Saturday, November 12, 2011

वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन

तुम्हाला दुःखापासून मुक्त करण्याचा सजग मार्ग
Living Well With Pain & Illness या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
`वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन` हे एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक मार्गदर्शक पुस्तक आहे. सजगता आणि एका वेळी तेवढ्याच क्षणापुरतं जगणं यांव्दारे जुनाट वेदना आणि व्याधी ताब्य़ात ठेवाव्यात, हे या पुस्तकात सांगितलें आहे.
पुरातन सजग ध्यानाची परिणामकारकता अलीकडच्या काळात जगन्मान्य झाली आहे. विशेतः आरोग्य आणि तणाव यांबाबतीत वेदना आणि ध्यान या आपल्या वैयक्तिक अनुभवातून विश्वास देणा-या या पुस्तकामध्ये विद्यमाला बर्च यांनी डॉ. जॉन कबाट-झिन आणि इतर याचं काम पुढे नेलं आहे.
आरोग्याच्या कोणत्याही तक्रारींसह सजगतेने शिकल्यामुळे आत्मविश्वास, शहाणपण आणि दयाळूपणा कसा मिळतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
विद्यमाला यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाने हजारो व्याधिग्रस्तांना अदिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत केली आहे.
तुमच्या शरीरीची शांत आणि सजग जाणीव प्रत्येक क्षणी निर्माण केल्यामुळे, वैफल्य आणि दुःख नाहीसं करणं शक्य आहे, हे त्या दाखवून देतात. जुनाट वेदना आणि व्याधी यांच्या दुय्यम आणि भावनिक परिणामांना योग्य रितीने हाताळून तुम्ही अधिक सकारात्मक जगू शकता.
सहज करण्याजोग्या श्वसनाच्या पध्दती, सामर्थ्य़शाली सजग ध्यानप्रकार, उपयुक्त आकृच्या आणि यांपासून फाय़दा झालेल्या व्यक्तींचे प्रेरणादायी अनुभव यांचा समावेश `वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन `या पुस्तकात आहे.
व्याधिग्रस्तांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे..
मुळ लेखिका- विद्यामाला बर्च
अनुवाद- डॉ. सुभाष दांडेकर
पृष्ठे- २२०
किंमत- २४० रुपये.

No comments:

Post a Comment