Saturday, June 16, 2012

क्रिटिकल


वैद्यकीय व्यवसायाच्या अवमुल्यनाची कहाणी

मार्च-एप्रिल २००७ मधल्या एका आठवड्यात एकमेकांना आजिबात न ओळखणा-या तीन माणसांच्या आरोग्याच्या संदर्भात सर्वस्वी अनपेक्षित अशा घटना घडल्या. ह्या घटनांमध्ये दोघांचा जीव गेला आणि शिवाय हजारो लोकांच्या जीवनांवर गंभीर परिणाम झाले.

या घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांना असं काही होणार, याची पुसटशीही कल्पना नव्हाती. या तिघांमधला एक गोरा डॉक्टर होता. दुसरा आफ्रिकन-अमेरिकन असून तो कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होता. तिसरा माणूस आशियाई वंशाचा होता. व्यवसायानं अकाउंटंट असणा-या या तिस-याची निर्घृण हत्त्या झाली होती.

मूळ लेखक- रॉबिन कुक
अनुवाद- प्रमोद जोगळेकर
पृष्ठे- ३५४
किंमत- ३६० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी




रॉबिन कुक यांच्या `क्रायसिस` या कादंबरीत कॉन्सिएर्ज वैद्यकीय पध्दतीच्या सामाजिक परिणामांवर भाष्य होते. स्वतः डॉक्टरांच्या मालकीची स्पेशॅलिटी हॉस्पिटल असणे, हा या कादंबरीचा विषय़ आहे.

अन्जेला डॉसन या हुशार डॉक्टरने आपली प्रॅक्टिस खालावल्यानंतर `एंजल्स हेल्थकेअर` ही कंपनी सुरु केलेली असते. भांडवल बाजारात उतरण्याच्या काही आठवडे अगोदर अन्जेला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना कंपनीच्या हॉस्पिटलांमध्ये संसर्ग फैलावून मृत्यूची मालिका सुरु होते.

याच हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय तपासनिस लॉरी मॉन्टगोमेरीचा नवरा डॅक स्टेपलटन याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने तिला या प्रकरणात वैयक्तिक रस असतो. चौकशी करण्यासाठी लॉरी मॉन्टगोमेरी एंजल्सच्या हॉस्पिटलमध्ये गेल्याने घाबरलेली अन्जेला आपल्या माजी नव-याची मदत घेते. तो कंपनीचा मुख्य भागधारक असलेल्या माफिया डॉनकडे जातो. आपली गुंतवणूक बुडणार या कल्पनेतून माफिया डॉन त्याच्या पध्दतीने काम सुरु करतो.

यामधून कादंबरीतल्या पात्रांवर येणारी संकटे आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या रहस्यमय घडोमोडी वाचकांना खिळवून ठेवतात.

-ख्रिस्तीन हंटली (बुकलिस्ट) हंटली (बुकलिस्ट)

झॅण्ड



मॅनहॅटनच्या ब्लॅक आऊटमध्ये घडलेली रहस्यकथा



लोकप्रिय अमेरिकन लेखिका कॅरोल हिगिन्स क्लार्क हिच्या रेगन रैली मालिकेतील `झॅण्ड`ही एक उत्कंठावर्धक रहस्यकथा. लॉरेन्स लिली ही हॉलीवूडमध्ये पदार्पण करु पाहणारी एक नटी. न्यूयॉर्कच्या जे.एफ.के.विमानतळावरून टॅक्सीतून मॅनहॅटनमधल्या तिच्या घरी परत येत असते. वाटेतच तिचा धनाढ्य नवरा फोन करुन घटस्फोटाची नोटीस देत असल्याचे तिला सांगतो. तेवझ्यात न्यूयॉर्क शहराचा वीज पुरवठा खंडीत होतो आणि संहूर्ण शहर कोळोखात बुडून जाते.
या काळोखात अनेक गोष्टी होत असतात.
एका छोट्या जागेत `स्टॅंड अप कॉमिडीचा` शो बघण्यासाठी वीकएन्डच्या निमित्ताने गर्दी झालेली असते. दोन व्यक्ती लॉरेनच्या घराचे कुलूप तोडण्याच्या खटापटीत असतात.
एका निष्पाप तरुणाला आपल्या जाळ्त फसवून जन्माची अद्दल घडवण्याच्या उद्देशाने एक तरुणी त्याच्या मागे हात धुवून लागलेली असते.
सगळी तरुणाई नाक्यावरच्या बारमध्ये जमा होते.
घरात बसून अंधारात दुसरे काहीच करण्यासारखे नसल्याने लोक चौकाचौकात जमून `बार्बेक्यू पार्टी` करत धमाल करीत असतात.
ब्लॅकआऊटच्या रात्री वरवर वेगवेगळ्या वाटणा-या या घटनांची सांगड घालत लेखिकेने मोठ्या कौशल्याने एका उत्कंठावर्धक कथानकाची गुंफण केली आहे.
कथानक न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या भागात घडते. जिथे दिवे दिवस असूनसुध्दा चालू असतात. त्या मॅनहॅटनवर आता अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
...रात्र सरत जाते तसा गुंता सुटत जाते आणि हडसन नदीवर सूर्याचे प्रथम किरण पडता-पडता सर्व काही आलबेल होते आणि वाचक सुटकेचा निःश्वास टाकतो.


मुळ लेखक- कॅरॉल हिगीन्स क्लार्क
अनुवाद- जयंत गुणे
पृष्ठे- १३०
किंमत-१४० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Thursday, June 7, 2012

छोटा जवान




सुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युध्दभूमीवर शौर्य गाजविले...
त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला.
भारत-चीन युध्दात शौर्य गाजवताना बाजीरावही...

शौर्याची परंपरा असणा-या मोहित्यांच्या घरातच यामुळे सावट पसरले..

बालपणापासून पराक्रम, शौर्य़ यांच्या कथा ऐकणा-या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला.
आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा छोटा जवान.. निघाला..
सीमेवर..
देशावर निस्सीम प्रेम करणा-या शूरांची ही शौर्य़गाथा...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ४२
किंमत- ४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२

जनावनातली रेखाटणे




मी रेषांकडे केव्हा, कसा वळालो ?
आज आठवतं ते इतकंच की, लहान वयातच वळलो.
शब्दांकडे वळण्याआधी रेषांकडे वळलो.
घरात कोणी चित्रकार नव्हते.
कोणामुळे हा नाद लागला ?
काही सांगता येत नाही.
आठवणी उकरु लागल्यावर ध्यानात येतं की,
ही आवड निर्माण व्हायला माझी आई
थोडीफार कारणीभूत झालेली आहे.
रांगोळ्या, गव्हा-तांदळानी भरलेले चौक,
रंगविलेले संक्रांतीचे घट, हिरवी पाने, नारळ,
सुपा-या, खणांच्या घड्या, काचेच्या बांगड्या,
बुक्का, गुलाल, हळद-कुंकू, चैत्रगौरी,
त्यांच्यापुढील आरास, सारवलेल्या अंगणात
रेखलेली पावले...

आकृती, रंग, रेषा किती विविध आणि
सुंदर रुपं मनाला बघायला मिळायची !

मला आज वाटतं,
चित्रकलेचं माझं शिक्षण इथून सुरू झालं...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठावरील रेखाटन- व्यंकटेश माडगूळकर
मुखपृष्ठ, मांडणी व रचना- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२

सीताराम एकनाथ




एकनाथबाबानं गाव लेकरागत जपला. त्याच्यासारखा माणूस पुन्हा होणार नाही, म्हणून गावं रडलं. त्या सूर्यापोटी हा शनी जन्मला..

सुंद्रा माळिणीसारख्या कैक जणांचे तळतळाट त्याच्या माथी होते आणि तरीही तो तेच काम करीत होता. त्याचं लक्षण खोटं होतं. चिंचाळ्यातली बरी दिसणारी एक बाई सोडली नाही. कुणाच्या जमिनी व्याजात बळकावल्या. कुणाच्या मोटेची चालती बैलं सोडून आणून आपल्या गोठ्यात बांधली. कुणाच्या मळ्यातली झाडं तोडून तिस-याच्या जागेत अरेरावीनं स्वतःचे इमले उठविले!

चिंचाळ्याची उभी रयत त्यानं गांजली. गरीबगाव नाडलं, पिडलं. बापाची पुण्याई, ढीगभर पैका, सरकारदरबारी वजन ह्यामुळं मनातून जळणारं गाव अजून गप्प होतं. पण असं ते किती दिवस गप्प रहाणार?

इतक्या जणांचे तळतळाट माथ्यावर असताना तो किती दिवस जगणार!
धनदौलत, परंपरा कशी जपणार?
इनामदारांच्या घराण्य़ाचा वंशवेल कसा वाढणार?


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३२
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे,२०१२

Wednesday, June 6, 2012

सुमीता



`साहित्य अकादमी पारितोषिक` विजेती श्रेष्ठ कादंबरी The Shadow from Ladakh या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद

तू आमचे नेतृत्व कर, असं म्हणून भास्करनं आपल्या हाततातील मशाल सुमीतत्च्या हाती दिली.
गांधीग्रामध्ये प्रवेश करता करता तिच्या हातातील कंदील आपल्या हातात घेतला...
त्याच्या मनात आलं की, आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे...

प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली,
ती ही नव्हे..
त्या जुन्या देवळाबाहेर पडताच थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच..
हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे, हे त्याला सांगता येत नव्हतं;
पण आत्ताची सुमीता ही नवी होती, एक चमत्कार होता.....


मूळ भारतीय लेखक- डॉ. बी. भट्टाचार्य
अनुवाद- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ३३४
किंमत- ३५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२








Monday, June 4, 2012

जंगलातील दिवस




आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लाबंलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो.
आपलं सगळं जीवन एकता विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे.
कधी अंगावर चांदणे पडत नाही,
कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही.
कधी ओढ्यात अंघोळ होत नाही,
कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही....

मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्रांचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनातील अदभुत जगाविषयी माझ्या छंदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे..
त्याचा हा वृत्तान्त आहे..

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १६४
किंमत- १७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२