Monday, October 17, 2011

ग्रॅड पेरेंटस्



चिकन सूप फॉर द सोल

ह्दयाची कवाडं उघडणा-या आणि आजी-आजोबांच्या मनाचं चैतन्य जागृत करणा-या गोष्टी

लेखन व संकलन- जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मेलडी मॅकार्टी, हॅनॉक मॅकार्टी

आजी-आजोबा नातवंडं यांच्यातल्या ह्द्य नात्यातले अनेक लोभस पदर उलगडून दाखवणा-या या सुंदर सत्यकथा!
या कथा अमेरिकेतील असल्या तरी अगदी आपल्या वाटतात. कारण या नात्याला स्थळ-काळचं बंधन नाही. आजकालच्या जीवनपध्दतीमुळे आजी-आजोबा आणि नातवंडं एकमेकांपासून कितीही दूर रहात असली तरी टेलिफोन, कॉम्प्युटर, व्हिडीओ, कॅमेरा या अधुनिक साधनांमुळे ती कायम एकमेकांच्या जवळ असतात. संस्कार करणारे, दुःखात मनाला उभारी व धीर देणारे, नातवंडांबरोबर हसणारे-खेळणारे,
खाऊ-पिऊ घालणारे आजी-आजोबा ज्यांना लाभतात, ती भाग्यवान मुलं आयुष्यात पुढे जाऊन उत्तम माणूस व नागरिक बनतात.
सकारात्मक दृष्टी ठेवून आयुष्यातल्या विविध घटनांना तोंड दिलेल्या साध्यासुध्या सामान्य माणसांच्या या सत्यघटना.
या कथा तुमच्या ह्दयाला नक्कीच स्पर्श करतील आणि नातवंडांच्या रुपानं केवढी मोठी देणगी परमेश्वर आपल्याला देत असतो, याची परत एकदा नव्यानं जाणीव करुन देतील.
पृष्ठे- ३२०
किंमत- २८० रुपये
अनुलाद- शीला कारखानीस


हे पुस्तक तयार करताना प्रत्येक कथेकडे आम्ही आजी-आजोबांच्या नजरेनं आणि हदयानं बघितलं. आमच्या नजरेसमोर उलगडणा-या या निष्ठा, सन्मान, प्रतिष्ठा, श्रध्दा आणि आयुष्यातल्या जबाबदा-या पूर्ण करण्याची वचनबद्धता सांगणा-या या गोष्टींनी आम्ही भारावून गेलो. आयुष्यभर केलेले अविश्रांत कष्ट आणि धडपड आणि त्यातुन मिळविलंलं निश्चल धैर्य आणि शहाणपणा यांच्या कथांनी आम्हाला प्रेरणा मिळाली. ज्या क्षणी योग्य तेच करुन आजी-आजोबा प्रेम दर्शवतात त्यानं आम्ही हेलावून गेलो. जगात अनेक प्रकारचे आजी-आजोबा आहेत. `नॉर्मन रॉकवेल इलस्ट्रेशन्स` मधल्या गोष्टीतल्या आजी-आजोबांपासुन ते विश्वास ठेवता येऊ नये इतक्या कार्यक्षम आजी-आजोबांबर्यंत, हे उद्यमशील लोक सतत विमानप्रवास करीत असतात, ते जी कामं करीत असतात त्यातून निवृत्त होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. इंटरनेट,ई-मेलचं नवं तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करुन घेतलयं. ते त्यांच्या समाजासाठी कुणीही करु शकणार नाही असं आवश्यक कार्य करत असतात. या आजी-आजोबांची आयुर्मयादाही वाढलेली आहे. कुठलीही परिसीमा न बाळगता त्यांना सतत अधिकाधिक कार्य करायचं असतं, परंतु तरीही त्यातला प्रत्येक जण त्यांच्या नातवंडांसाठी अतिशय महत्वाचा असतो. आजकालच्या या अस्थिर युगात ते आपल्या नातवंडांपासून खूप दुर रहात असतील, पण तरीही ते आपल्या नाववंडांच्या आयुष्याला अर्थ, स्थिरता आणि सुरक्षितता प्राप्त करुन देणा-या बोटीच्या नांगराचं काम करीत असतात. काही आजी-आजोबा अत्यंत धैर्याने आपल्या नातवंडांना स्वतः वाढवत आहेत. आम्ही त्यांची प्रशंसा करतो.

( पुस्तकाच्या प्रस्तावनेतून)

तुला आठवताना....



तुला आठवताना....
` Mars And Venus Starting Over`
A Practical Guide for Finding Love Again
After a Painful Breakup, Divorce, or the Loss of a Loved One
या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद

तुम्ही सहज तरुन जाल!
एखादी गोष्ट गमावण्याचे दुःख हे जरी अटळ असले तरी त्यापासून होणारे नुकसान मात्र आपण टाळू शकतो.
तुम्ही तुमच्या भूतकाळातील वेदनांवर उपचार करु शकता आणि त्या अनुभवाकडे सकारात्मक नजरेने पाहून नवीन काही शिकू शकता.
तुमचे आयुष्य अधिक वाईट होण्याऐवजी ते अधिक चांगले बनवू शकता. ` Mars And Venus Starting Over` हे पुस्तक प्रेमातून उद्भवणा-या प्रसववेदनांवर आहे. ही माझ्याकडून जगाला दिलेली भेट आहे आणि अठ्ठावीस वर्षे तुमच्यासारख्या लोकांची सेवा करण्याचे फलित आहे.
मला अशी आशा आहे की, याचा तुम्हालाही नक्कीच उपयोग होईल. तुमच्या निराशेच्या अंधकारात हे पुस्तक एखाद्या मेणबत्तीप्रमाणे तुम्हाला प्रकाश देईल, तुमच्या एकाकीपणात फुंकर घालणा-या समजूतदार मित्राप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला वाटेल.
तुमच्या अतिशय वेदनामय अशा काळात हे पुस्तक तुमच्या जिवाभावाच्या मित्राप्रमाणे उपयोगी ठरेल.
हे पुस्तक पुन्हा-पुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. इतरही पुष्कळ लोक या रस्त्यावरुन गेले आहेत आणि त्यांचे ठीक चालले आहे.
पुन्हा प्रेम करण्यासाठीच ते जिवंत राहिले आहेत आणि तुम्हीसुध्दा राहाल!

मूळ लेखक- जॉन ग्रे
अनुवाद- शुभदा विद्वांस
पृष्ठे- ३२८
किंमत- ३०० रुपये

ADAM -लेखक- रत्नाकर मतकरी



ADAM अडम
लेखक- रत्नाकर मतकरी
पृष्ठे- ३१६
किंमत- २८०
`अडम` ही माझी, आत्तापर्यंत सर्वात धाकटी कादंबरी. थोरली ` जौळ` - ती नावाजली गेली, तिच्यावर आधारलेलं `माझं काय चुकलं` हे नाटक जोरात चाललं. तिच्यावर चित्रपटही झाला. थोडक्यात, ती सुस्थळी पडली. मधली ` पानगळीचं झाड` , तिच्यावर नाटक झालं. ते ब-यापैकी चाललं. तिसरी `अडम` , तिच्यावर ना नाटक झालं, ना चित्रपट. रसिकांनी ती आवडल्याचं एकमेकांना सांगितलं तरी कुजबुजून. पण धाकटी आणि धड मार्गाला ना लागलेली मुलगी बापाला अधिक आपलीशी वाटते म्हणून माझं `अडम` वर प्रेम आहे, असं नाही. अगदी त्रयस्थपणे, तटस्थपणे पाहिले तरी या कादंबरीचे गुण स्पष्ट दिसतात. मलाच नाही, तर मुद्दाम डोळे झाकून न घेतल्यास, कुणालाही.
`अडम`मध्ये सुमारे चाळीस वर्षाचा कालखंड येतो. त्याचबरोबर दक्षिण भारतातील नानाविध स्थळे आणि अनेक व्यक्तिरेखा, कितीतरी पात्रे या कादंबरीत भेटतात, त्यांच्या आयुष्यातल्या विविधरंगी प्रसंगांनी `अडम` भरगच्च आणि नाट्यपूर्ण झाली आहे.
`अडम` अधिक वाचकांपर्य़ंत पोहोचायला हवी होती, याचे शल्य माझ्यापेक्षा, माझ्या वाचंकांना अधिक बोचत असावे. कारण, माझ्या प्रत्येक जाहिर मुलाखतीत प्रेक्षकांकडून `अडम विषयक प्रश्न येतात. कदाचित साहित्यदिशादर्शकांनी शिफारस न करता या कादंबरीचा शोध आपला आपल्यालाच लागला, याचे त्यांना अधिक अप्रुप वाटत असावे. मला खात्री आहे- ती नव्याने वाचली जाणा-यांची संख्या वाढतेय. ती इंग्रजीत रुपांतरीत व्हावी, अशाही सूचना अनेकांकडून येताहेत. कधी ना कधी नव्या काळाप्रमाणे समीक्षेचे पारंपारिक संकेत मोडीत काढून तिचे नव्याने मूल्यमापन केले जाईल, याविषयी मला बिलकूल शंका नाही!


-रत्नाकर मतकरी
(नव्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहलेल्या प्रस्तावनेतून)

Wednesday, October 12, 2011

अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम




राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा

रामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशात आणि वेगवेगळ्या धर्मात मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत., असा अंदाज आहे. सोळाव्या वर्षी रामाला वैराग्य येते, राम गृहत्याग करतो, वनवासी होतो आणि नंतर कुलगुरु वसिष्ठ त्याची समजूत घालून, त्याला उपदेश करुन जीवनाचा अर्थ समजावून देतात अशी कथा आपल्याकडे प्रसिध्द म्हणता येईल अशा योगवसिष्ठ रामाय़णात आहे.

कृष्णाच्या रामायणात अत्यंत भारावून गेलेल्या लेखणीबहाद्दरांनी रासलीला करणारा रामही रंगवायला कमी केलेले नाही. रामायणाच्या नावाखाली हे सगळे चालत आले आहे.

पुढे जाता, ललित साहित्य म्हटले जातील असे अनेक असामान्य काव्यात्मक ग्रंथही लिहले गेले आहेत. भवभूती आणि कालिदासही त्यातच आले.

`समग्र रामकथा हीच मुळात निव्वळ पुराणकथा आहे, यात सत्त्याचा लवलेश नाही, असा कोणी राम कधी झालाच नव्हता आणि अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेशातील गाव नाहीच, जावा बेटावरचे जोग्या नावाचे ते एक नगर आहे, थायलंडमधील अयुथ्या (आयोध्या) नावाचे गाव हीच रामजन्मभूमी आहे.`..असली विधाने `पुराव्यानिशी` करणारेही कमी नाहीत.

रामकथा तपासून, पडताळून पाहणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश नाहीच. वाल्मीकीची मूळ रामकथा हा माझ्यापुढचा आदर्श आहे. मूळ रामकथेच्या पात्रांची, तिच्या कथानकाची ह्यात भले पुष्टी झाली नसेल, निष्ठापूर्वक समर्थनही नसेल, क्वचित कुठे तिच्यावर नगण्य जुलूम झाला असेल, पण तरीसुध्दा कुठेही कृत्रिम विरोधाभास वाटू नये अशा अकृत्रिम सहजतेने ह्या कथेचे विणकाम करण्याचा हा निष्ठापूर्वक केलेला प्रयत्न आहे.

मुळ गुजराती लेखक- दिनकर जोषी
अनुवाद- सुषमा शाळिग्राम
पृष्ठे- १२६ ,
किंमत- रु. १२०.

युवराज्ञी



` प्रिन्सेस` या कादंबरीचा अनुवाद
सौदी अरेबियातील महिलांच्या निर्घृण छळाची कहाणी

एका सौदी अरेबियन राजकुमारील मनश्र्चक्षृंसमोर आणा, काय दिसतं तुम्हाला ?
चमचमत्या हिरेमाणकांनी मढलेली, विश्वास बसणार नाही अशा ऐशाआरामात
राहणारी स्त्री; .....
पण प्रत्यक्षात मात्र सोनेरी मुलामा चढविलेल्या पिंज-यात राहणारी.
तिला स्वातंत्र्य नाही, स्वतःचे मन नाही, स्वतःच्या आयुष्यावर अधिकार नाही;
फक्त पुत्र जन्माला घालणारी एवढीच तिची किंमत.
सुलताना ही मौदी राजघराण्यात जन्माला आलेली, राजेसाहेबांची अगदी निकटवर्ती.
आपल्या वादग्रस्त बाल्यापासून नियोजित विवाहापर्यंत आयुष्याबद्दल सांगताना तो बुरखा
बाजूला सारुन...स्त्रियांचे निर्घृण छळ, तसेच सक्तीचे विवाह, लैंगिक गुलामगिरी व
तत्काळ देहान्तशासन यांसारख्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणा-या घटनांचा
धक्कादायक इतिहास घउड करतो.
`प्रिन्सेस` ही स्त्रीच्या निर्भिड वृत्तीचा आणि प्रचंड साहसाचा पुरावा आहे. सुलतानाने स्त्रियांच्या अत्त्याचाराविषयी स्पष्टपणे बोलून स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या माथी सौदी समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. याच कारणास्तव तिने तिची कहाणी अनामिकपणे सांगितली आहे.
मानवी हक्कांची किमान जाणीव असलेल्या कुणाचेही काळीज पिळवटून टाकेल असेच हे पुस्तक आहे. एक अत्यंत प्रभावीपणे लिहिलेली खासगी कथा जी तिथल्याच स्त्रीकडून आल्यामुळे, विश्वसनीय ठरलेली!

-बेट्टी महमूदी
(` नॉट विदाऊट माय डॉटर` या सुप्रसिध्द पुस्तकाची लेखिका)

मूळ लेखिका- जीन सॅसन
अनुवाद- संयुक्ता कैकिणी

Tuesday, October 11, 2011

अ-मृत पंथाचा यात्री



`शांतीनिकेतन-विश्वभारती`चे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक रवीन्द्रनाथ ठाकूर यांचा जीवनपट

रवीन्द्रनाथ ठाकूर, विश्वकवी.
नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय.
आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकर्ते!
हा आहे त्यांचा शब्दबध्द केलेला जीवनप्रवास.
भरलेल्या घरात लहानपणापासून एकटे पडलेले रवीन्द्र
आपल्या कवितांमध्येच रमणारे, कवितांसाटी प्रेरणा देणा-या
भामीराणीमुळे मिळालेली उभारी आणि त्यांच्या जाण्यामुळे
परत निर्माण झालेली पोकळी, वडिलांच्या आज्ञेखातर पण
मनाविरुध्द बघितलेले जहागिरीचे काम, त्यातूनच येत गेलेली
आजूवाजूच्या समाजाची जाण त्यांना घडवत गेली.
रविन्द्रनाथांच्या संपूर्ण आयुष्यावरच मृत्यूचे मोठे सावट राहिले आहे.
एकामागून एक प्रियजनांचा चिरवियोग त्यांना अजूनच
एकटे करत गेला.
शांतिनिकेतन शाळा, तिच्यासाठी करावी लागणारी धडपड;
वेगवेगळ्या कलांची आवड, त्या निमित्ताने देशोदेशींच्या
लोकांशी भेटी. संपर्क, नोबेल पुरस्कार,
त्यामुळे मिळणारे मानसन्मान अशा वाटांवर
त्यांचे आयुष्य चालत राहिले.
अ-मृत पंथाचा हा यात्री मात्र एकला चालो रे म्हणत चालत राहिला....

मुळ गुजराती लेखक- दिनकर जोषी
अनुवाद- डॉ. सुषमा करोगल

पृष्ठे- २००, किंमत १८० रुपये.

द लास्ट ज्यूरर



मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्ताहिकांपैकीच एक ` द फोर्ड कौंटी टाईम्स` हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असतं तरीही सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, कॉलेज सोडलेला एक तेवीस वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो. साप्ताहिकाचं भविष्य धड दिसत नसतं. याच सुमारास कुख्यात पॅडगिट फॅमिलीमधला डॅनी पॅडगिट एका तरुण विधवा स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करतो. विली ट्रेनॉर या घटनेची भीषण कथा त्याच्या पेपरमधून प्रसिध्द करतो. साप्ताहिकाचा खप वाढतो.
मिसिसिपी, क्लॅन्टनमधल्या भरगच्च कोर्टात खुनी डॅनी पॅडगिटवर खटला उभा राहतो. धक्कदायक, पण खटल्याला नाट्यपूर्ण कलाटणी देणारी गोष्ट घडते. तो ज्यूरर्सना उघड धमकी देतो की, त्याला दोषी ठरविण्यात आलं, तर तो एकेकाचा सूड घेईल. तरीही त्याला दोषी ठरविण्यात येते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होते.
पण मिसिसिपीमध्ये १९७० च्या काळी जन्मठेप म्हणजे सारा जन्म तुरंगात काढणं असं नव्हतं. नऊ वर्षानंतर डॅनी पॅडगिट पॅरोलवर सुटतो, फोर्ड कौंटीमध्ये परत येतो आणि शेवटी, केलेल्या अपराधांमुळे परमेश्वरी न्यायाची बळी ठरतो.

मूळ लेखक- जॉन ग्रिशॅम
अनुवाद- विभाकर शेंडे
पृष्ठे- ३३६ , किंमत- ३०० रुपये