
गांधीजींचे आचरण
गांधींजींची वचने
“जो बदल तुम्हाला या जगात पाहायला आवडेल, तो बदल तुम्ही स्वतःच घडवला पाहिजे !”
मी काय करु शकतो ? मी तर सामान्य माणूस ! अशा प्रकारचे उद्गार गांधीजींनी कधीच काढले नाहीत, ते नेहमी म्हणत, हळुवारपणाने तुम्ही जग बदलू शकता ! आणि त्यांनी तसे केले.
आपल्या विचाराने आणि कृतीने गांधीजींनी लाखो भारतीयांना प्रेरित केले आणि एका सामर्थ्य़शाली साम्राज्याला स्वतःच्या स्वप्नापुढे झुकायला भाग पाडले.
स्वतंत्र भारत या एकाच स्वप्नाने त्यांना असामान्य बनविले, लाखो भारतीयांचा अद्वितीय नेता बनविले. त्यांच्या पश्चात इतक्या दशकानंतर आजही त्यांचे विचार आणि कार्य तितकेच प्रेरणादायी आहे. गांधींजींच्या आयुष्यात घडलेल्या ज्या प्रसंगांनी त्यांचे जीवन घडविले, अशा प्रसंगांचे व त्यावरील गांधीजींच्या विचारांचे एकत्रीकरण या पुस्तकात केलेले आहे...
हे पुस्तक वाचून आपणही थोडंसे काही शिकू या!
संपादन- अनु कुमार
अनुवाद- प्रियंका कुलकर्णी
पृष्ठे- १७४
किंमत- १९० रुपये
`मोहनदास करमचंद गांधी` हे नाव एखाद्या प्रकरणाचे शीर्षक, रस्त्याची पाटी, तिकीट आणि पुतळा यांच्यापुरते मर्यादित राहू देऊ नये यासाठी प्रयत्न करा. वाचन करुन त्यांच्या कार्याची आणि वचनांची माहिती करुन घ्या.
ह्या पुस्तकात तुम्हाला त्यांचे कार्य आणि वचन या दोन्हीची माहिती मिळेल. यातून तुम्हाला जाणवेल की, गांधीजींच्या बोलण्यात, लिखाणात, वागण्यात केवढा साधेपणा आढळतो; पण प्रत्यक्षात ह्या गोष्टी इतक्या सहजसाध्य नसतात!
आणि या पुस्तकातून एक माणूस अन् एक महात्मा म्हणून तुम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्याल...
(अनुपम खेर यांच्या पुस्तकातील प्रस्तावनेतून)













































