Thursday, March 24, 2011

गंमत गोष्टी, गप्पांगण



खासबातमीचं भांडवल करणार्या किसन न्हाव्याची तर्हा...
पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल...
दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष दर्शन....
डिगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पौशांमुळे मिळालेला वारस....!

नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा विद्या येईचा पाठ गिरवणारे नवशिके शिक्षक...
वधूसंशोधनाऐवजी बुद्रुक का खुर्द या फेर्यातच अडकलेला वर...
अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वांसमक्ष पोबारा करणारा भामटा....
...या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शौलीतून मागोवा
द.मा. मिरासदारांच्या गंमत गोष्टी! मध्ये .
पृष्ठे : 160
किंमत : 140

-----------------------------------


गप्पांगण

गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो,
तो फक्त सिनेमातच! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामर्थ्य एकाच व्यक्तित असू शकते,
तो म्हणजे "मंत्री'!
श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते निवडणुकीची!
रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो,
ती दुनिया असते भुतांची!

जुन्या कादंबरीत आढळणा-या या देवीची आरा­धना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे निद्रादेवीची!
शहाण्या माणसाने ही पायरी कधीही चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे कोर्टाची!
या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे लाच देणे!

हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत.
वाचकांशी सा­धलेला हा संवाद; हेच या "गप्पांगण'चे विशेष आहे.
पृष्ठे : 136
किंमत : 130


लेखक : द. मा. मिरासदार

No comments:

Post a Comment