Mehta Publishing House
Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, August 28, 2012
महात्मा गांधी आणि तीन माकडे
गांधीजींचे आचरण
गांधींजींची वचने
“जो बदल तुम्हाला या जगात पाहायला आवडेल, तो बदल तुम्ही स्वतःच घडवला पाहिजे !”
मी काय करु शकतो ? मी तर सामान्य माणूस ! अशा प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत, ते नेहमी म्हणत, हळुवारपणाने तुम्ही जग बदलू शकता ! आणि त्यांनी तसे केले.
आपल्या विचाराने आणि कृतीने गांधीजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केले आणि एका सामर्थ्य़शाली साम्राज्याला स्वतःच्या स्वप्नापुढे झुकायला भाग पाडले.
स्वतंत्र भारत या एकाच स्वप्नाने त्यांना असामान्य बनविले, लाखो भारतीयांचा अद्वितीय नेता बनविले. त्यांच्या पश्चात इतक्या दशकानंतर आजही त्यांचे विचार आणि कार्य तितकेच प्रेरणादायी आहे. गांधींजींच्या आयुष्यात घडलेल्या ज्या प्रसंगांनी त्यांचे जीवन घडविले, अशा प्रसंगांचे व त्यावरील गांधीजींच्या विचारांचे एकत्रीकरण या पुस्तकात केलेले आहे...
हे पुस्तक वाचून आपणही थोडंसे काही शिकू या!
संपादन- अनु कुमार
अनुवाद- प्रियंका कुलकर्णी
पृष्ठे- १७४
किंमत- १९० रुपये
`मोहनदास करमचंद गांधी` हे नाव एखाद्या प्रकरणाचे शीर्षक, रस्त्याची पाटी, तिकीट आणि पुतळा यांच्यापुरते मर्यादित राहू देऊ नये यासाठी प्रयत्न करा. वाचन करुन त्यांच्या कार्याची आणि वचनांची माहिती करुन घ्या.
ह्या पुस्तकात तुम्हाला त्यांचे कार्य आणि वचन या दोन्हीची माहिती मिळेल. यातून तुम्हाला जाणवेल की, गांधीजींच्या बोलण्यात, लिखाणात, वागण्यात केवढा साधेपणा आढळतो; पण प्रत्यक्षात ह्या गोष्टी इतक्या सहजसाध्य नसतात!
आणि या पुस्तकातून एक माणूस अन् एक महात्मा म्हणून तुम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्याल...
(अनुपम खेर यांच्या पुस्तकातील प्रस्तावनेतून)
Tuesday, August 21, 2012
अंतरीचा दिवा
वि. स. खांडेकर
वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे.
मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता.
आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल !
वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा..
संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे
पृष्ठे- ५८८
किंमत- ५५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.
वि. स खांडेकर १९३६ ते १९६२ या सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात पटकथाकार, संवादलेखक आणि गीतकार म्हणून सक्रिय होते. या काळात मराठीत १४, हिंदीत १०, तर तेलगू-तमिळमध्ये प्रत्येकी २ अशा २८ चित्रपटांची निर्मिती झाली.
त्यांच्या अधिकांश पटकथा मूळ होत्या, तर एक-दोन आधारित. विषयांच्या अंगांनी अधिकांश कथा सामाजिक. काही एक पौराणिकही,. सा-या कथा माणुसकी, समता, समाजवाद, मूल्यमहिमा, आदर्शवाद, बोध, ध्येय नि ध्यास इत्यादिंची जपणूक करणा-या होत्या. त्यांच्या पटकथांमागे समाज बदलण्याचं ध्येय आणि ध्यास होता. त्या रंजक करण्यासाठी त्यांनी प्रेम, प्रणयही चित्रित केला; पण ते त्यांचं लक्ष्य नव्हतं. चित्रपट यशस्वी करण्याचं साधन म्हणून, पट रंजक व्हावा म्हणून केलेला तो प्रयत्न असायचा. आधारित कथा मात्र त्यांनी निखळ मनोरंजनासाठी लिहिल्या. पटकथांमध्ये चारित्रिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक द्वंद ठरलेलं. अधिकांश कथा शोकात्म होत्या. काही सुखान्तही. द्वंद्वात सुष्ट, सत्वपक्षाची सरशी ठरलेली. वि.स.खांडेकरांनी आपल्या पटकथा मेलोड्रामा, फॅंटसी, सटायर म्हणून लिहिल्या. कथा जशी घडली तशी लिहिण्याचा त्यांचा प्रघात होता. अपवाद म्हणून एखादी पूर्वदीप्ती शैलीविकासाची कथाही आढळते. त्यांच्या पटकथा एक विशिष्ट खांडेकरी वळणवाट घेऊन येतात, विकसित होतात.
खांडेकरांचे चित्रपटातील संवाद छोटे, सहज आहेत. त्यांत विचार, विवेक, सिंध्दांत आपसूक असतातच. त्यांची साहित्यातील सुंदर शब्दकळा इथेही भेटते. अनुप्रास, उपमा हा संवादाचा अविभाज्य भाग असतो. संवादात खोच, कोपरखळी, कोटीही असते. संवादातून कथाविकास, चरित्रचित्रण होत राहतं. नाटककाराचा मूळ पिंड असेलेले खांडेकर कथेत संवादातून नाटकीय प्रसंगांची पेरणी चपखलपणे करीत तो खुलवत राहतात.
प्रसंगानुरूप गीत, गाण्यांची रचना करण्यात वि. स. खांडेकर वाकबगार होते. प्रसंगानुकूल गीतरचना हे त्यांच्या चित्रकथाचं वैशिष्ठ्य. त्यांची गीतं ही प्रेम, प्रणय, निसर्ग, भाव यांचे वर्णन करीत विकसित होतात. गीतं लयबध्द असतात तशीच नादमधुरही, ती छंदयुक्त अधिक, काही कथांमध्ये त्यांनी अन्य प्राचीन आणि समकालीन कवींच्या रचनांचा उपयोग करण्याचा द्रष्टेपणा दाखविला. या रचनेनं त्यांचे चित्रपट बोधगम्य आणि रम्य होण्यास साह्य झालं आहे.
( पुस्तकाच्या प्रस्तावनेतूनः डॉ. सुनीलकुमार लवटे)
Thursday, August 16, 2012
याला जीवन ऐसे नाव
इतिहासात डोकवा, जी मंडळी आशावादी होती त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढलेला दिसेल.
शिवाजी महाराजांचे उदाहरण पहा. प्रचंड आशावादी होते म्हणूनच हातात काहीही नसताना सुध्दा
विजापूर आणि मोगल हया दोन मोठ्या साम्राज्यवाद्यासी ते य़शस्वी झुंज देऊ शकले.
दुस-या महायुध्दात जर्मनीमध्ये ज्याच्या यातनातळात जी ज्यू मंडळी वाचली ती आशावादी होती.
आठ-नऊ वर्षे त्यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीशी झुंज दिली.
कोणाही यशस्वी माणसांचे उदाहरण घ्या., तुम्हाला याच सिध्तांताची प्रचिती येईल.
तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्यही पहा.
जेव्हा जेव्हा कठीण परिस्थितीशी मुकाबला करुन तुम्ही यशस्वी झाला आसाल तेव्हा तुमच्याकडे आशेची शिदोरीच असेल.
लेखक- संजीव परळीकर
पृष्ठे- ७६
किंमत- ८० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे आवडेल.
ह्या पुस्तकात मी छोट्या चौदा गोष्टी लिहल्या आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, काही सत्यकथा आहेत,
तर काही प्राण्यांच्या आहेत, तर काही इमेलद्वारे माझ्यापर्यत पोहोचल्या आहेत.
ह्या गोष्टीतून मोठे धडे घ्यायचे आहेत, ते तात्पर्यामध्ये लिहलेच आहे,
पण तेही धडे अमलात आणले तर आयुष्यावर दुरगामी परिणाम काय होतील ते मी सारांशामध्ये लिहले आहे...
(लेखकाच्या प्रस्तावनेतून)
Wednesday, August 15, 2012
द पेशंट
एका रुग्णाचा ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेमधला प्रवास
सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रुस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं, त्याच्याजवळ काय नाही ?
लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी!
त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही.
मात्र, एक पहाटे त्याला लघवीवाटे रक्त जातं. रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात डॉक्टरांच्या भेटीसाठी आठ तास थांबावं लागतं.
ह्या यशस्वी आयुष्यात जोनाथनचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालयं. युरॉलॉजिस्ट डॉ. मोहम्मद खाद्रा त्याच्या संपर्कात येतात. निदान आणि उपचार ह्यांच्या जंजाळात त्याला मूत्राशयाचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न होतं; पण डॉ. खाद्रांच्या दृष्टीनं जोनाथन आजाराच्या मानानं तरुण असला, तरी एक सामान्य रुग्ण राहत नाही. त्यांच्या आयुष्यातली साम्यस्थळं दिसू लागतात.
डॉ. खाद्रांचं आयुष्यही एका ठरविक वळणावर जातं, आयुष्यही नश्वर आणि बेभरवशांचं असल्याचं त्यांचा आजार त्यांना शिकवून जातो.
स्वतःच्या मर्त्यपणाची जाणीव झाल्यावर त्या दोघांनाही आजवर लाभलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता वाटू लागते.
मुळ लेखक- डॉ. मोहम्मद खाद्रा
अनुवाद- डॉ. देवदत्त केतकर
पृष्ठे- १८०
किंमत- १९० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.
Tuesday, August 14, 2012
गीतांजली
भावानुवादित काव्यसंग्रह
रविंद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व, परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ, एका बाजुला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार
तर दुसरीकडे त्याच्या प्राप्तीची तळमळ, स्वतःच्या उणीवांची आणि मलिनतेची जाणीव , अंतःकरण सूचितेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार ,उपमा, उत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणा-या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-ओहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करुन सहजपणे सांगितलेले जीवनविषयक सत्य व तत्वज्ञान
या सर्वच गोष्टी थक्क करणा-या होत्या.
स्वतः एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्यानी रेखाटलेल्या चित्रासारखे,
काव्यातून नादमय शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची त्यांची हातोटी केवळ अवर्णनिय !
मूळ बंगाली लेखक-रवींद्रनाथ टागोर
भावानुवाद- डॉ. अमिता गोसावी
पृष्ठे- १०८
किंमत- १०० रुपये.
हे छोटंसं फुल पटकन खुडून घे, विलंब करु नकोस ! अन्यथा ते कोमेजून जमीनावर धुळीत पडेल, अशी मला भिती वाटते.
त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल., पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणा-या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे.
मी सावध होण्य़ाआधी बघता-बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भिती वाटते.
या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला , तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे.वेळेतच त्याला खुडून घे.
Monday, August 6, 2012
कार्गोची कणसं
साधीसरळ जीवनशैली असणारी गावाखेड्यातील माणसं आपल्या पध्दतीनं या नव्या बदलांना सामोरं जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; पण बरेचदा अपयशी होतात; या अपयशातून उभं राहण्याची धडपड करतात;बरेचदा कोलमडतातही!
लेखक- नरेंद्र माहुरतले
पृष्ठे- १२८
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसातात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच!
आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागलं.
`इमला व पाया` संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करु देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं....
खुलताबादचा खजिना
या घटना आहेत सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीच्या. आजही आपल्या महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण भारतातच आणि शहरी भागीतील कौटुंबिक, सामाजिक वातावरणामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. घरापासून लांब असणा-या शाळा, शिक्षणाच्या अपु-या सुविधा, खेळण्याच्या साधनांचा अभाव, मार्गदर्शक व्यक्तींची कमतरता, आधुनिक यंत्रांची आणि तंत्रज्ञानाची अनुपलब्धता आणि कमालीचे दारिद्र्य- हेच दुर्दैवाने आजही ग्रामीण भागातले वास्तव आहे.
`खुलताबादचा खजिना` या पुस्तकाद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील मलामुलींमध्ये असणा-या दरीमध्ये सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यातल्या सर्वच कथांची बीजं ग्रामीण भागातच सापडली. ती बीजं रुजली आणि वाढली मात्र शहरात. परंतु त्यांचा मूळ गाभा नैसर्गीक आणि ग्रामीण आहे. या कथा कुमार, तसचं किशोर गटातील मुलामुलींना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांनाही आवडतील ...
लेखिका- मिरा सिरसमकर
पृष्टे- ६०
किमत- ९५
मुखपृष्ठ व आतली चित्रे - देविदास पेशवे
खट्याळपणा, खोडकरपणा, खेळकर वृत्ती आणि खळाळणारा उत्साह ही सा-याच लहान मुलांची वैशिष्ट्य..
`खुलताबादच्या खजिन्यात` या अशाच गमतीजमती दडलेल्या आहेत. खरं तर यातली मुलं तुम्हाला कुठेतरी भेटलीही असतील !
Subscribe to:
Posts (Atom)