Sunday, May 13, 2012

बाजार





पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले.
निळू म्हणासा, चला, पळा! ह्याला निवा-याला ठेवले पहिजे.
आम्हाला कुणाच्याही घरात उंटाला ठेवायचे होते,
पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती.
माझ्या घरात उंट मावत न्व्हता. निळूच्या घरात मावत नव्हाता.
देवळात मावत नव्हता उंटाला कुठेच निवारा नव्हता.
मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता.

माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता.
कारण तो सर्वात जास्त मोठा, उंच होता.
अचानक बाहेरुन परका आलेला होता.
पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली.
मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले.
त्याचा भलामोठा देह खाली आला.
मान लांब करुन त्याने भुईवर टाकली.
उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले....

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १०४
किंमत-११० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे, २०१२

कोवळे दिवस


चार भिंतीबाहेरची प्रत्येक प्रभात ही असाच नवा जोम,
नवे चैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे.
याच कल्याणप्रद घटकेला पाखरांना गणे स्फुरते,
कळीचे उमलून फूल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात..

अजवर मानवजातीच्या कल्य़ाण्य़ाचे जे जे म्हणून विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले किंवा लिहले गेले, तेही अशाच वेळी स्फुरले असावेत.....


अशाच एका मनस्वी कलाकाराचे आपल्या तरुण्यातील `कोवळे दिवस`...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३६
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सहावी आवृत्ती- मे, २०१२

पांढरी मेंढरे हिरवी कुरणे


ऑस्ट्रेलिया ! कसा असेल हा देश?
ऐकून माहित होवं की, जगातली सगळी पिकं ऑस्ट्रेलियात होतात.
हवा तो उद्योग करु शकता..
समुद्रात बुड्या मारुन मोती काढा,
हजारो गुरं काढून त्यांचं मांस परदेशी पाठवा,
हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उप्तादन करा,
जगातलं लहान, मोठं, `सबकुछ मिलेगा` दुकान चालवा,
शेतकरी होऊन शोकडो एकर अननस, गहू, ऊस पिकवा
किंवा भांडवल घालून `ओपेल` खड्यांची खाण चालवा...

काहीही करायला या देशात संधी आहे.


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११४
किंमत-१२० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तीसरी आवृत्ती- मे, २०१२

Saturday, May 12, 2012

डोहातील सावल्या


पावसाचा महिमा लहानपणापासून आम्ही ऐकला. या देशातल्या माणसाइतका आणखी कुणाला तो कळला असेल की नाही, माला माहित नाही. आमचे सगळे जगणेच पावसावर अवलंबून असते. `इथं..इथं.. बेस रे मोरा.. ` किंवा, `एक होती चिऊ, एक होता काऊ..` प्रमाणे `ये रे ये रे पावसा..` हे गाणे बालपणीच आपल्याला पाठ होते. पावसाने यावे म्हणून त्याला पैसा देण्याचे अमिष दाखवायचे ( ते सुध्दा खोडकर खोटे.) आणि मग मोठा पाऊस आला की नाचायचे, तर बायकांनी जात्यावर ओव्या म्हणायच्या –
पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा,
पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा..
पावसाबद्दाल एवढा भक्तिभाव का, तर `पर्जन्यात् अन्नसंभवः,`... मुख्य हे की काळी पिकली पाहिजे.
माणूस हा देवपूत्र कसला, ते निसर्गपुत्रच. दुष्काळी मुलखातल्या लहानश्या गावातच बालपण गेले म्हणजे पावसाचा मोठेपणा जास्त कळतो.
काळेनिळे ढग आकाशात जमून कसा गडगडडात होतो..वीजबाई कोसळू नये म्हणून मग घाईगडबडीने अंगणात पहारी टाकायच्या.
धो-धो पाऊ, कोसळला आणि रस्त्यारस्त्यांवर गढूळ तांबड्या पाण्याचे लोट वाहू लागले की.. `अगाबाबा, मायंदाळ पानी आदाळलं आज.. `म्हणून ओढा बघायला धावायचं.
काळा-पांढरी माती भिजून कसा घमघमाट सुटतो.. गुरेवासरे कशी आखडत्या अंगाने उभी राहतात..कोंबड्या फूगुन आडोशाला बसतात.. भिजलेल्या शेरडाकरडांचा वास झोपड्यातून पसरतो. लगेच चार दिवसात नाही तथे नवे-नवे कोंब तरारून येतात. कधी कुठे पडलेला चिंचोका फूटून त्यातून कोंब, कुठे जांभळाचे बी पडले त्यातून कोंब! लिंबोल्यातून, दामुक्यातून रोपे तरारतात. एरवी केराचे डोंगर वाटणा-या उकिरड्यावर कसले-कसले वेल पसरु लागतात. बघता-बघता सगळी धरणी तर हिरवीगार होतेच, पण घराची माळवदे व छपरे सुध्दा पोपटी दिसू लागतात. पावसानंतरची ही दुनिया म्हणजे चमत्काराच असतो.

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८०
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे,२०१२

काळी आई




जेव्हा मला बघितले, माझ्या आईला मला पाजताना पाहिले, तेव्हा गुणा आईला कसनुसे वाटले.
कधी नाही ते आपल्या हातून घडावे, असे वाटले.
तो तिच्यात कधी नव्हते, ते एकाएकी उफाळून आले.
तिचे स्त्रीत्व झडझडून उठले आणि त्या नव्या अनुभूतीने माझी गुणा आई फार बेचैन झाली;
पण आता फार उशीर झाला होता.
मग एके दिवशी तिने काही ठरविले आणि आठ दिवस काही न खाता-पिता, न बोलता ती रानातल्या झोपडीत पडून राहिली.
विहिरीत पडून किंवा अन्य मार्गाने मरुन तिने माझ्या बापाला आणि गावाला धोक्यात आणले नाही.
सांगून-सवरुन ती शांतपणे रानातल्या झोपडीत राहिली आणि मरुन गेली....

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२८
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
आठवी आवृत्ती- मे २०१२

वाघाच्या मागावर




मुळशी धरणावर एक भेकर जीपपुढून आडवे पळत गेले. क्षणार्धात मी बार टाकला. माझे बागाईतदार मित्र निंबाळकर जीपखाली उतरुन भेकर घेऊन आले आणि म्हणाले, अरारा! भाऊसाब, गर्भिणी हाये हो!.

कोथरुडला निंबाळकरांच्या बागेत आम्ही भेकर सोलत असताना पुरी वाढ झालेले पोर तिच्या पोटातून बाहेर काढलेले पाहून निंबाळकरांची म्हातारी कळवळून म्हणाली, अरं लेकरानू, का सराप घेतला रे हा!
पण अशा प्रसंगामुळे बंदूक टाकून मी दुर्बीण घेतली, असे म्हणता येणार नाही. अवखळ असे वय सोडले , तर कोणता चांगला माणूस जिवंत पाहण्याचा अधिकार असलेल्या कोणा वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील ..?

लेखक-व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १७६
किंमत- १८० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे २०१२



माझे सन्मित्र जयंतराव टिळक यांच्या सोबतीने मी सिंहगडाच्या जंगलात भटकलो. मुळशी धरणापलीकडचे जंगल हिंडलो. पुण्याच्या परिसरातले डोंगर वेंधलो. कर्नाटकातल्या दड्डीकेरी, कोंडणकेरी, गुंजावती, मासूर ह्या राखीव जंगलात शिकारी केल्या आणि मुख्य म्हणजे जंगल पाहिले!... निसर्गाचा हा आदिअंत नसलेला विशाल ग्रंथ मी पाहिला आणि त्यातली चार अक्षरे मला ओळखता येऊ लागली.
ही अक्षरओळख झाली आणि लवकरच पशू-पक्षी मारण्यातला आनंद नाहीसा झाला. त्यांच्याविषयीचे कुतूहल, जिव्हाळा एवढेच उरले. बंदुकीऐवजी दुर्बीण आणि रेखनचित्राची वही घेऊन रानात जाणे मला जास्ती आनंदाचे वाटू लागले. मला वाटते, हरेक सुसंस्कृत शिकारी ह्याच इयत्ता चढत पदवीपर्यंत जातो. आता मी शपथपूर्वक सांगू शकेन की, समोर कांचनमृगांचा डौलदार कळप बघतितल्यावर मला घरी टांगलेल्या बंदुकीची आठवणसुद्दा होत नाही....

वाळूचा किल्ला


वाळूच्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगूर असतं, पण एका चिमुरडीसाठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते...
हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक क्रौर्य आहे...
अनिकेतला कळून चुकलं की, आता काही घडणार नाही;
आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक..सगळं सारखचं....
पहिलवान गड्यांनाही न जुमानता एका खोंडापुढे तेरा वर्षाची लिलू धिटाईनं उभी राहिली,
त्या दोघांमधलं नातं खास होतं..
एका राजाला व्याधीमुक्तीसाठी वैद्याच्या औषधापेंक्षाही एक `धक्का` रामबाण उपाय ठरला...
`वाळुच्या किल्ल्यां`सारखा असणारी मानवी भावभावनांचा हा बंध...
आपल्या सजग वेखणूतुन `तात्यांनी` साकारला आहे...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८४
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती, मे २०१२