Monday, February 28, 2011

व्यायाम, आहार आणि पुरेशी विश्रांती -तंदुरुस्तीची तीन सुत्रे



-डॉ.वैजयंती खानविलकर

पुणे (दि. 28 फेब्रुवारी) काहीही होत नसतानाही चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने वार्षिक तपासणी करायला हवी आहे. यायाम, आहार आणि पुरेशी विश्रांती याबाबतीत स्त्रीयांनी आपल्या काळात काळजी घेण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैजयंती खानविलकर यांनी पन्नाशीनंतरची तंदुरुस्ती याविषयी बोलताना यक्त केले.

मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने रविवारी (27 फेब्रुवारी 2011) पत्रकार भवन येथे झालेल्या फिट फॉॅर 50+ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. खानविलकर बोलत होत्या. त्यांच्या हस्ते फिट फॉर 50+ फॉर विमेन आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेश तुळपुळे यांच्या हस्ते फिट फॉर 50+ फॉर मेन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

डॉ. वैजयंती खानविलकरांनी यावेळी तीशीनंतरच फिटनेस विषयीची जागरूकता महिलांमध्ये निर्माण होण्याची गरज व्यक्त केली. स्त्रीयांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे त्यांनी आपल्या बोलण्यातून लक्ष वेधले. मला काय झालयं? माझ्यावर कशाला खर्च? अशा विचारांनी `स्त्री आोग्याकडे डोळे झाक करीत आहे. घराला, संसाराला एक भक्क्म आधार स्त्रीचा असतो. तिनेच आरोग्याची हेळसांड केली तर घराची इमारतच कोसळते असे सांगून डॉ. खानविलकरांनी स्वत:च्या आयुष्यातही तिने आनंद घ्यायला हवा. यासाठी स्वत:च्या शरीराची आजच्या तणावाच्या कालात काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे असा सल्लाही त्यांनी दिला.

डॅ. महेश तुळपुळे यांनी तंदुरुस्तीकडे लहानपणापासूनच लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र पन्नाशीनंतर फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असून चरबी वाढणार नाही यासाठी जिभेवर ताबा मिळवणे आवश्यक असल्याचे सांगितले. यात योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि योग्य वेळी योग्य चाचण्या व आवश्यक त्या लसीकरणाकडे लक्ष असावे याकडे लक्ष वेधले.
आपल्या मनाशी, स्वभावाशी सुसंगत असा व्यायाम ठेवण्याची गरज सांगताना आपल्या शरीराशी भांडू नका असा सल्ला डॉ. तुळपुळे यांनी दिला.

पळण्यापेक्षाही रोज नियमित चालणे हा सर्वात चांगला यायाम असून तो सोपा आणि वर्षभर करता येतो असे आवर्जुन सांगितले.

या दोन्ही पुस्तकांचे अनुवादक श्री.सुभाष जोशी यांनीही जिममध्ये न जाता चालण्यावर भर द्यावा अशी सूचना केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही डॉक्टरांनी उपस्थितांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी केले तर श्री.अभय भावे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment