Friday, August 12, 2011

अल्टीमेटम


पर्यावरणाच्या राजकारणात दोन महाशाक्तिंची टक्कर

पर्यावरणातील बदलांमुळे जागतिक तापमानवाढीचे परिणाम महासागरातील पाण्याची पातळी वाढण्यात दिसू लागले होते. प्रचंड वेगाने घडणार्या या बदलांना वायुवेगाने आळा न घातल्यास जगाचा विनाश अटळ होता. या जागतिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सवा|त जास्त प्रदुषण निर्माण करणार्या चीन या देशाच्या शासनाबरोबर अमेरिकेच्या नवनिर्वाचित अ­यक्षाने ज्यो बेंटनने बोलणी चालू केली. परंतु पुढे त्याची परिणती निर्दयी कारस्थानांनी बजबजलेल्या अण्वस्त्रांच्या महायुद्धात झाली. या युद्धातील मनोबलाच्या आणि तत्त्वनितेच्या कसोटीला बेंटन पुरेपूर उतरला. पर्यावरणाच्या राजकारणाची आणि त्यापासून जगाला वाचवण्याची शर्थ करणार्या अमेरिकेच्या ­येयवादी प्रेसिडेंटची मनाला अस्वस्थ करणारी ही खळबळजनक कथा!

मूळ लेखक : मॅत्यू ग्लास
अनुवादक : सुदर्शन आठवले
पृष्ठे : 484 किंमत : 440

Thursday, August 11, 2011

स्मार्ट लीडरशिप


भारतीय नेतृत्वाचा जागतिक चेहरा

बहुराष्ट्रीय उद्योगाच्या प्रमुखांना कार्यक्षमता वाढवायचे नवनवे मार्ग शोधावे लागतात.
`स्मार्ट लीडरशिप - सीईओसाठी नवी दृष्टी' या पुस्तकाम­ये बारा यशस्वी सीईओंनी
(चीफ एक्झिक्युटिह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अधिकारी ) आपले मनोगत यक्त केलेले आहे.
या सर्वांनी विकासाचे आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले, आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
सर्वश्री कुमारमंगलम् बिर्ला, एन. आर. नारायण मूर्ती, राहुल बजाज, के. व्ही. कामत यांनी वर्षानुवर्षे गुणवत्ता राखून विकासाच्या वेगात सातत्य राखता येते, हे दाखवून दिले. त्यांच्या अनुभवसमृद्धतेतून उद्योगक्षेत्रातील यवहाराबद्दल काही मूलभूत ­धडे शिकता येतात. नेतृत्व करणे, निर्णय घेणे, योग्य माणसे निवडून टीम बांधणे, गुणवत्ता ओळखून उत्तेजन देणे, बदल पचवणे आणि हे सर्व करताना विकासावरील लक्ष ढळू न देण्याचे मर्म सांगितले आहे.
परिवर्तन घडवण्यासाठी `स्मार्ट लीडरशिप' सर्व स्तरांवरच्या यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध यवहार्य सूचना देऊ पाहते.

मूळ लेखक : गीता पिरामल
जेनिफर नेतरवाला
अनुवादक : माधुरी शानभाग

पृष्ठे : 176 किंमत : 150

स्क्रीम फॉर मी


अत्याचार करून, ब्लैंकेट मध्ये गुंडालून, तरुण मुलींची प्रेत रस्त्याच्या कडेला वेगवेगल्या ठिकाणी टाकली जातात...
एका सूड सत्राचा घेतलेला शोध.

काळजाचा थरकाप उडवणा-या आपल्या प्रत्येक लोकप्रिय कादंबरीतून, वाचकांच्या अंगावर काटा उभा करत, आपण सस्पेन्स कादंबरीची सम्राज्ञी आहोत हे करेन रोझ ह्या प्रतिभासंपन्न लेखिकेने आता निर्विवादपणे सिद्ध केले आहे. "डाय फॉर मी' या गाजलेल्या कादंबरीची ही लेखिका आता आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारे कथानक घेऊन, वाचकांच्या समोर येत आहे. एका छोट्याशा गावात अचानक एक भयप्रद खूनसत्र सुरूहोतं. गाव पार हादरून जातं. आपल्या कामात निष्णात असणारा एक ­धाडसी गुप्तचर अ­धीकारी आणि एक पिसाट, विकृत खुनी ह्यांची आमने-सामने टक्कर होते. मरणाच्या दारात उभ्या केलेल्या आपल्या सावजाला, तो विकृत खुनी वेडावत म्हणतो, ""तुला जेव्हा वेदना असह्य होतील ना, तेव्हा माझ्या नावाने एक किंकाळी फोड.'' स्पेशल एजंट डॅनियल हार्टानियन हा, तेरा वषा|पूर्वी घडलेल्या एका खुनाची सहीसही नक्कल करणार्या त्या खुन्याला शो­धून काढण्याचा विडा उचलतो. नुकताच मारला गेलेल्या आपल्या कुविख्यात खुनी भावाजवळ सापडलेली काही छायाचित्रं, हाच डॅनियलपाशी एकमेव ­धागा असतो. खुनी इसमाचा शोध घेण्याच्या त्या विलक्षण प्रवासात, त्याला आपल्याच कुटुंबाच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर मानवी अभद्र मनाच्या गूढडोहाचा तळही सापडतो. ह्याच प्रवासात, अॅलेक्स फॅलन ह्या एका सुंदर परिचारिकेची त्याची भेट होते. तिची कहाणी ऐकून, त्याला आपलाच भूतकाळ आठवतो. विशेष म्हणजे अॅलेक्सचा चेहरा आणि तेरा वषा|पूर्वी खून झालेल्या त्या मुलीच्या चेह-यात कमालीचे सा­धर्म्य असते. गावातील प्रतिष्टित व्यक्ति ह्या प्रकरणात गुंतलेल्या आहेत. त्या विकृत खुनी इसमांच्या यादीत अॅलेक्सचेही नाव आहे, हे डॅनियलला समजते. दिवसागणिक बळी जाणा-या स्त्रियांची संख्या वाढू लागते. आता डॅनियलपाशी फारच थोडा अवधी राहिलेला असतो. त्या क्रूर कर्म्याला लवकरात लवकर शो­धणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं, अॅलेक्सचा जीव वाचवणं. कारण तो आता अॅलेक्सच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो.

मूळ लेखक : करेन रोझ
अनुवादक : दीपक कुळकर्णी

पृष्ठे : 509 किंमत : 480

शब्दचर्चा


लेखक : डॉ. म. बा. कुलकर्णी

अठरा विश्वे दारिद्र्य' असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील?
नाहीतच, तर कोठून सांगणार?
मग हा शब्दप्रयोग आला कोठून? डॉ.म.बा. कुलकर्णी सांगतात, "अठराविसे' असा शब्दप्रयोग असायला हवा.
अठराविसे = 360. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य!
"शब्द' हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दाला रंग-रूप असते. रस-गंध असतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक वापरता आले पाहिजेत.
शब्दकोशाम­ये तर सर्वच शब्द असतात, पण तेथे ते एक प्रकारे निर्गुण-निराकार अवस्थेत असतात.
देवळांम­ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसे दगडाच्या मूर्तीला "देवत्व' प्राप्त होते, तसेच शब्दांचे आहे.
वापरातून त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा होते. ते सजीव होतात. बोलू लागतात, डोलू लागतात.

ही किमया डॉ.म.बा. कुलकर्णी यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.

पृष्ठे : 440
किंमत : 350

कृष्णायन


माणूस होउन जगलेल्या, ईश्वराची भावकथा!

"स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?'' अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक विचार येत होते.... "
"कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का बरं एकसारख्या गोष्टींबद्दल रागावते? राग यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते....?
'' कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं...
""आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पद्धतीनं दु:खी होत होत्या? आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...
'' खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...! प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ...
निखळ प्रेमानंही!
तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरून सागराकडे जात होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश-किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या तिनही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी...पत्नी... आणि सखी... त्या तिघी जणी...
खळाळणा-या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या...
""तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....''

मूळ लेखक : काजल ओझा - वैद्य
अनुवादक : प्रा. सुधीर कौठालकर

पृष्ठे : 216 किंमत : 200

Wednesday, August 10, 2011

'तृतीयपंथीयांबाबतचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे'


पुणे - "समाजाने तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. "मी का नाही' या कादंबरीच्या निमित्ताने या दुर्लक्षित समाजाचे प्रश्‍न समोर आले आहेत. कादंबरीमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांचा तृतीयपंथी समाजाला खूप उपयोग होणार आहे,'' असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी येथे व्यक्त केले.

"मी का नाही' या कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. वाटवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, चित्रपट अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, "मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता उपस्थित होते.

कादंबरीविषयी माहिती देताना लेखिका पारू मदन नाईक म्हणाल्या ""कादंबरीतील नायिका आईच्या पाठिंब्यामुळे तृतीयपंथीय समाजाची स्थापना करते. समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित करते. त्यांचे प्रश्‍न सोडविते. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारते. तृतीयपंथीयांनी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला समाजाची साथ मिळणे आवश्‍यक आहे.''

डॉ. यादव म्हणाले, ""वेगवेगळ्या भागांत तृतीयपंथी समाजाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यांची सतत उपेक्षा केली जाते. त्यांना उपेक्षितांप्रमाणे वागवले जाते. या पुस्तकाच्या रूपाने या समाजाचे प्रश्‍न समोर आले आहेत.''

""या समाजाकडे तुच्छतेने बघितले जाते. त्यांच्याविषयी अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. मात्र, त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्याविषयी जास्त माहिती मिळाली व त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या असल्याचे कळले,'' असे आठल्ये यांनी सांगितले. मेहता यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.



http://www.esakal.com/esakal/20110810/5179277502990800741.htm

Tuesday, August 9, 2011

माझा हक्क हवा आहे...



- लक्ष्मीनारायण त्रिपाठी

पुणे- दि. ९- मला सहानुभूती नको आहे. मला माझा हक्क हवा आहे. मला स्वतःचा समाज घडवायचा आहे. समाज आम्हाला नाकारतो. हे बदलण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.. आमच्या बद्दल समाजाची मनस्थिती बदलण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल...असा विश्वास महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी व्यकत केला.

मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित झालेल्या पारू नाईक लिखित ‘मी का नाही?’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (८.८.२०११) पत्रकार संघाच्या सभागृहात त्रिपाठी यांच्या हस्ते झाले.

तृतीयपंथी असणे ही प्रकृतीतीलच एक गोष्ट असली तरी त्याकडे समाज तुच्छतेने पाहतो आहे. अंध व अपंग व्यक्तींना समाज स्वीकारतो. पण वेगळी लैंगिकता आहे, म्हणून आम्ही आयुष्यभर समाजाच्या नावाने चीड-चीड करत जगतो. आम्ही आमचे हक्क मिळवू, पण त्याआधी समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून स्वीकारा, अशी विनंती करताना तृतियपंथीचे प्रश्न उपस्थितांसमोर मांडले. ह्या पुस्तकामुळे आमचे दुःख समाजासमोर मांडल्यामुळे पारू मदन नाईक यांचे आभार मानताना ह्या पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदीसह इतर भाषात भाषांतर करण्याची विनंती मेहता प्रकाशनाला त्रिपाठींसह सर्वच वक्त्यांनी केली.

त्रिपाठी म्हणाल्या की, माझे आयुष्य जसे आहे तसे मी जगायचे ठरवले तरी त्याला कुटुंब एका मर्यादेपर्यंत स्वीकारते. त्यांना समाज काय म्हणेल याची अधिक भीती असते. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत पहिल्यांदा बदल होण्याची गरज आहे. मी तृतीयपंथी असूनही माझ्या आई-वडिलांनी मला वेगळी वागणूक दिली नाही. त्यांनी मला चांगले शिक्षण आणि प्रेम दिले. त्यांनी माझा जशास तसा स्वीकार केला. तृतीयपंथीयांना जुनी परंपरा आहे तसेच त्यांच्याकडे नृत्यादी कलाही आहेत. त्याचा समाजाने फायदा करून घेतला पाहिजे. ब्रिटिशांनी आणलेल्या जाचक कायद्यातूनही हा पंथ नामशेष होऊ शकला नाही. त्या परिस्थितीत आम्ही जगलो, अजूनही जगतो आहे आणि पुढेही जगणार आहोत. या प्रकृतीतला एक घटक आम्ही आहोत,समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून जगू दिले पाहिजे.

`या समाजावर मराठी साहित्यात अजून एकही पुस्तक झालेले नाही. हा विषय समाजापुढे आणून या पुस्तकाने एक इतिहास घडविला आहे.आपण या समाजाला अजून न्याय देउ शकलो नाही याबद्दल खेद वाटत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आनंद यादव यांनी जाहिरपणे कबूल केले.

अनेक वर्षे संशोधन करून हे पुस्तक लिहल्याचे सांगून लेखिका पारू मदन नाईक यांनी या सर्वांना समाजात माणूस म्हणून जगता यावे याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले.

पत्रकार वैशाली रोडे यांनी आपण लक्षमीनारायण त्रिपाठी यांचेवर आत्मचरित्र लिहित असल्याचे सांगून हिजड्यांची वाईट बाजूच समाजासमोर आली आहे. त्यांची चांगली आणि न्याय बाजू मांडली गेली पाहिजे असे मत मांडले.

यावेळी डॉ. वाटवे यांनी ,ही ही माणसे आहेत. घाणीतली डुकरे नाहीत. पारूताईंनी ह्या दुर्लक्षित समाजाच्या व्यथा आणि त्यावरील उपायांचा अत्यंत प्रभावीपणे शोध या कादंबरीत घेतला आहे. यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

`हे पुस्तक वाचल्यामुळे या समाजाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. माझ्याकडूबन तरी या लोकांना सहानूभूतीचा वागणूक मिळेल असा शब्द अभिनेत्री कुबल-आठल्ये यांनी दिला.

वेगळ्या वाटेने जाणारी ही वास्तववादी कलाकृती असल्याचे सांगून मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांनी आपण अशी वेगळ्या विषयाची पुस्तके प्रकाशित करत असल्याची आठवण वाचकांना करून दिली.

मृण्मयी भजक यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.