Wednesday, May 18, 2011

प्रशासन आणि नेतृत्वही नेभळट


‘‘अबोटाबाद सारखी कारवाई करण्याचा विचार करण्याइतपतसुद्धा क्षमता सध्या भारताकडे नाही. अत्यंत नेभळट सरकार आणि प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आपण दहशतवादाविरोधातील लढाई जिंकू शकत नाही. त्यामुळे चर्चावर वेळ खर्च करण्यापेक्षा शेजारी राष्ट्रांमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आर्थिक, लष्करी आणि राजनैतिक ताकद वाढविण्यावर भर देणो गरजेचे आहे. भारतातील दहशतवाद संपविण्यासाठी आपल्या मदतीला बाहेरून अमेरिका, रशियासारखा कोणी तरी येईल, या भ्रमात राहून चालणार नाही,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री ‘मॅगसेसे पुरस्कार’विजेते ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पत्रकार अरुण शौरी यांनी केले.

‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या ‘ग्रोइंग अप बिन लादेन’ या जीन सॅशन यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन आज शौरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. विशेष सरकारी वकील अॅड. उज्‍जवल निकम मेजर जनरल (नि) शशिकांत पित्रे,े अनुवादक बाळ भागवत, ‘मेहता हाऊस’चे अनिल मेहता व सुनिल मेहता व्यासपीठावर होते.

शौरी म्हणाले, की ओसामा बीन लादेनला अमेरिकेने ठार मारल्यामुळे भारताचा कोणताही फायदा झालेला नाही. उलट यामुळे पाकिस्तानातील मूलतत्त्ववाद आणखी तीव्र होणार आहे. अफगाणिस्तानातील अस्तित्त्व कायम ठेवण्यासाठी अमेरिकेला जोर्पयत पाकिस्तानची गरज भासणार आहे, तोर्पयत अमेरिका भारतातील पाकिस्तानी हस्तक्षेपाबद्दल चकार काढणार नाही. पाकिस्तान अण्वे निर्मितीमध्ये गुंतला असल्याची पूर्ण जाणीव अमेरिकाला सन 196क् पासूनच आहे. दहशतवादी कारवायांना पाकिस्तानातून खतपाणी मिळते, ही अमेरिकेला चांगली माहित असलेली वस्तुस्थिती आहे. मात्र, याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. मात्र, हाच पाकिस्तानस्थित दहशतवाद जेव्हा खुद्द अमेरिका किंवा युरोपीय देशांना सतावू लागतो तेव्हाच अमेरिका पाकिस्तानवर दबाव टाकते. त्यावेळी ते कोणातीही विधिनिषेध ठेवत नाही. कोणाला, कसलेही पुरावे देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओसामाला पाकिस्तानात घुसून अमेरिकेने मारले, पण या ओसामाविरूद्धचा एकही पुरावा त्यांनी आजवर जगाला दिलेला नाही.

अबोटाबादमध्ये अमेरिकेने ओसामाला संपवल्यानंतर भारतानेसुद्धा कराचीत जाऊन दाऊदला मारावे, अशा चर्चा भारतात सुरू झाल्या. मात्र, अशी कारवाई करण्याची क्षमता भारताकडे आजिबात नाही, असे शौरी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कराचीमध्ये जाऊन हल्ला करण्याची तर बातच सोडा; मुंबईत दहशतवादी घुसल्यानंतर काय करायचे, याचा निर्णय करायला आपल्या सरकारला 7-8 तास लागले होते. पाकव्याप्त काश्मिरमधील सगळी कामे चिनी कंपन्यांच्या हातात आहेत. अध्र्या तासाच्या अवधीत ल्हासार्पयत दहा लाखांची फौज उभी करण्याची तयारी चीनने केली आहे. माओवाद्यांचा धोका वाढला आहे. ’’

‘‘ओसामाच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सर्वाधिक मुस्लिम ठार झाले. सुन्नी पंथीयांशिवाय कोणी जगू नये, असे त्याला वाटत होते. मात्र, ओसामा संपल्यामुळे दहशतावद संपलेला नाही,’’ असे पित्रे म्हणाले. सुनिल मेहता यांनी स्वागत केले. अनिल मेहता यांनी आभार मानले.

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-1-18-05-2011-ce303&ndate=2011-05-18&editionname=pune

No comments:

Post a Comment