Tuesday, March 1, 2011

आवर्जुन वाचावे असेच पुस्तक- डॉ.महेश तुळपुळे


ग्रेग चॅपेल ऑस्ट्रेलिया स्थित अष्टपैलू क्रिकेट खेळाडू ने "फिट फॉर ५०+ फॉर मेन " हे एक उत्तम मार्गदर्शनपर एक छोटे, सुटसुटीत लिहिलेले पुस्तक आहे
श्री. सुभाष जोशी यांनी त्याचा अनुवादही तितकाच चांगला केला आहे. मेहता पाब्लीशिग हाउस यांनी प्रकाशित केलेले सर्वांनी आवर्जुन वाचावे असेच एक मार्गदर्शन पर हे पुस्तक आहे.

या पुस्तकामध्ये वयाच्या पन्नाशी नंतर केवळ आपले आता वय वाढल्याने आपण अकार्यक्षम होत आहोत..
आपल्याला हे जमणार नाही असे म्हणून स्वतः च शारीरिक बंधने घालून घेऊ नयेत. उलट ही मनातली भावना काढून टाकावी. रोज नियमित व्यायाम घ्यावा. आळस सोडून रोज व्यायामासाठी ठराविक वेळ द्यावा
त्यामध्ये मुख्यत्वे चालणे , कमरेचे ,ताणाचे, स्नायूंचे,
असे विविध प्रकारच्या व्यायामा विषयी विवेचन केले आहे.तसेच त्याचे प्रकारही सांगितले आहेत.
आणि असे केल्यानीच शारीरिक वजन कमी होते, हाडांना, स्नायूंना बळकटी येते.
व्याधीवर नियंत्रण राहते.आणि त्यामुळे जीवनशैली मधे सुधारणा होते,
उत्साह वाढतो आणि शिवाय पुरेशी काळजी न घेणाऱ्या २५ ते ३० वर्षाच्या युवका पेक्षा तुम्ही अधिक तांदरुस्त
राहू शकता असे उपयुक्त विवेचन यात आहे

परंतु आपण जर जीवन शैलीचा विचार केला तर माझ्या मते पन्नाशी मधे तर काळजी घेणे गरजेच आहे परंतु लहान वयातच ही सुरवात करणे अधिक गरजेचे आहे. आजकालची लहान मुले बघता त्यांच्या मधे जाड मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. व स्थूलता ही एक भेडसावणारी समस्या झाली आहे. आज शाळेत वर्गात अनेक मुले जाड दिसतात. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखादाच जाड असे त्यामुळे जाड्या नावानेच तो ओळखला जाई.

मला असे वाटते कि उत्तम शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणेच आर्थिक आणि मानसिक तांदरुस्ती ही तेव्हडीच महत्वाची आहे. आणि त्यासाठीही तरुण वयातच दूरदर्शीपणे आपल्या पन्नाशीचा विचार करणे गरजेचे आहे.

अनेकदा सर्वसाधारण पणे निरोगीपणाचे, आरोग्याचे मुद्दे संपूर्ण जगाला एकच पद्धतीने सांगितले जातात. परंतु ते प्रत्येक देशाचा विकास, भौगोलिक स्थिती, हवामान तसेच तुमच्या कामाचे स्वरूप,या गोष्टीवरही आवलंबून असते. त्या मुळे जगातील सर्वाना एकच मापदंड लावणे चुकीचे आहे.उदा. आहारात आवश्यक असणारे घटकांचे प्रमाण वेग वेगळे आसू शकते

आपल्याकडे जे मास ,मच्छी खातात ते मांसाहारी असा समज आहे. आणि जे या गोष्टीना स्पर्शही करत नाहीत फक्त तेच शाकाहारी समजले जातात. परंतु कधीतरी थोडाफार मांसाहार करणे म्हणजे मांसाहारी नाही तर एकंदरीत आहाराच्या .४०% क्यालरी मांसाहारातून तुमच्या आहारात तुम्ही घेत असाल तरच जगाच्या व्याखेत तुम्हाला मांसाहारी म्हणले जाते.हे समजून घेणे आवश्यक आहे.

डॉ. महेश तुळपुळे,पुणे

No comments:

Post a Comment