आपली गुंतवणूक बुडणार या कल्पनेतून माफिया डॉन त्याच्या पध्दतीने काम सुरु करतो.
यामधून कादंबरीतल्या पात्रांवर येणारी संकटे आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या रहस्यमय घडोमोडी वाचकांना खिळवून ठेवतात.
-ख्रिस्तीन हंटली (बुकलिस्ट) हंटली (बुकलिस्ट)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment