Saturday, November 12, 2011

स्टीव्ह जॉब्ज



एक झपाटलेला तंत्रज्ञ !
स्टीव्ह जॉब्ज – तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिध्द जादूगार-

हे जग सोडून गेला...
पण त्यानं आपल्या अद्भभूत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले... कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज.. हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील.

जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीक़डची उप्तादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखविली.

आपले आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असे सनसनाटी आय़ुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्याहून वेगळं आणि अगदी सर्वात्तम असंच कायम करुन दाखविण्यासाठी ते आयुष्यभर धडपडला.
कर्करोगानं जॉब्जचं शरीर पाखरुन टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही.

अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर...

लेखक- अच्युत गोडबोले - अतुल कहाते
पृष्ठे- १५२
किंमत- ९५ रुपये


जॉब्ज माणूस म्हणून कसा होता, त्यानं कशा प्रकारे तंत्रज्ञानाचं जग बदलण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यानं कोणकोणते धक्के खाल्ले हे सगळं वाचताना कित्येकदा अंगावर शहारे येत, म्हणूनच जॉब्जच्या या साडेपाच दशकांच्या अत्यंत अविश्वसनीय कलाटण्यांनी भरलेल्या चित्तथरारक आयुष्याची ही कहाणी सादर करावीशी वाटली !
यात संगणकाच्या तांत्रिक बाबींपेक्षा त्याच्या आयुष्यातील चढउतार, जॉब्जची उद्योजकता, कल्पकता यांच्यावर भर देऊन तो रंजक करण्यावर आम्ही भर दिलाय. त्यामुळे तो कोणालाही आवडेल याची आम्हांला खात्री आहे आणि गंमत म्हणजे हा सर्व उपद्व्याप ` स्टार्ट टू फिनीश ` आम्ही चक्क आठ दिवसात पूर्ण केला!
एखाद्या सिनेमाची पटकथा लिहावी तसा हा अनुभव होता. ते वाचतानासुध्दा अशीच भावना निर्माण होईल असं आम्हांला वाटतं.

( पुस्तकाच्या प्रस्तावनेतून साभार)
achyut.godbole@gmail.com
अच्युत गोडबोले
akahate@gmail.com
अतुल कहाते

http://www.mehtapublishinghouse.com/BookDetail.aspx?BookCode=1748

No comments:

Post a Comment