Thursday, March 24, 2011

विनोदामुळे दु:ख विसरता येते



- द.मा.मिरासदार

माणसाचे आयुष्य दु:खाने भरलेले असते. आनंद, सुख फार थोडे वाट्याला येते. जिवनातले दु:ख नाकारता येत नसले तरी विसरायला लावणाऱ्या दोनच गोष्टी असतात पहिले तत्वज्ञान आणि दुसरे म्हणजे विनोद. सामान्य माणसाला या विनोदामुळेच दु:ख विसरता येते.
मेहता पब्लिशिंग हाऊसच्या 18 पुस्तकांच्या पुनर्निर्मितीच्या प्रकाशन समारंभास ज्येष्ठ विनोदी लेखक द.मा.मिरासदार माणसाच्या आयुष्यात विनोदाचे स्थान काय या विषयी गंभीरपणे बोलत होते.

सोमवार दि. 21 मार्चची संध्याकाळ एस.एम.जोशी सभागृह, द.मांच्या वाचकप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या अठरा पुस्तकांचा प्रकाशन समारंभ डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते पार पडला. यावेळी द.मांनी आपल्या खणखणीत आणि प्रसन्न अनुभवाने उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटविली.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यंगचित्रकार शि.द.फडणीस, अभिनेते व द.मांचे जावई श्री रवींद्र मंकणी, कन्या सौ. सुनेत्रा मंकणी सामिल झाले होते. द.मा.मिरासदार, शंकर पाटील यांच्यासारख्या गावरान पण विनोदी शौलीतील साहित्यामुळे काही गावातले खास शब्द, तिथले वातावरण, त्या गावातल्या टिपिकल यक्ती या सार्याच मराठी वाचकांना वाचायला मिळतात. या निमित्ताने अशा लेखकांचे लेखन समाजात जागते ठेवणे ही आजच्या काळाची सांस्कृतिक गरज आहे. बदलत्या जीवनशौलीचा प्रभाव आजच्या काळात साहित्यातही डोकावत आहे. मिरासदारांच्या पुस्तकांच्या निमत्ताने ते अस्सल ग्रामिण वातावरण व त्यातून निर्माण होणारा विनोद सारेच आजच्या वाचकाला पुन्हा एकदा त्या काळात घेऊन जाते.

प्रकाशन झाल्याचे जाहीर करुन डॉ. आनंद यादव यांनी द.मां.नी आपल्या ग्रामिण कथेसाठी नवा बाज तयार केल्याचा खास उल्लेख केला. मिरासदारांच्या कथेत ग्रामीण जीवनाचा ढंग विनोदाच्या अंगाने नटविला. त्यातली इरसाल, बनेल, टगी माणसे मिरासदारांच्या कथेत आपसूक येताना दिसतात. पुस्तकाचे वाङ्मयीन महत्त्व जाणून मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सुनील मेहतांनी नयाने ही पुस्तके काढल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले.

राहूल सोलापूरकरांनी द.मांशी संवाद साधताना त्यांच्या पंढरपूरच्या आठवणींना खुमासदार शौलीतून बोलते केले. आपल्या ग्रामीण जीवनाशी संबंध येणारे पंढरपूरसारखे गाव मिळाले याचा उल्लेख करुन तिथली भाषा, वौशिष्ट्य आणि वातावरणातला निवांतपणा आणि आपल्या शौलीतले अनुभव सांगून वाचकांना विनोदाच्या ढंगातून सहजपणे खळखळून हसविले.

कवीला जीवनातली संगती, सौंदर्य दिसते. विनोदात लक्षात राहते ती विसंगती. असे सांगून द.मांनी आपले लक्ष नेहमीच जीवनातल्या विसंगतीकडे गेल्याचे स्पष्ट केले. आपण जे जग पाहतो त्यातूनच साहित्यिक लिहितो. जे पाहिले नाही ते लेखन करणे म्हणजे कृत्रिमता वाटते. चिं. वि. जोशींचा स्वभावनिष्ठ विनोदातून आपण घडत गेलो. अत्रे आणि चि.वि.जोशी हे आपले लेखनातले आदर्श होते असे द.मा. सांगतात.
मराठी साहित्यात चांगली विनोदी कादंबरी नाही. अशी एखादी कादंबरी लिहिता आली तर पहावे असा विचार आहे. त्याहीपेक्षा विनोदी नाटक लिहावे अशी इच्छा द.मां.नी यक्त केली. चित्रपटात लेखकाला निर्माता काय काय करायला लावतो याचे किस्सेही कथन केले.

दादांनी तुम्हाला हवे ते कर पण जे कराल त्यात चांगलं यश मिळवा एवढचं सांगितल्याचे सांगून दादांनी आमचे मराठी याकरण फार चांगले घेतल्याचे त्यांची कन्या सौ. सुनेत्रा मंकणी यांनी सांगितले. तर दादांच्या रुपाने सासरे कमी पण ते मित्र अधिक असल्याचे रवींद्र मंकणी सांगतात. त्यांच्या यक्तिमत्वात अतिशय साधेपणा तर आहेच पण त्यांच्यात सरस्वतीची श्रीमंती असल्याचे ते सांगतात.

द.मां.च्या 18 पुस्तकांची मुखपृष्ठातून ठळकपणे दिसणारे व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांनी त्यांच्याशी असलेल्या 35 वर्ष्याच्या सहवासाची उजळणी केली. प्रसंगनिष्ठ विनोद आणि त्यांची कथाकथन अंगाने जाणारे लेखन आपल्याला यंगचित्राच्या रुपाने लक्षात राहिल्याचे शि.द.फडणीस सांगतात.

द.मांच्या पुस्तक सोहळ्यात सहभागी झालेल्या वाचकांना ई-बुक रिडरवर जावईबापूंच्या गोष्टी मधील मामा भूर्रऽऽऽ ही छोटेखानी कथा वाचून सुभाष इनामदारांनी नया माध्यमातून द.मांच्या सर्व पुस्तकांना मेहता पब्लिशिंग हाऊसने स्थान दिल्याचे सांगितले. त्यांच्यावरच्या चित्रफितीतून पडद्यावर दिसत जाणारे द.मा. शौलीदार किश्श्यातून मैफिल जिंकत गेले याचे संपूर्ण श्रेय सूत्रसंचालक आणि संवादक राहूल सोलपूरकर यांना जाते.

No comments:

Post a Comment